व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

महापारेषण भरती 2024 | Mahatransco Bharti 2024 |महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मेगा भरती.

Mahatransco Bharti 2024

Mahatransco Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 4494 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांकरिता पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे:

रिक्त पदांची नावे:

  • सहायक अभियंता (पारेषण)
  • वरिष्ठ तंत्रज्ञ
  • तंत्रज्ञ-I व तंत्रज्ञ-II
  • सहायक अभियंता (दूरसंचार)
  • उप कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • विद्युत सहायक

या पदांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची माहिती उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 आहे.

या भरतीचा फॉर्म डाउनलोड व अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

वयोमर्यादा:

भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 57 वर्ष आहे.

अर्ज शुल्क:

पदांची नावे अर्ज शुल्क
अभियंता, कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता सर्वसाधारण प्रवर्ग: रु.700/-, मागास प्रवर्ग (एससी/एसटी): रु.350/-
विद्युत सहाय्यक सर्वसाधारण प्रवर्ग: रु.500/-, मागास प्रवर्ग (एससी/एसटी): रु.250/-
तंत्रज्ञ सर्वसाधारण प्रवर्ग: रु.600/-, मागास प्रवर्ग (एससी/एसटी): रु.300/-

रिक्त पदांची संख्या:

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 4494 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये:

  • कार्यकारी अभियंता (पारेषण) – 25
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) – 133
  • उप कार्यकारी अभियंता (पारेषण) – 132
  • सहायक अभियंता (पारेषण) – 419
  • सहायक अभियंता (दूरसंचार) – 09
  • वरिष्ठ तंत्रज्ञ – 126
  • तंत्रज्ञ-I – 185
  • तंत्रज्ञ-II – 293
  • विद्युत सहाय्यक – 2623
हे वाचा-  IT job: Infosys आणि TCS मध्ये नोकरी करण्याची संधी | 10 लाख रुपये पगार

या भरतीचा फॉर्म डाउनलोड व अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

शैक्षणिक पात्रता:

विभिन्न पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

पदांची नावे शैक्षणिक पात्रता अनुभव
कार्यकारी अभियंता (पारेषण) BE/B.Tech इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग 09 वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त 02 वर्ष अनुभव
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) BE/B.Tech इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग 07 वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त 02 वर्षे
उप कार्यकारी अभियंता (पारेषण) BE/B.Tech इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग पॉवर ट्रान्समिशनचा 03 वर्षांचा अनुभव
सहायक अभियंता (पारेषण) BE/B.Tech इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
सहायक अभियंता दूरसंचार BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन)
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) 06 वर्षे अनुभव
तंत्रज्ञ-I पारेषण प्रणाली ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) 04 वर्षे अनुभव
तंत्रज्ञ-II पारेषण प्रणाली ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) 02 वर्षे अनुभव
विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर)

अर्ज प्रक्रिया:

महापारेषण भरतीसाठी अर्ज ऑनलाईन माध्यमातूनच करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

हे वाचा-  12 पास असाल तर केंद्र सरकारच्या 17727 पदांसाठी करा अर्ज

निवड प्रक्रिया:

महापारेषण भरतीसाठी निवड प्रक्रिया सविस्तर जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून निवड प्रक्रियेची माहिती घेणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: लवकरच उपलब्ध होईल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2024

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page