व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर ही कागदपत्रे दाखवून तुम्ही मतदान करू शकता. | Voter Id

Voting without Voter ID: मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशा सर्व मार्गांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हीही तुमचं बहुमूल्य मत अगदी सहजतेने करू शकाल.

Voter Id : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत अनेकांना मतदार ओळखपत्राची चिंता सतावत आहे. मात्र मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक नाही. याशिवायही मतदान करता येते.

तुमचे वय 18 वर्षे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बूथवर जाऊन मतदान करू शकता. तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसले तरी तुम्ही इतर कोणत्याही ओळखपत्राने मतदान करू शकता. तुमचं नाव मतदार यादीत नसल्यास तुम्ही तुमचे नाव ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मतदार यादीत समाविष्ट करू शकता.

मतदान यादी मध्ये तुमचे नाव आहे का पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Voting without Voter id

 भारत हे जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांकडून चालवलेलं राज्य होय. अर्थातच लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत देशाचा गाढा हाकला जातो आणि हे लोकप्रतिनिधी निवडले जातात, मतदानाच्या माध्यमातून..भारतातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा इत्यादीसाठी मतदान होतं आणि लोक योग्य उमेदवाराला मतदान करतात. हे मतदान करण्यासाठी मतदानकार्ड आवश्यक असते. मतदानकार्डावरून तुम्हाला मतदानाची परवानगी दिली जाते. परंतु निवडणुकीपूर्वी तुमचे मतदार कार्ड (Voter ID) हरवले किंवा खराब झाले असेल तर? तुमचे मतदार कार्ड (Voting card)  हरवले किंवा खराब झाले असेल तर काळजी करण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला असे सर्व मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हीही तुमचे अमुल्य मत (Voting without Voting Card) सहजपणे देऊ शकता. 

हे वाचा-  मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती | mini tractor yojana.

हे 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार…

या कागदपत्रांमध्ये

  • मतदान ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • मनरेगा जॉब कार्ड
  • बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक
  • कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन
  • पॅन कार्ड
  • रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड
  • पासपोर्ट, फोटोसह पेन्शन डॉक्युमेंट
  • केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांयांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र
  • खासदार, आमदार यांनी जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र
  • भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष दिव्यांग प्रमाणपत्र

या कागदपत्रांच्या आधारे मतदारांना लोकसभा 2024 साठी मतदान करता येणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत नावे कशी जोडायची ?

तुम्हाला तुमचे नाव ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत समाविष्ट करायचे असेल, तर त्यासाठी निवडणूक आयोगाच्या साइटवर जाऊन फॉर्म क्रमांक 6 भरा. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता यासारखी मूलभूत माहिती द्यावी लागेल. यानंतर, हा दस्तऐवज अपलोड करा आणि तुमचे नाव मतदार यादीत नोंदवले जाईल.

ऑफलाइन पद्धतीने मतदार यादीत आपली नोंदणी करा

जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी आणि बूथ लेव्हल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधावा लागेल. यासाठी तुम्हाला त्यांच्या कार्यालयात जावे लागेल आणि तेथून फॉर्म 6 घ्यावा लागेल. तुम्ही फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे देखील सादर कराल आणि त्यानंतर तुमची माहिती मतदान क्षेत्राच्या बूथ लेव्हल ऑफिसरकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर तुम्ही निवडणुकीत मतदानाच्या दिवशी तुमचे मत देऊ शकता.

हे वाचा-  गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment