व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

आता मिळवा ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला… असा करा अर्ज!

सध्या दहावी आणि बारावीचे निकाल लागले आहेत, निकालानंतर विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. याबरोबरच पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन घेत असताना काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. यामध्ये एक कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला जो की तहसीलदाराकडून दिला जातो. याचबरोबर शिक्षणा व्यतिरिक्त बाकीच्या ज्या काही सरकारी योजना आहेत त्यांना सुद्धा उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य असते म्हणून सदरच्या लेखात आपण उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन प्रक्रियेने कसा काढला जातो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखला अनिवार्य

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते त्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्र म्हणून उत्पन्नाच्या दाखल्याकडे पाहिले जाते.

त्याचबरोबर शिक्षण घेत असताना जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात त्यांना सुद्धा हे कागदपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक अनुदानासाठी पात्र ठरतात त्यांना सुद्धा उत्पन्न दाखला देणे अनिवार्य असते.

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

इतर व्यवहारांसाठी उत्पन्न दाखला अनिवार्य

इतर व्यवहार म्हणजे जसे की आपण एखाद्या सरकारी योजनेसाठी पात्र आहोत की नाहीत हे त्या व्यक्तीच्या उत्पन्नावरून समजते म्हणूनच हा दस्तऐवज खूपच महत्त्वाचा आहे.

हे वाचा-  राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारच्या कोणकोणत्या घोषणा, Maharashtra Assembly Budget 2024 for farmers

उत्पन्नाच्या दाखल्यावरून त्या व्यक्तीची कोणत्याही व्यवहारासाठी पात्रता सिद्ध होत असते.

उत्पन्न दाखल्यामध्ये विशिष्ट कालावधीपर्यंतची तुमची उत्पन्न मर्यादा दिलेली असते. केल्यानंतर आठ ते पंधरा दिवसात उत्पन्न प्रमाणपत्र मिळते. प्रमाणपत्राची वैधता एक वर्ष ते तीन वर्षे त्या कालावधीसाठी असते.

उत्पन्नाचा दाखला कोठे मिळतो?

उत्पन्नाचा दाखला हे प्रमाणपत्र आपल्याला आपल्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात मिळतो.

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या “आपले सरकार” या ऑनलाइन पोर्टलवर देखील उपलब्ध होतो.

वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने आपणाला योग्य वाटेल त्या पर्यायाने आपण उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो.

आवश्यक कागदपत्रे

१. ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र)

२. अर्जदाराचा फोटो

३. पत्ता दर्शवणारा पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, पाणी किंवा वीज बिल, सातबारा किंवा आठ अ उतारा)

४. जर एखाद्याला वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असेल तर त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

५. स्वयंघोषणापत्र – हे सर्वांसाठी अनिवार्य आहे. अर्ज भरताना अर्जासोबत हे भरून देणे गरजेचेच आहे.

६. उत्पन्न दाखवणारी कागदपत्रे – शेतकरी असल्यास सातबारा आणि आठ अ चा उतारा, नोकरदारांसाठी फॉर्म नंबर 16, निवृत्त पेन्शन धारकांसाठी बँक प्रमाणपत्र, मंडल अधिकाऱ्याचा तपासणी अहवाल, प्राप्तिकर परतावा भरल्याचे प्रमाणपत्र.

हे वाचा-  महाराष्ट्राचा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प जाहीर | शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी विविध योजनांची घोषणा.

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराने सर्वप्रथम आपले सरकार ही अधिकृत वेबसाईटवर उघडा. येथे क्लिक करा https://aaplesarkar.mahaonline.gov.in
  • लॉगिन झाल्यानंतर नवीन पेज ओपन होईल, त्या पेजवरून तुम्ही तुमचा महसूल विभाग निवडा.
  • नंतर ‘महसूल सेवा’ हा पर्याय निवडा. यानंतर या पर्यायामधून ‘उत्पन्न प्रमाणपत्र’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • नंतर नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर आवश्यक कागदपत्रांची यादी दिलेली आहे, ती यादी व्यवस्थित पाहून घ्या. कारण त्या यादीतील सर्व कागदपत्रे आपल्याला वेबसाईटवर अपलोड करावी लागणार आहेत.
  • नंतर मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप वर एक नवीन अर्ज ओपन होईल यामध्ये तुम्हाला किती वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हवा आहे ते दिसेल. त्यानुसार तुम्ही माहिती अचूकपणे भरा.(कोणाचा दाखला हा १ वर्ष किंवा ३ वर्षापर्यंत मिळू शकतो)
  • अर्जदाराला जर शेती असेल तर त्याविषयी माहिती भरा. त्याचबरोबर उत्पन्नाची माहिती भरा.
  • नंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा तसेच अर्जदाराचा फोटो आणि सही देखील अपलोड करा.
  • नंतर अर्ज सादर करा तसेच अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा आणि शुल्क भरण्याची पावती सेव्ह करून ठेवा.

आपले सरकार या वेबसाईटवरून अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसापर्यंत तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र दिले जाते. जर काही अडचणीमुळे उत्पन्न प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही तर,तुम्ही पंधरा दिवसानंतर आपले सरकार या वेबसाईटवरून पुन्हा लॉगिन करून या अर्जासाठी अपील करू शकता.

हे वाचा-  PAN Card अजून आधारसोबत लिंक केलं नाहीये? ३१ मे पर्यंत जोडून घ्या, अन्यथा भरावा लागणार मोठा दंड | link your aadhar card to pan

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment