Land Survey New Different Rates:जमीन मोजणीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जमीन मोजणीच्या प्रकार आणि मोजणी फी मध्ये सुसंगतता यावी यासाठी आजपासून वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले . मोजणीच्या प्रकारामुळे निर्माण होणार सभ्रम व वाढता प्रशासकीय खर्च पाहता जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक कार्यालयाच्या वतीने यामध्ये बदल करण्यात आला आहे.
जमीन मोजणीच्या प्रकार आणि मोजणी फी मध्ये काल संगतता यावी आणि मोजणीच्या प्रकारामुळे निर्माण होणार संभ्रह व वाढता शासकीय खर्च पाहता जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक कार्यालयाच्या वतीने यात बदल करण्यात आला आहे.
आता नियमित आणि द्रुतगती अशा दोन प्रकारात जमिनीच्या मोजणी करण्यात येणार असून , तातडी , तातडी आणि अति तातडीच्या जमीन मोजणीचा प्रकार आता निकाली निघाला आहे.जमीन मोजणीची फी व दर बदलले असेल तरी एक डिसेंबर पूर्वी अर्ज दाखल केले आहेत त्यांना जुन्याच पद्धतीने आकारणी होईल.
जमिनीच्या मोजणीची नवे प्रकार आणि त्याचे फायदे
मोजणीचे प्रकार पुढील प्रमाणे
- साधी
- तातडीची
- अतितातडीची
- अति अतितातडीची मोजणी
असे मोजण्याचे प्रकार असतात व त्यानुसार मोजणीची फी ठरते. साधारण साधी मोजणी 180 तातडीची मोजणी 120 दिवसात तर अति तातडीची मोजणी 60 दिवसात तर अति अति तातडीची मोजणी ही दहा दिवसात केली जाते. मोजणीचे वेगवेगळे स्वतः किंवा आपण नेमून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत उपस्थित रहावे.मोजणीसाठी आवश्यक सामग्री व वस्तू जमीविणे व मोजणीसाठी मदत करणे.हे आजूबाजूचे सर्व शेत जमिनी धारकांचे कर्तव्य आहे मोजणी करताना संपूर्ण गटाची वा सर्व्हे नंबरची मोजणी करावे.
नियमित मोजण्यासाठी किमान 20 दिवसाचा कालावधी
नियमित मोजणीसाठी किमान 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे हा कालावधी अर्ज केल्यापासून गृहीत धरण्यात येणार आहे तर दूध गती मोजणीसाठी कमाल 30 दिवसांचा कालावधी यापुढे राहणार आहे दरम्यान नियमित मोजणीची प्रक्रिया करताना अनेक अडचणी येतात या सर्व अडचणी सोडविण्यासाठी काही तातडीने जमिनीची मोजणी पूर्ण करण्यासाठी आता भूमी अभिलेख अधिकाऱ्याने पुढाकार घेतला आहे त्यामुळे अधिक वेगाने जमिनीची मोजणी करता येणं शक्य होणार आहे.
किती राहणार मोजणी फी?
महानगरपालिका तसेच पालिका हद्दीबाहेरील क्षेत्रातील जमीन मोजणीसाठी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत नियमित मोजणीसाठी 2 हजार रुपये आणि दूतगती मोजणीसाठी 8 हजार रुपये फी आकारले जाईल. 2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रासाठी अर्थात उर्वरित क्षेत्रासाठी अनुक्रमे 1000 आणि 4 हजार रुपयाप्रमाणे आकारणी केली जाणार आहे. त्यासोबतच मनपा आणि पालिका हद्दीमधील क्षेत्रात 1 हेक्टरचे मर्यादित 3 हजार रुपये दूतगतीसाठी 12 हजार रुपये आणि 1 हेक्टर मर्यादा पेक्षा अधिक क्षेत्रासाठी दीड हजार रुपये आणि दूतगतीसाठी ₹6,000 असा दर राहील. कंपनी इतर संस्था, महामंडळे भूसंपादन, संयुक्त मोजण्यासाठीचे ही दर निश्चित केले गेले आहेत.
जमीन मोजण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- विविध नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टॅम्प सह.
- गाव नमुना सातबाराचा उतारा अखीव पत्रिकेचा उतार.
- मोजणी फी भरण्याबाबतचे चलन.
- मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाज हे नकाशा, अगर जमिनीच्या कोणत्या बाजू बाबत हद्दीची तक्रार व कोणत्या बाजूची हद्द काय करून पाहिजे याचा तपशील.
- लगत खातेदाराचे नाव व पत्ता.
नव्या नियमांचे नागरिकांना होणारे फायदे
या बदलामुळे मोजणी प्रक्रियेत लागणारा कालावधी निश्चित झाल्यामुळे नागरिकांचा बराच वेळ वाचणार आहे. शिवाय प्रक्रिया अधिक पारदर्शक व सोपी झाली असल्यामुळे लोकांना आधीपेक्षा वेगवान सेवा मिळेल. विविध प्रकारातील गोंधळ दूर झाल्यामुळे शासकीय खर्चातही बऱ्याच प्रमाणात बचत होणार आहे.
नवीन दर लागू होण्याची तारीख आणि पूर्वीचे अर्ज
नव्या दरांची अंमलबजावणी ही दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. परंतु 1 डिसेंबर पूर्वीचे अर्ज दाखल झाले आहे. त्यांच्यासाठी जुन्या दरानुसारच मोजणी शुल्क आकारले जाईल. त्यामुळे जुन्या अर्जदारांना चिंता करायचे काही कारण नसणार आहे.
महत्वाची सूचना
- शासकीय जमीन मोजणी करतेवेळी त्याची चित्रफित शक्य झाल्यास काढून ठेवावी.
- कालांतराने हद्दीसंबंधी वाद निर्माण झाल्या चित्रफीतव्हिडिओ शूटिंग महत्वाचा पुरावा म्हणून मांडता येतो.
- जमीन किंवा प्लेट मोजणी झाल्यानंतर आपल्या हद्दीत कुंपण टाकून घ्यावे.
- फ्लॅट किंवा जमीन खरेदी करतेवेळी शासकीय जमीन मोजणी करूनच विकत घ्यावे.
- त्यामुळे पुढे शेजारील व्यक्तीचा किंवा या जमिनीच्या वारसांचा त्रास होत नाही.
- साधी मोजणी 180 दिवस तातडीची मोजणी 80 दिवस अति तातडीची मोजणी सात दिवस असा साधारणता कालावधी आहे.