नमस्कार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि कौटुंबिक दृष्ट्या सक्षम बनवणे,हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये महिन्याला १५००रू जमा केले जातात. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सरकारने या योजनेचे ६ हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत. या योजनेअंतर्गत राज्य शासनाने महिला सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सुमारे २ कोटी ४० लाखापेक्षा जास्त महिला घेत आहेत. परंतु काही ठिकाणी असे निदर्शनास आले आहे की, या योजनेच्या अटी व शर्ती डावलून अनेक महिलांनी सदर योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सदर योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे असे प्रशासनाकडून सांगितले आहे. अर्ज पडताळणी नंतर अपात्र महिलांच्यावर कारवाई केली जाणार आहे असे सुद्धा प्रशासनाकडून सांगितलेले आहे. म्हणून अर्ज पडताळणी नंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांनी स्वतः अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे. म्हणूनच आपण सदर लेखांमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे कसा घ्यायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.
लाडक्या बहिणींना 45 हजार रुपये मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत ६ हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. यावरूनच ही योजना खूपच यशस्वी झाली आहे असे दिसून येते.परंतु राज्यातील काही महिलांनी या योजनेच्या अटी व शर्ती डावलून लाभ घेतल्याच्या बाबी समोर आलेले आहेत. सरकारने याबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सरकार सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी करणार असून, पडताळणी मध्ये ज्या महिला पात्र असतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. निकष डावलून ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांकडून या योजनेअंतर्गत दिली जाणारी संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे.
तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणीपूर्वी अनेक महिलांनी या योजनेचा अर्ज मागे घेतला आहे. अशा महिलांची संख्या जवळपास ४५०० असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे कसा घ्यायचा?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज सरकारकडून पडताळणी न करता घेण्यात आले होते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सर्व महिलांनी घेतला होता. परंतु नंतर काही ठिकाणाहून या योजनेविषयीच्या तक्रारी येऊ लागल्या. यामध्ये काही महिलांनी या योजनेचे निकष डावलून लाभ घेतला आहे असे दिसून आले. त्यानंतर सरकारने अर्जाची पडताळणी करून अपात्र महिलांच्या कडून दंड वसूल करणार आहे असे स्पष्ट केले.
सध्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा नाही किंवा ज्या महिला अपात्र असून सुद्धा त्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला आहे आणि आता या योजनेतून त्यांना बाहेर पडायचे आहे अशा महिला त्यांचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन करू शकतात. अर्ज मागे कसा घ्यायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
लाडक्या बहिणींना 45 हजार रुपये मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. 👇
- https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in
- या योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तक्रार निवारण हा पर्याय निवडायचा आहे.
- तक्रार निवारण पर्याय निवडल्यानंतर त्यामध्ये तुम्ही योजनेसाठी पात्र नाही असे सांगायचे आहे.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घेण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे अर्ज सादर करू शकता. खालीलप्रमाणे प्रक्रिया करा:
1. अर्ज तयार करा:
योजनेचा अर्ज मागे घेण्याबाबत एक साधा अर्ज लिहा.
अर्जात तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, वय, आणि अर्ज मागे घेण्याचे कारण स्पष्टपणे नमूद करा.
अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन तक्रार नोंदवून मागे घेऊ शकता.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ७ वा हप्ता या तारखेला येणार..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने आत्तापर्यंत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ६ हप्ते जमा केले आहेत.
राज्यातील पात्र महिलांना आता ७ व्या हप्त्या कधी मिळणार याबाबतची उत्सुकता लागली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ज्यांनी सांगितल्याप्रमाणे, या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ७वा हप्ता प्रजासत्ताक दिनापूर्वी म्हणजेच 26 जानेवारी च्या अगोदर सर्व लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे,असे समजते.
सदर लेखामध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे कसा घ्यायचा? याबाबतची माहिती पाहिली आहे. जर तुम्ही या योजनेचे निकष डावलून लाभ घेतला आहे तर, तुम्ही या योजनेसाठी अर्ज पडताळणीमध्ये अपात्र ठराल. म्हणूनच कारवाईपूर्वी तुम्ही स्वतःहून वरील माहितीच्या आधारे अर्ज मागे घेऊ शकता. धन्यवाद!