मान्सून पूर्व पाऊस हा सर्वसाधारणपणे एप्रिल पासून सुरू होतो. आणि मान्सूनच्या आगमना अगोदर हा संपतो. पण हा पाऊस त्याच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पडत असतो. प्रामुख्याने वीज पडण्याच्या घटना या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर घडत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व त्याचबरोबर वित्तहानी होत असते.
भारतामध्ये प्रत्येक वर्षी सुमारे ३००० पेक्षा जास्त लोक हे वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडतात. वीज पडणे ही काही पूर्वसूचना न देता घडणारी घटना आहे त्यामुळे अचानक पणे पावसाला सुरुवात झाली तर वीज कधी कोसळेल याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती ही कोणालाच मिळत नाही.
कुठे वीज पडेल सांगणारे ॲप
या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी सरकारने दामिनी या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ४० किलोमीटर अंतरावर जर वीज पडण्याची शक्यता असेल तर तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून वीज पडण्याची पूर्वसूचना कळणार आहे.
दामिनी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
या स्टेप नुसार तुम्हाला पूर्वसूचनेनुसार कळेल की तुमच्या भागात वीज पडेल की नाही
- विज पडण्याची पुरुषचना मिळण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून दामिनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
- हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये Damini: Lightning Alert असे नाव टाकून सर्च करावे लागेल.
- हे आपलिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमची प्राथमिक माहिती भरावी लागेल, या माहितीमध्ये तुम्हाला तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा निवासी पत्ता तसेच पिन कोड व तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती भरणे आवश्यक आहे.
- या ॲप्लिकेशन मधून तुम्हाला जी माहिती किंवा सूचना हवी आहे,ती कोणत्या भाषेमध्ये पाहिजे त्या भाषेची निवड करणे गरजेचे आहे.
- तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता याची माहिती देण्यासाठी जीपीएस सेटिंग मधून परवानगी घ्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला एक हिरवी किंवा लाल स्क्रीन दिसेल याचा अर्थ तुम्ही ज्या भागात राहता त्या भागाच्या ४० किलोमीटर अंतरावर कोणता विजेता धोका आहे की नाही हे यावरून तुम्हाला कळेल.
- जर लाल स्क्रीन दिसत असेल तर तुमच्या भागात वीज पडू शकते किंवा पडण्याची दाट शक्यता आहे असा त्याचा अर्थ होतो.
- तुमच्या भागात वीज पडण्याची शक्यता असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवाल याबद्दलची माहिती आणि महत्त्वाच्या सूचनाही यामध्ये देण्यात आलेले आहेत.
हे मोबाईल ॲप्लिकेशन प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेणे खूप गरजेचे आहे कारण सध्या वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही मिळणाऱ्या सूचनेला आणि माहितीला फॉलो करून स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल.