व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

महिलांना कमी दरात मिळणार विना गॅरेंटीचं लोन; एसबीआयचे ‘नारी शक्ति’ कार्ड आणि विशेष कर्ज योजना. Loan for womens

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 च्या निमित्ताने महिलांसाठी आर्थिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) यांनी महिलांसाठी विशेष कर्ज आणि बँकिंग सुविधा सादर केल्या आहेत. यामुळे महिला उद्योजक आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एसबीआयच्या ‘नारी शक्ति’ कार्डची वैशिष्ट्ये

भारतीय स्टेट बँकेने महिला उद्योजकांसाठी ‘अस्मिता’ योजना आणि ‘नारी शक्ति’ प्लॅटिनम डेबिट कार्ड सादर केले आहे.

  • विना गॅरेंटी कर्ज – महिलांना कमी व्याजदरात आणि विनातारण कर्ज मिळणार आहे.
  • स्पेशल डेबिट कार्ड – महिलांसाठी डिझाइन केलेले ‘नारी शक्ति’ प्लॅटिनम डेबिट कार्ड विशेष फायदे देईल.

महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

एसबीआयच्या या नव्या योजनेमुळे महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करताना आणि वाढवताना आर्थिक अडचणींवर मात करता येईल. कमी व्याजदराने मिळणाऱ्या कर्जामुळे त्यांना व्यवसाय विस्तार करणे सहज शक्य होईल.

एसबीआयच्या चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी सांगितले की, “महिला उद्योजकांना मदत करणं हा आमच्या बँकेचा उद्देश आहे. ‘नारी शक्ति’ आणि ‘अस्मिता’ योजनांमुळे महिलांना आर्थिक स्वायत्तता मिळेल.”

बँक ऑफ बडोदाची खास ऑफर

बँक ऑफ बडोदानेही महिला ग्राहकांसाठी ‘बॉब ग्लोबल वुमन्स एनआरई आणि एनआरओ सेव्हिंग्ज अकाउंट’ सुरू केले आहे. या खात्यांत महिलांना अनेक फायदे मिळतील:

  • ठेवींवर अधिक व्याजदर – महिलांसाठी जास्त व्याजदर
  • कमी शुल्कात कर्ज – गृहकर्ज, वाहन कर्ज कमी प्रोसेसिंग फीसह
  • विशेष सुविधा – लॉकर भाडे सवलतीत, विमा संरक्षण, आणि लाउंज सुविधा
हे वाचा 👉  घरकुल यादी मोबाईल वर कशी पहावी ?| Gharkul Yadi Kashi Pahavi

महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम

या नव्या बँकिंग योजनांमुळे महिलांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करता येईल. कमी व्याजदर, सुलभ कर्ज, आणि विशेष डेबिट कार्डच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबनासाठी उत्तेजन देण्याचा प्रयत्न आहे.

महिला दिन 2025 हा महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरणाचा नवा टप्पा ठरेल, यात शंका नाही!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page