भारतातील एक अशी चारचाकी गाडी जी अत्यंत कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झाली होती. 90 च्या दशकामध्ये ही गाडी एखाद्याची श्रीमंती दर्शवत असे. पण कालांतराने नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून डिझाईन केलेल्या गाड्या बाजारामध्ये आल्यामुळे या गाडीची लोकप्रियता कमी झाली. ही चारचाकी गाडी म्हणजे टाटा सुमो होय. पण आता पुन्हा एकदा टाटा सुमो शौकिनांसाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे टाटा मोटर्स पुन्हा एकदा सुमो नव्या अवतारा मध्ये बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्स कंपनीने जर ही गाडी नव्या फीचर्स बाजारामध्ये आणली तर सध्याच्या नामवंत कंपन्या महिंद्रा, स्कार्पिओ यांना टॉप कॉम्पिटिशन देऊ शकते. आपण या पोस्टमध्ये नवीन टाटा सुमो 2025 मध्ये काय खास असेल! याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.
टाटा मोटर्स कंपनीच्या टाटा सुमो गाडीविषयी थोडक्यात..
टाटा मोटर्स कंपनीने 1994 मध्ये टाटा सुमो बाजारात आणली होती. त्यावेळी या गाडीने बाजारामध्ये अक्षरशः लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. टाटा मोटर्स कंपनीने ही गाडी खास करून मोठ्या कुटुंबांसाठी आणि कमर्शियल वापरासाठी बनवली होती. टाटा सुमो गाडीचे मजबूत इंजिन, दमदार रचना आणि 7 ते 9 लोक सहजपणे बसू शकतील अशी रचना या गाडीची होती. यामुळेच ही गाडी शहरांबरोबरच ग्रामीण भागातही खूप लोकप्रिय झाली होती. पण, 2019 मध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरून अनेक चार चाकी गाड्या डिझाईन करण्यात आल्या यामुळे बाजारपेठांमध्ये टाटा सुमोची मागणी कमी झाल्यामुळे टाटा मोटर्सने या गाडीचे उत्पादन थांबवले.
पण आता, 2025 मध्ये टाटा मोटर्स सुमो गाडीला नव्या लूकमध्ये परत आणत आहे. ही बातमी टाटा सुमो शौकिनांसाठी खूपच आनंदाची आहे.
टाटा सुमो 2025- संभाव्य किंमत आणि या तारखेला येणार बाजारामध्ये
टाटा मोटर्स 2025 मध्ये इंडिया मोबिलिटी एक्सपोमध्ये गाडी लॉन्च करण्याची शक्यता आहे. परंतु बाजारामध्ये ही गाडी 2025 च्या शेवटी किंवा 2026 च्या सुरुवातीला उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे.
टाटा सुमो गाडीची संभाव्य किंमत ही..
- बेस्ट व्हेरियंट: ₹12 लाख (एक्स शोरूम)
- टॉप वेरियंट: ₹16 लाख (एक्स शोरूम)
असू शकते.
टाटा सुमो 2025- असा असेल गाडीचा नवा लुक आणि डिझाईन
नवीन टाटा सुमो गाडी नवीन टेक्नॉलॉजीनुसार डिझाईन केली जाणार आहे. टाटा मोटर्स या गाडीला SUV गाड्यांप्रमाणे दमदार आणि प्रीमियम लुक देणार आहे.
बाह्य डिझाईन (Exterior Design)
- जुन्या टाटा सुमो प्रमाणेच, पण जरा जास्तच मॉडर्न आणि दमदार लुक मध्ये नवीन बोल्ड फ्रंट ग्रील या गाडीमध्ये असणार आहेत.
- या गाडीला आधुनिक आणि स्टायलिश लुक देणाऱ्या एलईडी हेडलाइट्स आणि डीआरएल दिव्यांची जोडणी करण्यात येणार आहे.
- ही गाडी रस्त्यावर भारदस्त दिसण्यासाठी मोठे आणि आकर्षक टायर (19 इंच किंवा 20 इंच) असणार आहेत.
- ही गाडी खराब रस्त्यावरून सहजपणे जाऊ शकेल यासाठी उंच ग्राउंड क्लिअरन्स असणार आहेत.
इंटिरियर आणि कम्फर्ट (Interior & Comfort)
- ही गाडी मोठ्या कुटुंबांसाठी आणि कमर्शियल वापरासाठी 7 सीटर आणि 9 सीटर अशी डिझाईन केली जाणार आहे.
- नवीन टाटा सुमो गाडी डिजिटल डिस्प्ले (Apple CarPlay आणि Android Auto Dupport सह) आणि स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टीम सह डिझाईन केली जाणार आहे.
- या गाडीमध्ये फुल डिजिटल स्पीडोमीटर आणि नव्या टेक्नॉलॉजी चे पिक्चर्स असणार आहेत.
- उन्हाळ्यामध्ये थंड हवेसाठी मागच्या सीटवर बसलेल्या प्रत्येक सीटसाठी एसी वेंट्स असणार आहेत.
टाटा सुमो2025- इंजिन आणि परफॉर्मन्स
टाटा मोटर्सने टाटा सुमो ही गाडी लॉन्च केल्यानंतर जर तुम्ही ही गाडी घेणार असाल तर, या गाडीचे इंजिन पावरफुल आणि इंधन बचत करणारी असणार आहे. या गाडीमुळे इंधन बचतीबरोबरच तुमच्या पैशाची ही बचत होणार आहे.
- नवीन टाटा सुमो मध्ये 2.0 -लिटर Kryotec डिझेल इंजिन (170-180 BHP Power आणि 350Nm टॉर्क) असणार आहे.
- या गाडीमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन असणार आहे.
- या गाडीमध्ये 4×4 ड्राईव्ह ऑप्शन असल्यामुळे खराब रस्ता असो की डोंगराळ भाग ही गाडी सहजपणे धावू शकणार आहे.
- या गाडीमध्ये इंधन खर्च कमी करण्यासाठी पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे.
या पोस्टमध्ये आपण टाटा मोटर्सचे आगामी आकर्षण टाटा सुमो 2025 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे. टाटा मोटर्सने जर ही गाडी पुन्हा भारतीय बाजारामध्ये परत आणली तर ती पुन्हा लोकप्रियता प्राप्त करू शकेल, हे निश्चित! अशा डिझाईनमध्ये टाटा मोटर्स ही गाडी लॉन्च करणार आहे. जर तुम्ही टाटा सुमो या गाडीचे शौकीन असाल, तर तुमच्यासाठी हे एक आगामी आकर्षण आहे. धन्यवाद!