व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रु |महाराष्ट्र नवनिर्वाचित सरकारकडून लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला २१०० रु |Mukhymantri Manjhi Ladki Bahin Yojana 2100 ₹

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील एक महत्त्वाचा बदल आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

या योजनेतील एक महत्त्वाचा बदल म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ची रणधुमाळी आपणास पहावयास मिळाली. या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्याचे आश्वासन लाडक्या बहिणींना दिले होते. हे आश्वासन म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना देण्यात येणारी १५०० रुपयाच्या रक्कमेमध्ये वाढ करून ती २१०० रुपये देण्यात येतील. हे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.

सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने प्रचंड विजय मिळवला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणारी २१०० रुपयांची आर्थिक मदतीचे आश्वासन या विजयामुळे लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे. आपण सदर लेखांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जरी पुन्हा एकदा या योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून अर्ज मागवले तर राज्यातील महिलांना या योजनेची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे माहित व्हावे यासाठी पुन्हा एकदा सदरचा लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. यामध्ये आपण लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता काय आहे? त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे अर्ज प्रक्रिया काय आहे? याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

हे वाचा-  Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check Maharashtra Online | माझी लाडकी बहीण योजना DBT स्टेट्स कस चेक करायचं?

आपण सदर लेखांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जरी पुन्हा एकदा या योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून अर्ज मागवले तर राज्यातील महिलांना या योजनेची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे माहित व्हावे यासाठी पुन्हा एकदा सदरचा लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. यामध्ये आपण लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता काय आहे? त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे अर्ज प्रक्रिया काय आहे? याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराने खालील पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे:

  • अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेचे वय सदर योजनेसाठी २१ ते ६५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • ज्या कुटुंबातील महिला सदर योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नसावा त्याचबरोबर आयकर भरणारा नसावा.
  • अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नसावा.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चार चाकी वाहने नसावीत. शेतीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर सोडून इतर वाहने नसावीत.

वरील पात्रता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना पूर्ण करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्राचे पूर्तता अर्जदाराने करणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • महिलेचा जन्म परराज्यात असेल तर पतीचे रेशन कार्ड/मतदान कार्ड/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
हे वाचा-  Gram panchayat yojana 2024 तुमच्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या कोणकोणत्या योजना सुरू आहेत, असे पाहा मोबाईलवर ऑनलाईन 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदाराने वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदार हा ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतो. आपण ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील संबंधित अंगणवाडीत जावे लागेल.
  • अंगणवाडी सेविकेकडून तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन अर्ज घ्यावा लागेल.
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्हाला या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतो त्याची लिंक खाली दिली आहे.👇🏼👇🏼👇🏼 https://ladakibahin.maharashtra.gov.in/
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक रित्या द्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, बँकेचे नाव, बँक खाते नंबर, आयएफएससी कोड इ.
  • अर्ज भरून झाल्यावर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
  • कागदपत्रे जोडल्यानंतर व अर्जावर भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासायचे आहे आणि तुमचा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे.
  • अर्ज जमा केल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून अर्जाची पोचपावती अर्जदाराने घ्यायला विसरू नये. हे खूप महत्त्वाचे आहे.

अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करू शकता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत:

  • सर्वप्रथम अर्जदाराने या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोबाईल वर Google Play Store वरून Narishakti Doot हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर हे ॲप ओपन करा आणि मोबाईल नंबर टाकून अटी आणि शर्ती वरती क्लिक करा आणि OTP पडताळणी करून लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यानंतर ॲपचे मुख्य पृष्ठ ओपन होईल त्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढील स्टेप मध्ये योजनेचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल तो तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचा आहे आणि फॉर्म च्या शेवटी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Accept हमीपत्र डिस्क्लेमर यावर टिक करून माहिती जतन करा यावर क्लिक करा.
हे वाचा-  सोलर पॅनलसोबत बॅटरीवर मिळणार का सबसिडी,जाणून घ्या सविस्तर | can solar subsidy also available for battery.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करून तुम्ही या योजनेअंतर्गत २१०० रुपयाची आर्थिक मदत मिळवू शकता.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र होण्याची कारणे

  • अर्जदार महिलेचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान नसणे.
  • आधार कार्डावर दिलेला पत्ता आणि अर्जातील पत्ता एक सारखा नसणे.
  • आधार कार्ड आणि अर्जातील नाव यामधील विसंगती असल्यामुळे अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • आधार कार्ड क्रमांक चुकीचा नोंदवल्यामुळे अर्ज अपात्र होऊ शकतो.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अर्ज अपात्र होतो.
  • एकल बँक खाते नसणे,या कारणामुळे देखील अर्ज अपात्र होतो.

वरील कारणामुळे एखाद्या महिलेचा अर्ज हा अपात्र होऊ शकतो त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे.

सदर लेखांमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना १५०० रुपये ऐवजी आता २१०० रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात येणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page