व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पीएम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत या महिलांना मिळतात 6000 रुपये.. जाणून घ्या संपूर्ण माहिती! Pm matruvandana scheme 2025

PM Matrutva Vandana Yojana

नमस्कार, सदर लेखामध्ये आपण केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी राबवलेली एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. सदर योजना ही केंद्र सरकारने गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची उद्दिष्टे व फायदे काय आहेत? त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत सदर महिलांना किती रक्कम दिली जाणार आहे? या योजनेच्या पात्रता कोणत्या आहेत? सदर योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते? सदर योजनेसाठी अर्ज कसा करायचा? ही संपूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात आपण खाली पाहूया.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना उद्दिष्टे

  • या योजनेअंतर्गत महिलांना गरोदरपणात कामाचा ताण कमी करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • गरोदरपणात महिलांना त्यांच्या पोषणाची योग्य सुविधा मिळून नवजात बाळाचे आणि मातांचे आरोग्य निरोगी रहावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • गरोदर महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे हेही या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत नियमित संपर्क ठेवून मातांच्या आरोग्याची निगा राखणे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना फायदे

  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे गरोदर महिला व स्तनदा मातांना पोषक आहार घेण्यास प्रोत्साहन मिळते.
  • महिलांमध्ये गरोदरपणाविषयी आरोग्याची जाणीव या योजनेमुळे निर्माण होते.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा आर्थिक ताण कमी होतो.
  • नवजात शिशूंच्या लसीकरणाला चालना मिळून बालमृत्यूचे प्रमाण कमी होते, तसेच गरोदरपणात किमान एकदा तरी आरोग्य तपासणी करण्याचे प्रमाण वाढते.
हे वाचा 👉  वोटर हेल्पलाईन ॲप मधून नवीन मतदान कार्ड काढा. |Apply for voter id card from voter helpline app.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम

सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 5,000 रुपयांची रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. लाभार्थी महिला जननी सुरक्षा योजना अंतर्गत पात्र असेल तर सदर महिलेला अतिरिक्त 1,000 रुपये दिले जातात. असे एकूण लाभार्थी महिलेला सदर योजनेअंतर्गत 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.

सदर योजनेअंतर्गत मिळणारा पहिला हप्ता 1,000₹

  • सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी गरोदरपणाची नोंदणी अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य केंद्रात करणे आवश्यक आहे.
  • सदरची नोंदणी ही गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात करणे आवश्यक आहे.

सदर योजनेअंतर्गत मिळणारा दुसरा हप्ता 2,000₹

  • सदर योजनेअंतर्गत मिळणारा दुसरा हप्ता हा सहाव्या महिन्याच्या शेवटी दिला जातो.
  • गरोदर महिलेने किमान एक प्रि-नेटल चेक-अप(गर्भावस्थेतील तपासणी) करून घेणे आवश्यक आहे.

सदर योजनेअंतर्गत मिळणारा तिसरा हप्ता 2,000₹

  • बाळाच्या जन्मानंतर लसीकरण (BCG,OPV,DPT) पूर्ण झाल्यावर दिला जातो.
  • या योजनेअंतर्गत मिळणारा तिसरा हप्ता घेण्यासाठी मुलाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना पात्रता

  • सदर योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सदरची योजना ही फक्त पहिल्या गरोदरपणासाठी लागू आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी गरोदर महिलेचे वय 19 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये नियमित काम करणाऱ्या महिला सदर योजनेसाठी पात्र नाहीत.
  • अंगणवाडी सेविका किंवा आशा कार्यकर्ता सदर योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे व तिच्या पतीचे आधार कार्ड अनिवार्य आहे.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
हे वाचा 👉  लाडकी बहीण योजना बंद? अजित पवार यांच्या घोषणेमुळे राज्यात खळबळ!

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (गरोदर महिला व तिच्या पतीचे आधार कार्ड आवश्यक)
  • निवास प्रमाणपत्र
  • गरोदरपणाच्या नोंदणीचा पुरावा
  • बँक खात्याचा तपशील
  • तिसऱ्या हप्त्यासाठी बाळाच्या जन्माचे प्रमाणपत्र

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अर्ज कसा करायचा?

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आपण ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे सविस्तरपणे पाहू:

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सदरच्या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://pmmvy.wcd.gov.in
  • वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर Apply Online हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर वापरून खाते तयार करा.
  • सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून अर्ज सबमिट करा.

अशा पद्धतीने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • तुमच्या जवळच्या अंगणवाडी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या.
  • तिथून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा अर्ज मिळवा आणि सदर अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरा.
  • त्यानंतर भरलेल्या अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज अंगणवाडी सेविकांकडे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जमा किंवा सबमिट करा.

अशा पद्धतीने तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने सदर योजनेचा अर्ज करता येतो.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना लाभाची स्थिती कशी तपासायची?

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम लाभार्थ्याला मिळाली आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला सदर योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम मिळाली आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://pmmvy.wcd.gov.in
  • वेबसाईटवर गेल्यानंतर ई-मेल आयडी आणि पासवर्ड द्वारे खाते उघडा.
  • त्यानंतर Payment Status किंवा Beneficiary Status हा पर्याय निवडा.
  • लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून सर्च करा.
  • त्यानंतर तुमच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची स्थिती तपासा.
हे वाचा 👉  3KW चे सोलार सिस्टम बसवा, मोफत वापरा टीव्ही, फ्रीज, कुलर, एसी, फॅन. सोबतच मिळवा सूर्यघर योजनेअंतर्गत 78 हजार रुपये अनुदान

अशा पद्धतीने तुम्ही सदर योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम मिळाली आहे की नाही हे तपासू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची संबंधित अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधू शकता. तुम्हाला काही तांत्रिक समस्या असल्यास 011-23382393 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.

सदर लेखाच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही देशातील गरोदर महिलांसाठी कशी फायदेशीर आहे, हे आपण सविस्तरपणे पाहिले आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन मातृत्वाचा प्रवास अधिक आरोग्यपूर्ण करू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page