व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

आजोबांनी 1994 मध्ये 500 रुपयांचे शेअर्स खरेदी केले अन् सांगायला विसरले, आज नातू झालाय लाखोंचा मालक. | The power of compounding of share.

चंदिगढच्या एका डॉक्टरांना घरातील जुन्या वस्तू शोधताना एक सुखद धक्का बसला. डॉक्टर तन्मय मोतीवाला हे बालरोग सर्जन आहेत. घरातील जुन्या वस्तूंमध्ये त्यांना अनपेक्षितपणे काही कागदपत्रं आढळली आहेत. तन्मय यांच्या आजोबांनी १९९४ मध्ये म्हणजे जवळपास ३० वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी केले होते. हे शेअर्स त्यांच्यासाठी मोठ्या लाभाचे ठरले आहेत.

Man Discovers Grandfather SBI Shares Worth 500 rupees Bought In 1994

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असल्याचे अनेकदा म्हटले जाते. जाहिरातींमध्येही शेअर मार्केटमध्ये स्वत:च्या रिक्सवर गुंतवणूक करा असे सांगितले जाते. पण शेअर मार्केटमधील गुंतवणूक काहीवेळा किती फायदेशीर ठरू शकते हे चंढीगडचे रहिवासी डॉ. तन्मय मोतीवाला यांच्यापेक्षा चांगले कोणीही सांगू शकत नाही.

तुम्ही अशा प्रकारचे शेअर खरेदी करून लखपती होऊ शकता. शेअर्स खरेदी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

१९९४ मध्ये तन्मय यांच्या आजोबांनी ५०० रुपये किंमतीचे स्टॅट बँक ऑफ इंडियाचे काही शेअर्स खरेदी केले होते. आजोबांनी हे शेअर्स तसेच ठेवले होते, कोणाला विकले देखील नव्हते. शिवाय ते या शेअर्सबाबत विसरुन गेले होते. त्यामुळेच त्यांनी घरातील इतर सदस्यांना याची माहिती दिली नव्हती. पण, तन्मय यांना घरातील जुन्या वस्तूंमध्ये हा शेअर्सचा खजिना सापडला आहे.

हे वाचा-  pm suryaghar yojana 2024 in marathi | सूर्यघर योजनेअंतर्गत ७८ हजार रुपये सबसिडी सह 300 मोफत वीज मिळणार

१९९४ साली खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत आता चांगलीच वाढली आहे. डॉक्टर तन्मय यांनीच दिलेल्या माहितीनुसार, या शेअर्सची एकूण किंमत सध्या ३.७५ लाख रुपये आहे. याचाच अर्थ त्यांनी खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत तब्बल ७५० पटींनी वाढली आहे. इक्विटीमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक किती लाभदायक ठरु शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.

डॉक्टर तन्मय यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ‘एक्स’ Twitter या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलंय की, माझ्या आजोबांनी १९९४ मध्ये पाचशे रुपयांचे एसबीआयचे शेअर्स खरेदी केले होते. ते याबाबत विसरले होते. त्यांनी शेअर्स का खरेदी केले होते आणि त्यांनी ते तसेच का ठेवले याबाबत त्यांना आठवत नाही. मला घरातील काही वस्तू शोधताना हे शेअर्स सापडले.

महिन्याला फक्त एक हजार रुपयांची गुंतवणूक करून व्हा तब्बल अडीच कोटी रुपयांचे मालक.

रक्कम मिळण्यात आल्या अडचणी

मोतीवाला पुढे म्हणाले की, मला मिळालेल्या कागदपत्रांनुसार त्या शेअरचे मूल्य ७५० पटीने वाढले आहे. तन्मयच्या त्या शेअरची आजची किंमत ३.७५ लाख रुपये आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, “मी अनेकांना विचारले की त्याची सध्याची किंमत काय आहे, अनेकांनी योग्य माहिती दिली नाही, पण हो, त्याचा नफा ३० वर्षांत ७५० पटीने वाढला आहे. प्रत्यक्षात ही मोठी रक्कम आहे. पण ती मिळवताना खूप समस्या येतील कारण त्याच्या प्रक्रियेसाठी बरीच कागदपत्रे सादर करावी लागतील.

हे वाचा-  महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा जनावर खरेदी विक्रीचा ग्रुप | Maharashtra district wise animal buy sell group

डॉक्टर पुढे म्हणतात की

‘अनेकजण मला विचारत होते की, या शेअर्सची किंमत आता किती झाली आहे. आता या शेअर्सची किंमत जवळपास, लाभांश (dividends) वगळून ३.७५ लाख इतकी आहे. ही काही मोठी रक्कम नाही. पण, गेल्या तीस वर्षांत या शेअर्संची किंमत ७५० पटींनी वाढली आहे.’

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment