नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण या लेखांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 वा हप्ता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा केला जाईल? त्याचबरोबर आता पीएम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी कशी करायची? याबाबतची ही माहिती आपण पाहूया.
पीएम किसान सन्माननिधी योजनेविषयी थोडक्यात..
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते, ज्याद्वारे देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. पी एम किसान सन्माननिधी योजना ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळे या योजनेला 100% निधी भारत सरकारकडून मिळतो.
या योजनेअंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्याला 3 समान हप्त्यामध्ये 4 महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2000 रुपये शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १८ व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑक्टोंबर 2024 रोजी केले होते. आता देशातील शेतकऱ्यांना सदर योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण कधी होणार याची उत्सुकता लागली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी असे सांगितले आहे की, सदर योजनेचा 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी बिहारला भेट देणार आहेत. त्याच दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जमा करतील. असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे. म्हणजेच सदर योजनेचा 19 वा हप्ता केंद्र सरकारकडून फेब्रुवारी 2025 च्या अखेरीस लाभार्थ्यांना वितरित केला जाईल. त्याचबरोबर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे देखील अनिवार्य आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना ई-केवायसी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्याला खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.
- आधार कार्ड
- आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल नंबर
- बँक खाते तपशील
पीएम किसान सन्मान निधी योजना ई-केवायसी कशी करायची?
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत 3 समान हप्त्यांमध्ये 4 महिन्यांच्या अंतराने 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची ई-केवायसी असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या योजनेचा फायदा फसवेगिरी करून बनावट व्यक्ती घेत आहेत का? हे ई-केवायसी च्या माध्यमातून माहीत होऊ शकते. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थांच्या/एजंटच्या सहभागाशिवाय या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे हा उद्देश्य ई-केवायसी करण्यामागचा आहे.
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी प्रक्रिया 3 पद्धतीने करता येते. आपण याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती खाली पाहूया:
OTP आधारित ई-केवायसी
- ओटीपी आधारित केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼 https://PM-Kisan.gov.in
- त्यानंतर तुम्हाला Farmers Corner विभागातील e-KYC या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करून Search या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून Get OTP वर क्लिक करा.
- तुम्हाला प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करून Submit बटनावर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही OTP आधारित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी
- बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटर (Common Service Centre) मध्ये किंवा एसएसके सेंटर (State Service Centre) ला भेट द्यावी लागेल.
- या सेंटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बायोमेट्रिक प्रमाणे तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते.
अशा पद्धतीने तुम्ही बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
फेस ऑथेंटीकेशन आधारित ई-केवायसी
- फेस ऑथेंटीकेशन आधारित ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून PM-Kisan Mobile App 👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan आणि Aadhaar Face RD App 👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd डाउनलोड करा.
- त्यानंतर पी एम किसान ॲप मध्ये लॉग-इन करून ई-केवायसी पर्याय निवडा.
- आधार क्रमांक प्रविष्ट करून चेहऱ्याचे स्कॅनिंग करा.
अशा पद्धतीने तुम्ही फेस ऑथेंटीकेशन आधारित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
वरील 3 प्रक्रियांच्या आधारे तुम्ही पी एम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
सदर लेखांमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी वितरित केला जाणार आहे? त्याचबरोबर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. ही ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची? याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. जर तुम्ही सुद्धा अजून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर वरील माहितीच्या आधारे तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!