व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

चीनचा नवीन शोध, कधीही चार्जिंग न संपणारी बॅटरी, किंमत फक्त इतकीच

आज आपल्याला एका नवीन टेक्नॉलॉजीचा वेध घ्यायचा आहे, ही टेक्नॉलॉजी भविष्यात सर्वत्र वापरली जाणार आहे. आपण पाहिले तर कोणतेही इलेक्ट्रिक वस्तू जी आपण वायरलेस वापरत आहे. त्यामध्ये गरजेचा घटक असतो तो म्हणजे बॅटरी ही बॅटरी आपल्याला वारंवार चार्ज करावी लागते, आपल्याला सध्या दैनंदिन जीवनात इलेक्ट्रिक गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. पण आपल्याला आता ही बॅटरी चार्ज करावी लागणार नाही . चीन देशातील एका कंपनीने एक नवीन बॅटरी लॉन्च केली आहे. चीन हा देश नवनवीन टेक्नॉलॉजी साठी प्रामुख्याने ओळखला जातो. चीनमध्ये बीजिंग स्थित बीटा वोल्ट कंपनीने अशी एक नवीन टेक्नॉलॉजी वापरून पाच रुपयाच्या नाण्यापेक्षाही लहान बॅटरीचा शोध लावलेला आहे.

ह्या बॅटरीचे चार्जिंग कधीही संपणार नाही

सध्याच्या काळात इलेक्ट्रिसिटी फार महत्त्वाची गोष्ट आहे .व ती स्टोअर करण्यासाठी बॅटरी ची गरज भासतेच , या बॅटरीची किती तास काम चालायची क्षमता यावर या बॅटरी ची किंमत ठरत असते. मात्र बीजिंग मधील बीटा वोल्ट कंपनीने अशी बॅटरी तयार केली आहे .जी चार्जिंग शिवाय तब्बल ५० वर्षे टिकू शकते ,ही बॅटरी एक न्यूक्लिअर बॅटरी आहे .या बॅटरी मध्ये ॲटॉमिक अनुंचा चा वापर करून या बॅटरी मध्ये एनर्जी तयार केली जाते आणि बॅटरी आत्तापर्यंतची सर्वात लहान बॅटरी आहे .ऑटोमिक अणूंचा रिएक्शन ही सतत होत असून ह्या बॅटरी मधील चार्जिंग कधीच संपणार नाही.

हे वाचा-  आयुष्मान कार्ड चा लाभ कसा मिळेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

या बॅटरीचा वापर कसा होईल

बॅटरीची चाचणी ही यशस्वीरित्या घेण्यात आलेली आहे .ती येत्या भविष्यकाळात स्मार्टफोन लॅपटॉप यामध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जाईल ,कारण जर ही बॅटरी या इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट मध्ये वापरली तर ही उपकरणे पुन्हा पुन्हा चार्ज करावी लागणार नाहीत.

सध्या आधुनिक टेक्नॉलॉजी मध्ये ड्रोन चा वापर केला जात आहे. ड्रोन मध्ये कमी वजनाची बॅटरी वापरणे गरजेचे असते, पण सध्या जास्त वजनाच्या बॅटरी वापरली जात, असल्यामुळे इतर फारसे आधुनिक गॅजेट्स ड्रोन वरती फिट करता येत नाहीत. पण जर तिथे न्यूक्लिअर बॅटरीचा वापर केला ,तर अत्यंत कमी जागेत चांगले एनर्जी देणारी बॅटरी आपल्याला वापरता येणार आहे.

आज-काल कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी रोबोट, मायक्रो रोबोट वापरले जातात , रोबोटला देखील चार्ज करावे लागते किंवा सतत इलेक्ट्रिक सप्लाय चालू ठेवावा लागतो पण न्यूक्लिअर बॅटरी चा वापर रोबोटमध्ये केला तर इलेक्ट्रिसिटी टेन्शन संपून जाईल.

ही बॅटरी ए आय जगात खूप मोठी क्रांती घडवून आणणारे ठरेल, असे कंपनीने म्हटले आहे कारण वैद्यकीय उपकरणे, अँरो स्पेस, या गॅजेट्स मायक्रोप्रोसेसर अशा बऱ्याच गोष्टींमध्ये ही बॅटरी बदल घडवून आणू शकते.

बॅटरी कशा रीतीने तयार केलेली आहे

जर ,आपण ह्या बॅटरीचा विस्तार पाहिला तर 15×15×5 असा आहे ही बॅटरी आणि आयसोटोप आणि डायमंड सेमीकंडक्टरच्या पातळ वेफर थरांनी बनलेली आहे. सध्या कंपनीचे उद्दिष्ट 2025 पर्यंत ही बॅटरी 1 वॅट ते 100 वॅट पावर वर आणण्याचे कंपनीचा प्रयत्न आहे. सध्या ही बॅटरी तीन होल्टवर 100 मायक्रोव्हेट वीज निर्मिती करते , बॅटरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यातून निघणारे रेडिएशन्स मानवाला हानिकारक नाहीत .त्यामुळे ही बॅटरी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

हे वाचा-  नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज पाठवा | how to send WhatsApp message without save mobile number.

किती असेल या बॅटरी ची किंमत

साधारणपणे मोबाईल मध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरी ची किंमत अजून देखील प्रत्यक्षरीत्या जाहीर केलेली नाही. पण अंदाजे किंमत सात ते आठ हजारापर्यंत कधीही न संपणारी बॅटरी आपल्याला मिळेल , यामुळे तुमच्या फोनची किंमत सात ते आठ हजारांनी वाढण्याची शक्यता आहे . इतर उपकरणांसाठी त्याच्या एनर्जीनुसार त्यामध्ये लागणारे बॅटरी ची किंमत कमी जास्त होईल.

बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका नाही

सध्याच्या युगात पहिल्यांदा ही बॅटरीची संकल्पना विकसित व यशस्वीरित्या तयार करण्यात आले आहे. या बॅटरी मध्ये होणाऱ्या रिॲक्शन मुळे बॅटरीमध्ये होणाऱ्या आयसोटोप मधून एनर्जी तयार होते .चीनने त्यांच्या 2021 2025 योजनेअंतर्गत अनु बॅटरी लहान करण्याचा प्रयत्न केला आहे. बॅटरी चे डिझाईन हे लेअर असते. त्यामुळे गरम होऊन किंवा सडन फोर्सकडून आग लागून बॅटरी फुटण्याचा धोका नसतो ,बॅटरी -60 ते 120 कमाल डिग्री तापमानात ही बॅटरी वापरता येते .असा दावा कंपनीने केलेला आहे

बॅटरी चा उपयोग उपकरणांमध्ये करण्यासाठी कंपनीला आवश्यक त्या परवानग्या घ्याव्या लागतील .योग्य ती पडताळणी चाचणी करून ह्या बॅटरीचा उपयोग करून आपली उपकरणे बाजारात लॉन्च करू शकते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment