व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तुमच्याही घरात बसविले जाणार प्रीपेड स्मार्ट मीटर. | स्मार्ट प्रीपेड मीटर |smart electricity prepaid meter.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

थकबाकी खोळंबली असल्याने महावितरणचे अर्थकारणच विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्यात स्मार्ट प्रीपेड वीजमीटर (Smart Prepaid Meter) लावण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून, अदानीसह मे. एनसीसी, मे. मोन्टेकार्लो आणि मे. जीनस या 4 कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे.

राज्यभरात 2,24,61,346 मीटर बदलले जातील. हा प्रकल्प एकूण 26,923.46 कोटींचा आहे. चारही कंपन्यांना वेवगेवळ्या विभागाचे कंत्राट मिळाले आहे. दिवाळीनंतर मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रीपेड स्मार्ट इलेक्ट्रिसिटी मीटर

तुमच्या घरात प्रीपेड स्मार्ट मीटर आहे का ? जर नसेल तर येत्या काही दिवसात लवकरच महावितरण तर्फे ते बसवले जाईल. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या धोरणानुसार हे नवीन मीटर बसवण्यात येणार आहे. यापूर्वी आपण महिनाभर वीज वापरत व महिन्याच्या शेवटी वीज बिल भरत आहोत .पण या मीटरमध्ये आपल्याला पहिला रिचार्ज करावा लागणार व त्यानुसार आपल्याला वीज वापरता येणार.

प्रीपेड मीटर लावल्याने विज बिलाचे झंझट संपेल. ग्राहक जितक्या रक्केमसाठी रिचार्ज करतील, तेवढीच विज वापरता येणार. तुम्ही १०-१५ दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी बाहेर जात असाल तर तुम्ही स्मार्ट मीटर बंद करू शकता.

तुमच्या जमिनीची मोजणी किंवा तुमच्या जमिनीमधील एखाद्या प्लॉटची मोजणी करण्यासाठी आता मोबाईलवर ॲप आले आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

प्रीपेड स्मार्ट मीटर म्हणजे काय?

प्रीपेड स्मार्ट मीटर हे विजेचा वापर मोजण्यासाठी असलेले एक नवीन तंत्रज्ञानानुसार तयार केलेले मीटर आहे . आपल्या पूर्वीच्या मीटरनुसार तुम्ही महिन्याभर वीज वापरून मग बिल भरायचे, तर प्रीपेड मीटरमध्ये तुम्हाला आधी रिचार्ज करून वीज वापरावी लागणार. प्रीपेड मीटरमध्ये एक डिवाइस बसवलेले आहे.जे मोबाइल टॉवर्सद्वारे विद्युत कंपन्यांच्या रिसीव्हरला सिग्नल पाठवते. यामुळे, विद्युत कंपन्या ऑफिसमधून मीटरची रीडिंग आणि निरीक्षण करू शकतात.

हे वाचा 👉  आधार कार्डशी कोणता नंबर लिंक आहे हे जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही या पद्धतीने शोधू शकता. |Aadhar Card Mobile Number Link

१० लाख रुपयांच्या सरकारी कर्जावर 35% अनुदान मिळवा.👇

महावितरण च्या बाबतीत आपण पाहिले तर महावितरण कर्मचाऱ्यांना वीज चोरा रोखण्यासाठी बऱ्याच वेळेला छापा टाकावा लागतो . छापा टाकून देखील ते वीज चोरी थांबवू शकत नाहीत ,त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात महावितरणला तोटा होतो.  बरेच ग्राहक असे असतात की , ती वेळेवर बिल भरत नाहीत. त्यामुळे थकबाकीचा आकडा हा वारंवार वाढत जातो. त्यामुळे वितरण कंपनीला मोठा आर्थिक फटका बसतो.  रीडिंग घेताना चुकीची पद्धतीने रीडिंग घेतल्याने ग्राहक वीज कंपनी यांच्यामध्ये समस्या उद्भवतात. आणि अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर ग्राहक विजेची बिले थकीत ठेवतात.  या स्मार्ट प्रीपेड मीटरच्या अनुषंगानुसार वरीलपैकी कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. कारण या मीटरमुळे वीज चोरी करता येत नाही . विज बिल देखील थकीत ठेवता येत नाही.

प्रीपेड स्मार्ट मीटर चे फायदे

प्रीपेड स्मार्ट मीटर चे फायदे खालील प्रमाणे आहेत :

  • प्रीपेड स्मार्ट मीटर च्या नुसार तुम्हाला  हव्या त्या कंपनीची वीज वापरता येणार आहे व याबाबतीत तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे .
  • तुम्ही जेवढा रिचार्ज करणार ,तेवढीच वीज तुम्हाला वापरता येणार.
  • तुम्ही कुठूनही रिचार्ज करू शकता.
  • तुम्ही तुमच्या वीज वापरावर लक्ष ठेवू शकता आणि तुम्हाला किती वीज वापरली आहे आणि किती शिल्लक आहे हे तुम्हाला माहित असते.
  • तुम्ही तुमच्या खात्यात पैसे नसल्यास तुमचे कनेक्शन कट होणार नाही. तुम्हाला रिचार्ज करण्याची आठवण करून देण्यासाठी अलार्म सेट केले जाऊ शकतात.
  • जर तुम्ही स्मार्ट प्रीपेड मीटर वापरत असाल तर ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कोणतेही औद्योगिक क्षेत्रामध्ये वीज वापरत असताना जर तुम्हाला अतिरिक्त विजेची आवश्यकता असेल ,तर तुम्ही एक्स्ट्रा रिचार्ज करून तुम्हाला हवी तेवढी वीज वापरू शकता.
  • जर यामध्ये कोणी छेडछाड केली  किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर याचा मेसेज डायरेक्ट वीज कंपनीला जाईल  व वापरकर्त्याच्या विरोधात कारवाई होऊ शकते.
  • तुम्हाला वीज बिल भरण्यासाठी ,वीज बिल भरणा केंद्राचे चक्कर काढावे लागणार नाहीत.
  • या मीटर मध्ये मॅन्युअल मीटर सारखे तुमचे रीडिंग घ्यावे लागत नाही. त्यामुळे वीज कंपनी कर्मचाऱ्यांचे तुमच्या घरी येण्याची आवश्यकता नाही.
  • वीज कंपनी कर्मचारी त्यांच्या केंद्रावरूनच कोणत्या घरामध्ये किती किती वीज वापरली गेली, याची गणना करू शकतात.
  • त्याचबरोबर यापूर्वी होणाऱ्या मीटर रिडींगच्या चुकामुळे जास्तीचे येणारे लाईट बिल किंवा अतिरिक्त लागणारे चार्जेस आपोआपच कमी होतील.
  • स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये तुम्हाला तुम्ही किती वीज वापरला .त्याची किती रक्कम झाली, मागील महिन्यात तुम्ही किती वीज वापरली गेली आहे. ते तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने त्यामध्ये बघू शकाल.

प्रीपेड स्मार्ट मीटर कोणत्या पद्धतीने कार्य करते.

सध्या जे मीटर वापरले जात आहेत .ते दर महिन्याच्या मीटर रिडींग वीज बिल कंपनीकडून घेण्यात येते व त्यानुसार आपल्याला वीज बिल पाठवले जाते .पण आता नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये आपण किती विजेचा वापर केला आहे. याची आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे .ही माहिती आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून केव्हाही पाहता येते. वया मीटरच्या माध्यमांनुसार ग्राहक त्याच्या गरजेनुसार व आर्थिक बजेनुसार वीज वापरू शकतो. साधारणपणे 2025 पर्यंत देशांमध्ये सगळे मीटर बदलण्याचा उद्दिष्ट निश्चित केलेले आहे .यासंबंधी बऱ्याच ठिकाणी काम सुरू देखील करण्यात आलेले आहे. घरामध्ये आपण विजेचा वापर किती केला आहे व तुमच्या रिचार्ज मधील किती पैसे शिल्लक आहेत याची सर्व माहिती वीस ग्राहकाला मोबाईल ॲप द्वारे बघता येणार आहे. विजेसाठी भरलेले पैसे जर मध्यरात्री संपले तर रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा बंद केला जाणार नाही .सायंकाळी सहा ते दहा ह्या वेळेत जर पैसे संपले तरी देखील वीजपुरवठा चालूच राहील .तुम्हाला तुमच्या मोबाईल द्वारे विज बिल्ला चे पैसे संपले आहेत हे कळविण्यात येईल व त्यानंतर बारा तासांनी वीज ऑटोमॅटिकली बंद होईल.

हे वाचा 👉  आधार कार्ड कसे डाउनलोड करावे | how to download Aadhar card.

प्रीपेड स्मार्ट मीटर चे तोटे

भारत हा एक विकसनशील देश आहे. अजून देखील बऱ्याच गरीब व मध्यमवर्ग कुटुंबांमध्ये वीज व्यवस्थित रित्या पुरवली जात नाही. पण  जर तिथे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले गेले तर त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्या कारणाने बरेच लोक रिचार्ज करू शकणार नाहीत. त्यामुळे ते वीज वापरापासून वंचित राहू शकतात त्यामुळे अशा गरीब कुटुंबांना अंधारात बसावे लागणार. व या स्मार्ट प्रीपेड बसवल्यानंतर बऱ्याच खाजगी कंपन्या वीज पुरवण्यासाठी तयार आहेत पण वीज कंपन्यांचे खाजगीकरण झाल्यावर विज बिल हे जास्त प्रमाणात देखील आकारले जाऊ शकते . ते मध्यमवर्गीय लोकांना खिशाला परवडणारे नाही.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page