व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

बँकेत FD करण्यापेक्षा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून मिळवा 4 पट परतावा

नमस्कार मित्रांनो आजकाल आपण पाहतच आहे की भारत आर्थिक दृष्ट्या फार पुढे गेलेला आहे .कारण भारत हा एक विकसनशील देश आहे व या भारताची सध्याची परिस्थिती पाहिली तर भारत देश हा खूप झपाट्याने सर्वदृष्ट्या प्रगती करत आहे

त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनाबरोबर थोडीशी बचत करून आपण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या वयोवृद्ध काळात व आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग होईल. व आपण आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत की ज्यामधून आपल्याला चांगल्या प्रमाणात त्या पैशांमधून व्याज किंवा डिव्हीडंट मिळाला पाहिजे .जसे की म्युच्युअल फंड आपण जर पैसे बँकेत ठेवले तर बँक आपल्याला त्या पैशाची सात वर्षांनी दाम दुप्पट करून देते.

व आपल्याला त्याच्यातून गुंतवणुकीच्या मानाने फारसा फायदा होत नाही. आपल्याला जर कमी कालावधीत कमी गुंतवणुकीत जर जास्त प्रमाणात आपल्याला जर रिटर्न हवा असेल. तर आपण कधीही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक चांगलेच याचा फायदा असा होतो की आपल्याला कमी कालावधीत जास्त रिटर्न मिळतो व बँकेपेक्षा कधीही फायदेशीर तर मग आपण आता जाणून घेऊया म्युच्युअल फंडचा फंडा.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकी विषयी विश्लेषण

आजकालचे तरुण मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट व म्युच्युअल फंड या या सर्वांकडे मोठ्या प्रमाणात तरुण पिढीचा कल आहे. म्युच्युअल फंड जग विस्तारित आहे .आपण पाहिलेच असेल की दूरदर्शन ,रेडिओ, सोशल मीडि,या इत्यादींवर बऱ्याच प्रमाणात म्युच्युअल फंड सही है अशी जाहिरात मोठ्या प्रमाणात सध्या केली जाते .गुंतवणूक आणि वेल वेल्थ क्रिएशन यासाठी म्युच्युअल फंड एक उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून त्याकडे भारतीय गुंतवणूकदार व सध्याची तरुण पिढी पाहत आहे .जर आता आपण बघायला गेले तर भारताचा म्युच्युअल फंड व्यवस्थापन सध्या रुपये 47 लाख कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. हे एक फार मोठे रक्कम आहे व भारताच्या विकासाचे एक चिन्ह आहे. म्युच्युअल फंड्स मध्ये सध्या गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या तब्बल सात कोटींच्या घरात आहे .

हे वाचा-  True Balance Loan App : ट्रू बॅलन्स अ‍ॅप वरून ₹50000 चा लोन, फक्त 10 मिनिटांत

म्युच्युअल फंड माध्यमातून आपले गुतविलेले पैसे पुढे नेमके कुठे गुंतवले जातात ? म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणूकदारांना कसा फायदा होतो ? अशा व्यापक आणि वाढणाऱ्या म्युच्युअल फंड वित्तीय व्यवस्थेचे आपण एक भाग आहात का? गुंतवलेल्या पैशांची सुरक्षा किती ? इतर गुंतवणुकीच्या तुलनेने यात फायदा नेमका कसा? म्युच्युअल फंड चे नेमके प्रकार किती आणि कोणते? यावर सर्व माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे चांगले आहे का?

सर्व गुंतवणूकदारांना काही ना काही झोखीम असतेच जर आपल्याला जास्त प्रमाणात रिटर्न हवा असेल .तर आपल्याला जोखीम तर घ्यावी लागणारच परंतु म्युच्युअल फंड ही सामान्यतः वैयक्तिक स्टॉक खरेदी करण्यापेक्षा सुरक्षित गुंतवणूक मांडली जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांना परताव्याचे हमी मिळते म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा एक मोठा फायदा आहे .की ते फायनान्शियल एक्सप्रेस टीम द्वारे हे सर्व काही मॅनेज करतात. त्यामुळे गुंतवणुकीच्या पद्धती आणि पैसे काढण्याच्या पद्धतीमध्ये लवचिकता हा म्युच्युअल फंडाचा इतर गुंतवणुकीच्या पर्यायाच्या तुलनेने एक मोठा फायदा आहे. म्युच्युअल फंड हा वैयक्तिक गुंतवणूकदारांना व्यावसायिक मनी व्यवस्थापनाचा अनुभव आणि लाभ घेण्यासाठी कमी किमतीत जास्त मार्ग प्रधान करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडांना कमीत कमी गुंतवणूकदारांचे फार जास्त आवश्यकता. व ते त्याच्या शोधात असतात म्युच्युअल फंड हा लहान गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी व त्याच्यावरती पूर्ण वेळ व्यवस्थापन ठेवण्यासाठी .आणि त्याची देखरेख करण्यासाठी तुलनेने स्वस्त मार्ग आहे .सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात जोखीम घेऊन स्टॉक मध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे. कधीही फायदेशीर ठरू शकते.

हे वाचा-  Moneyview वर पर्सनल लोन घेऊन आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करा | get personal loan from moneyview app.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी सध्याची वेळ चांगली आहे का ?

जर आपण पाहिले तर मागील आर्थिक वर्ष 31 डिसेंबर 2023 पर्यंत भारताची म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन 50,77,900 कोटींपर्यंत पोहोचले आहे .जर आपण भारताची मागील वर्षाचे म्युच्युअल फंड उद्योगाचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट अखेर 31 डिसेंबर 2013 रोजी ८.२६ ट्रिलियन वरून 31 डिसेंबर 2023 पर्यंत ५०.७८ ट्रिलियन पर्यंत जाऊन पोहोचला आहे. मागील दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तब्बल सहा पटीने याच्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे इथून पुढे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे .कारण भारताचा सजसा आर्थिक विकास होत जाईल .तसतसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेले तुमचे फंड देखील वाढत जातात . त्यामुळे सध्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही एक चांगली वेळ आहे.

म्युच्युअल फंड मध्ये सर्वात सुरक्षित गुंतवणूक कोणती ?

आपण जर पाहिले तर ठेव प्रमाणपत्र मनी मार्केट खाती मुन्सिपल बोंड आणि ट्रेझरी इन्फेक्शन प्रोडक्टेड सिक्युरिटीज सर्वात सुरक्षित गुंतवणूक करण्याचा प्रकार आहे. म्युच्युअल फंडामध्ये जर आपण दीर्घकालीन गुंतवणूक केली .तर आपल्याला आपल्या कमाईचा लाभांश किंवा व्याज पुन्हा गुंतवणुकीत गुंतवता येते आणि वाडीची क्षमता वेगाने वाढवता येते दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे बाजारातील अस्थिरतेचा सामना करण्यास आणि विविध दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण करण्यात मदत होऊ शकते.

हे वाचा-  क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी CIBIL स्कोअर किती असायला हवा. | Credit card cibil score requirement

भारतामधील सर्वोत्कृष्ट टॉप म्युचल फंड कंपनी

  • एसबीआय म्युच्युअल फंड
  • आय सी आय सी प्रेडेन्शिअल म्युच्युअल फंड
  • एचडीएफसी म्युच्युअल फंड
  • डीएसपी ब्लॅक रॉक म्युच्युअल फंड
  • आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड
  • कोटक म्युच्युअल फंड
  • एल अँड टी म्युच्युअल फंड
  • टाटा म्युच्युअल फंड
  • निकोन इंडिया म्युचल फंड
  • सुंदरम म्युच्युअल फंड

या सर्व भारतामधील सर्वोत्कृष्ट म्युच्युअल फंड कंपन्या आहेत.

एफडी पेक्षा म्युच्युअल फंड का चांगला आहे ?

एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित परतावा मिळतो तर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

FD पेक्षा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे का चांगले ठरते.

  • पेशेवर व्यवस्थापन: म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अनुभवी गुंतवणूकदारांकडून व्यावसायिक व्यवस्थापन मिळते त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्यास जास्त मदत होते.
  • विविधता: म्युच्युअल फंड तुम्हाला विविध प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात त्यामुळे तुमचे जोखीम कमी होण्यास मदत होते.
  • जास्त परतावा: दीर्घकाळात म्युच्युअल फंड एफडी पेक्षा जास्त परतावा देण्याची शक्यता असते हे बाजाराच्या वाढीमुळे शक्य होते.
  • लवचिकता: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे आणि लवचिक आहे तुम्ही त्याच्या गरजेनुसार गुंतवणूक रक्कम आणि कालावधी निवडू शकता व तुम्हाला हवे असेल तेव्हा तुम्ही तुमची गुंतवणूक परत काढून घेऊ शकता.

तुमच्या गुंतवणुकीचे ध्येय काय आहे? जर तुम्ही दीर्घकाळात पैसे वाढवण्याचा विचार करत असाल तर तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे जर तुम्ही थोडीशी जोखीम घेण्यास तयार असाल तर व गुंतवणुकीचे काही ज्ञान आणि अनुभव असेल तर एफडी पेक्षा म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे हे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कधीही चांगले.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page