व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Land Documents: जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते?

Land Documents नमस्कार जमिनीच्या मालकी हक्कावरचे वाद नवीन नाहीत. विविध कारणामुळे लोकांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामध्ये जमिनीच्या मालकीचे हक्क त्याचा उपयोग आणि विविध इतर कारणामुळे वाद निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत आपल्याकडे त्यांच्याशी संबंधित दोष पुरावे असणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी खाली दिलेल्या काही महत्त्वाचे दस्तावेज आणि पुरावे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

१) खरेदीखत ( Sale Deed)

जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमीन खरेदी केली असल्यास खरेदी खत हे त्यांचा मूळ पुरवा मानले जाते. खरेदी खतामध्ये व्यापाराची तारीख दोन व्यक्तींची नावे जमीन किती क्षेत्रावर आहे, आणि आणि किती किमतीला खरेदी केली आहे त्याची सविस्तर माहिती असते. हे खरेदीखत जमिनीच्या मालकीचा पहिला पुरावा ठरतो.

खरेदी खत झालं की ती माहिती फेरफार वर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.

  • खाजगी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया काय आहे?
  • शेतातून विजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास किती मोबदला मिळायला हवा?
  • 1985 सालापासून खरेदी खत जुने दस्त ऑनलाईन कसे पाहायचे?

२) सातबारा उतारा

जमिनीचा उतारा हा जमिनीचा मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे. त्याचा किती जमिनीवर ते अधिकार आहे हे नमूद केलेलं असतं. त्यावरून जमिनीचा खरा मालक कोण? त्याची ओळख ज्या पटण्यास सुद्धा मदत होते. आणि आता सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा देखील उपलब्ध करून दिला आहे.

हे वाचा-  आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा लाईट | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला वाढ करण्यात येणार.

सातबारा उताऱ्यावर उदाहरणात पद्धत नमूद केलेली असते. यावरून जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख पटण्यास मदत होते.

  • भोगवटदार वर्ग एक या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
  • भोगवटदार वर्ग दोन मधील जमिनीचा हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचा हस्तांतर होत नाही.
  • तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या सरकार यावर प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
  • चौथ्या प्रकारात सरकारी पट्टेदार जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडे तत्त्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनीत 10,30 ,15 किंवा 99 वर्षाच्या मदतीसाठी भाडेतत्त्वावर दिला जातात.

३) खाते उतारा किंवा आठ अ

काही वेळा, एकाच शेतकऱ्याची जमिनी अनेक गट क्रमांकामध्ये विभागलेले अजून शकते. कुठल्या गट क्रमांक ची माहिती एकत्रितपणे खाते उत्तरांमध्ये नोंदवलेली असते तसेच आठ अ उताऱ्यावर तुमच्या मालकीची जमीन कोण कोणत्या गटात आहे याची सुस्पष्ट माहिती मिळू शकते यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी हा दस्तावेज महत्त्वाचा ठरतो.

४) जमीन मोजणीचे नकाशे

जमिनीच्या मालकीवर वाद निर्माण झाल्यास जमीन मोजणी केले जातात. मोजणीचे नकाशे या संदर्भात महत्त्वाचे ठरतात. कारण त्यात शेतजमीन कोणाच्या नावावर आहे त्या व्यक्तीचे नाव आणि त्यांच्या नावावर किती जमीन आहे याची माहिती असते. या नकाशाचा वापर करत मालकी हक्क सिद्ध केला जाऊ शकतो.

हे वाचा-  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: अनुदानात भरीव वाढ | Farmers subsidy increased.

५) जमीन महसुलाच्या पावत्या

दरवर्षी जमिनीचा महसूल झाल्यानंतर त्याला तलाठ्याच्या माध्यमातून मिळवलेली पावती ही महत्त्वाची ठरू शकते. ही पावती जमिनीच्या मालकीच्या पुरावाच्या रूपात वापरता येते. यामुळे तुम्ही आपल्या जमिनीचा नियमित महसूल भरला असल्याचे सिद्ध करू शकता.

६) जमिनी संबंधित पूर्वीचे खटले

तुम्ही जर एखादी जमीन तुमच्या मालकीची असल्याचे सिद्ध केले असेल आणि त्या जमिनीवर पूर्वी एखादा खटला चालला असेल तर त्या खटल्याचे कागदपत्र ,निकाल पत्रक इत्यादी महत्त्वाचे असतात. याचा वापर जमिनीवर तुमचा हक्क सिद्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो.

७) प्रॉपर्टी कार्ड

बिगर शेत जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्या जमिनीच्या हक्काबद्दल प्रॉपर्टी कार्ड एक महत्त्वाचा कागद आहे. हे कार्ड त्या जमिनीवरील मालकीची आणि त्या मालकाच्या हक्काची माहिती प्रदान करते. जसे सातबारा उताऱ्यावर शेतजमिनी ची माहिती दिली जाते तसा प्रॉपर्टी कार्ड संबंधित मालमत्तेची माहिती देतो.

जमिनीच्या मालक्यावर वार निर्माण होऊ शकतात परंतु योग्य कागदपत्रे आणि पुरावे असणे आवश्यक आहे.

ज्या पद्धतीने सातबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती असते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेती जमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्ड वर दिलेली असते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page