व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून शेतजमीन खरेदीसाठी आता मिळणार कर्ज, शेतजमीन खरेदीसाठी कसे घ्यायचे कर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

नमस्कार, आपला आजचा लेख शेतजमीन खरेदी करून शेती व्यवसाय करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. याचे कारण म्हणजे आता शेतजमीन खरेदी करण्यासाठी भारतातील अग्रमानांकित बँक स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्ज दिले जात आहे. त्यामुळे आपण कर्ज घेऊन शेती खरेदी करून शेती व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यामध्ये आपण स्टेट बँक इंडिया कडून जमीन शेतजमीन खरेदीसाठी किती कर्ज दिले जाते त्याचबरोबर सदर कर्जासाठी काय पात्रता आहे? आणि हे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? म्हणून तुम्ही हा लेख शेवटपर्यंत पहा.

आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. देशातील जवळपास 50% पेक्षा जास्त लोक शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. सध्या शेती क्षेत्रामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या प्रगत तंत्रज्ञानाच्या वापर करून शेती क्षेत्रामध्ये फायदा चांगला मिळत आहे. परंतु देशातील बहुतांश लोक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. परंतु त्यांच्याकडे शेत जमीन नसल्यामुळे ते शेती व्यवसाय करू शकत नाहीत. हे लोक किंवा शेतकरी शेतजमीन खरेदी करून शेती व्यवसाय करू शकतात परंतु शेतजमिनी खरेदी करण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत असू शकते परंतु त्यांना आता काळजी करण्याची काही गरज नाही. कारण भारतातील एक अग्रमानांकित बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अशा व्यक्तींना किंवा शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करते. पण स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची कर्ज योजना विशेषतः लहान शेतकरी व भूमिहीन शेतमजुरांना मदत करण्यासाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भूमी शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदीसाठी मदत करणे हा आहे.

हे वाचा-  गुगलचं मोठं अपडेट, स्विच ऑफ फोनचं मिळणार लोकेशन; आलं नवीन Find My Device

स्टेट बँकेकडून दहा लाखांचे कर्ज घेतल्यास महिन्याला किती रुपयांचा हप्ता बसेल याची माहिती पहा.

शेतजमीन खरेदी करण्यासाठी मिळणारे कर्ज व परतफेडीचा कालावधी

स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला जमिनीच्या व्हॅल्युएशन नुसार 85% पर्यंत कर्ज देते. सदरच्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा 9 ते 10 वर्षाचा आहे. कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर शेतकऱ्याला खरेदी केलेल्या जमिनीचा मालकी हक्क मिळतो. सदरच्या कर्जाची परतफेड कर्जदाराला सहामाही हप्त्यांमध्ये करता येते.

एसबीआय कडून शेतजमीन खरेदीसाठी कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता

एसबीआय कडून शेत जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्यासाठीच्या काही अटी व शर्ती आहेत. त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते आपण खाली पाहू:

  • सदर कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार हा थकीत कर्जदार नसावा.
  • सदर कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा किमान 2 वर्षाचा कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड चांगला असावा.
  • भूमीन शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी इतर बँकांकडून घेतलेले कर्ज वेळेवर फेडलेले असेल ते शेतकरी सुद्धा अर्ज करू शकतात.
  • 2.5 एकर पेक्षा कमी बागायती जमीन असलेल्या शेतकऱ्यांना देखील जमीन खरेदीसाठी कर्ज मिळू शकते त्याचबरोबर 5 एकर पेक्षा कमी बागायती जमीन असलेले शेतकरी देखील सदर योजनेसाठी अर्ज करून कर्ज मिळवू शकता.
  • एसबीआय कडून देण्यात येणारी कर्जाची रक्कम जमिनीच्या व्हॅल्युएशन नुसार 85% इतकी असते. याची जास्तीत जास्त मर्यादा 5 लाख रुपये आहे.
  • सदर कर्ज योजनेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला जमिनीवर उत्पादन सुरू होण्यापूर्वी किमान हप्ता भरावा लागणार नाही.
  • कर्जाची परतफेड 9 ते 10 वर्षाच्या कालावधीत सहामाही हप्त्यांद्वारे करता येते.
  • शेतजमीन विकसित करण्यासाठी 2 वर्षे आणि विकसित जमीन असल्यास 1 वर्षाची मुदत दिली जाते.
हे वाचा-  Pm free electricity scheme|पीएम सूर्यघर योजना संपूर्ण माहिती.

स्टेट बँकेकडून दहा लाखांचे कर्ज घेतल्यास महिन्याला किती रुपयांचा हप्ता बसेल याची माहिती पहा.

एसबीआय कडून शेतजमीन खरेदीसाठी कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

एसबीआय कडून शेत जमीन खरेदीसाठी कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते आपण खाली पाहूया:

  • ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी विज बिल, पाणी बिल, गॅस बिल, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.
  • बँक स्टेटमेंट मागील 6 महिन्याचे
  • उत्पन्नाचा पुरावा यामध्ये आयकर रिटर्न, पगाराची स्लिप्स इ.
  • जमिनीची कागदपत्रे यामध्ये सदर जमिनीचा 7/12 उतारा, फेरफार उतारा, गट नकाशा इ.

शेतजमीन खरेदी कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

एसबीआय कडून शेत जमीन खरेदी कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नजीकच्या SBI बँक शाखेमध्ये जावे लागेल.
  • बँकेमधून तुम्हाला सदर कर्जाचा अर्ज घेऊन तो अर्ज व्यवस्थित भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
  • त्यानंतर सदरचा अर्ज बँक अधिकाऱ्याकडे सादर करा.
  • बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करून कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करेल.

अशा पद्धतीने तुम्ही एसबीआय कडून शेत जमीन खरेदी कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता.

सदर लेखामध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडियाकडून शेत जमीन खरेदीसाठी कर्ज कसे घ्यायचे? त्याचबरोबर सदर कर्जाचा परतफेडीचा कालावधी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा शेतजमीन खरेदीसाठी कर्ज मिळवू शकता. धन्यवाद!

हे वाचा-  मोफत पिठाची गिरणी योजना 2024 अंतर्गत अर्ज कसा करावा | how to apply floor mill scheme in Maharashtra.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page