नमस्कार मित्रांनो, सदर लेखामध्ये आपण विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी विना उत्पन्न म्हणजेच उत्पन्न नसताना वैयक्तिक कर्ज (Student Personal Loan) कसे मिळू शकते? याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण विद्यार्थ्यांना उत्पन्नाशिवाय वैयक्तिक कर्ज कसे मिळू शकते? उत्पन्नाशिवाय कर्ज मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत? वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज यामधील फरक काय आहे? सदर कर्जासाठी कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागते? सदर कर्जाचे फायदे आणि तोटे काय आहेत? या मुद्द्यांचे विश्लेषण सविस्तरपणे करणार आहोत.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज भासते. या गरजांमध्ये विद्यार्थी जर बाहेर राहून शिक्षण घेत असेल तर त्याचा बाहेरील राहण्याचा व जेवणाचा खर्च, त्याचबरोबर त्याचा प्रवासाचा खर्च, शिक्षण साहित्याचा खर्च, त्याचबरोबर अशा अनेक गरजा आहेत त्यांचा खर्च यामध्ये कपडे, शूज अशा अनेक वस्तू यांचा समावेश होतो. अशावेळी घरून पैशाची व्यवस्था करताना पालकांची खूप दमछाक होत असते. यावर एक उत्तम पर्याय म्हणून वैयक्तिक कर्ज ठरू शकते. वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज यामध्ये खूप मोठा फरक आहे तो काय आहे आपण खाली पाहणार आहोत.
विद्यार्थ्यांना वैयक्तिक कर्ज कसे मिळू शकते?
विद्यार्थी हे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी काही पर्याय याचा अवलंब करू शकतात. उत्पन्नाशिवाय खाली दिलेल्या पर्यायाच्या मदतीने हे कर्ज मिळवता येते:
अर्धवेळ काम करून
जर विद्यार्थी हे शिक्षण घेत असताना अर्धवेळ काम करून किंवा फ्रीलान्सिंगद्वारे पैसे कमवत असाल तर, त्याला सदरचे वैयक्तिक कर्ज मिळवणे खूप सोपे जाईल.
जामीनदार घेऊन अर्ज करणे
जर विद्यार्थ्याकडे उत्पन्नाचा स्त्रोत नसेल तर त्याला त्याचे आई-वडील,भाऊ किंवा ज्याच्याकडे उत्पन्नाचा स्त्रोत आहे असा मित्र जामीनदार म्हणून सोबत घेऊन कर्जासाठी अर्ज करता येतो. जामीनदार म्हणजे अशी व्यक्ती जी कर्जासाठी जबाबदार राहील. जर तुमच्याकडून कर्जाची परतफेड झाली नाही तर सदर कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी जामीनदारावर येते.
कर्जाची योग्य कारणे देऊन
जर विद्यार्थ्यांने बँकेला कर्ज कशासाठी हवे आहे? किंवा का हवे आहे? याची स्पष्ट कारणे सांगणे आवश्यक आहे. शिक्षण संबंधित खर्चासाठी किंवा इतर वैयक्तिक अत्यावश्यक गरजांसाठी कर्ज हवे असल्यास, बँकेकडून अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
मालमत्ता किंवा संपत्ती तारण ठेवून
काही ठिकाणी वैयक्तिक कर्जासाठी तारण ठेवण्याची आवश्यकता नसते, परंतु काही ठिकाणी तारण ठेवावे लागते. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण संबंधित अत्यावश्यक खर्चासाठी वैयक्तिक कर्जाची आवश्यकता असेल तर, तुमच्याकडे असलेली मालमत्ता किंवा संपत्ती त्याचबरोबर मौल्यवान वस्तू गहाण ठेवून किंवा तारण ठेवून सदरचे कर्ज त्वरित मिळवणे सोपे जाते.
वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज मधील फरक काय आहे?
वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज यामधील फरक काय आहे? ते आपण सविस्तरपणे खाली पाहूया:
वैयक्तिक कर्ज
- वैयक्तिक कर्ज हे स्वतःच्या कोणत्याही वैयक्तिक गरजेसाठी वापरता येते.
- वैयक्तिक कर्ज घेताना तारण ठेवण्याची गरज नसते, पण काही वेळा तारण ठेवणे आवश्यक असते.
- वैयक्तिक कर्जाच्या परतफेडचा कालावधी कमी असतो आणि तो कर्जाच्या रकमेवर ठरतो.
- वैयक्तिक कर्जाचा व्याजदर शैक्षणिक कर्जाच्या तुलनेत जास्त असतो.
शैक्षणिक कर्ज
- शैक्षणिक कर्ज हे फक्त शिक्षण फी भरण्यासाठी वापरले जाते.
- शैक्षणिक कर्ज घेताना मालमत्ता किंवा संपत्ती गहाण ठेवावी लागते.
- शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा दीर्घकालीन असतो.
- शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे वैयक्तिक कर्ज व्याजदराच्या तुलनेत कमी असतात.
वैयक्तिक कर्जाचे फायदे आणि तोटे
विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक कर्जाचे फायदे आणि तोटे काय आहेत? ते खालीलप्रमाणे:
फायदे
- वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून आर्थिक अडचणीवर मात करता येते.
- वैयक्तिक कर्ज हे कोणत्याही अत्यावश्यक गरजा किंवा मोठ्या योजनेसाठी उपयोगी ठरते.
- वैयक्तिक कर्ज हे जलद किंवा तात्काळ मिळवता येते.
तोटे
- वैयक्तिक कर्जाचा व्याजदर जास्त असतो.
- वैयक्तिक कर्जाच्या परतफेड चा कालावधी कमी असतो.
- सदर कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यास दंड तर लागतोच त्याचबरोबर क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात वैयक्तिक कर्ज घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वैयक्तिक कर्ज आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांना उत्पन्नाशिवाय वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- विज, पाणी, गॅस बिल यापैकी कोणतेही एक
- सदर कर्जासाठी जामीनदार असेल तर जामीनदाराचे बँक स्टेटमेंट आणि त्याचे उत्पन्न प्रमाणपत्र
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी
विद्यार्थ्यांनी उत्पन्नाशिवाय वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे, त्या काय आहेत? हे खालीलप्रमाणे:
- वैयक्तिक कर्ज घेताना वैयक्तिक कर्जाची रक्कम आणि वैयक्तिक कर्ज घेण्याचे कारण स्पष्ट करणे आवश्यक आहे.
- वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी विविध बँकांचे व्याजदर तपासूनच वैयक्तिक कर्जासाठी योग्य तो पर्याय निवडा.
- वैयक्तिक कर्ज परतफेडीसाठी तुम्ही योग्य प्लॅनिंग करणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यात काही अडचणी येणार नाही.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैयक्तिक कर्ज घेताना सदर बँकेच्या अटी व शर्ती किंवा सर्व नियम समजून घेऊनच कर्ज घ्या.
विद्यार्थ्यांना अत्यावश्यक गरजांसाठी किंवा आर्थिक गरजांसाठी वैयक्तिक कर्ज उपयोगी ठरू शकते. परंतु वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या क्षमता, गरजा, मर्यादा, अटी व शर्ती तपासा. कर्ज हा तुमच्या शिक्षणाचा आधार ठरेल, पण चुकीच्या नियोजनामुळे सदरचे कर्ज हे तुमच्यावर ओझे बनू शकते. जर कर्ज घेणे टाळता येत असेल, तर सर्वप्रथम इतर सर्व पर्याय पडताळून पहा. फक्त गरज असल्यासच कर्ज घ्या आणि ते वेळेवर परत करा. फक्त योग्य नियोजन आणि जबाबदारी कर्जाचा उपयोग करा. तुमच्या यशस्वी भवितव्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण करण्याचा हा एक योग्य मार्ग ठरू शकतो!
सदर लेखामध्ये आपण विद्यार्थ्यांना उत्पन्नाशिवाय वैयक्तिक कर्ज (Student Personal Loan) कसे घेता येते? किंवा कसे मिळते? याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा विद्यार्थी असाल आणि तुम्हाला तुमच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्ही सदर कर्ज मिळवू शकता. धन्यवाद!