व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

मुलींना 10,000 हजार विद्यावेतन आणि मोफत शिक्षण शासनाचा निर्णय

आठ लाख रुपये किंवा त्याहून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्चशिक्षण मिळण्याचा मार्ग शासनाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी या प्रवर्गांसह इतर सर्व प्रवर्गातील मुलींना या निर्णयाचा लाभ होणार आहे. ज्या मुलींकडे त्यांच्या आरक्षिक प्रवर्गातील संपूर्ण कागदपत्रे नाहीत त्यांना ‘ईबीसी’ (Economically Backward Class) मधून मोफत शिक्षणाची संधी मिळणार आहे. आज आपण या लेखात सर्व माहिती पाहूया

मुलींना ईबीसी मधून मोफत शिक्षणाची संधी

या योजनेअंतर्गत मुलींकडून घेतली जाणारी महाविद्यालयांची संपूर्ण ट्यूशन फी शासन भरणार आहे. परीक्षेचा अर्ज करताना जे शुल्क भरावे लागते, तेसुद्धा शासनाकडूनच दिले जाणार आहे. यामुळे अनेक मुलींना आर्थिक दृष्ट्या कोणत्याही अडचणीशिवाय उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळेल.

कोणाला लाभ मिळणार?

एससी, एसटी आणि इतर प्रवर्ग:

एससी, एसटी प्रवर्गातील मुलींसाठी उत्पन्नाची मर्यादा नसल्याने पूर्वीपासूनच त्या मुलींना मोफत उच्चशिक्षण मिळत आहे. तसेच एसबीसी, व्हिजेएनटी या प्रवर्गातील मुलांनाही मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळतोय.

खुला प्रवर्ग आणि आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न:

ज्या मुली खुल्या प्रवर्गातून अर्ज करतील, पण त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाही मोफत शिक्षणाचा लाभ

हे वाचा-  जन्माचा दाखला मोबाईल वरून कसा काढायचा| महाराष्ट्र जन्म प्रमाणपत्र, जन्म दाखला Birth Certificate Online

मिळणार आहे. शासकीय कोट्यातून या विद्यार्थिनींना मोफत प्रवेश मिळणार असून व्यवस्थापन कोट्यासाठी हा निर्णय लागू असणार नाही. याशिवाय केंद्रीय स्तरावरून निश्चित झालेली महाविद्यालयांची डेव्हलपमेंट फी सर्वच मुलींना द्यावी लागणार आहे.

शासन निर्णयानुसार मोफत शिक्षणाची अंमलबजावणी

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्णयानुसार सर्व जात प्रवर्गातील मुलींना मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी सध्या सुरू झाली असून शासन निर्णयाप्रमाणे मुलींना अभियांत्रिकीसाठी प्रवेश दिले जात आहेत. डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर यांनी याबाबत माहिती दिली.

विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये मिळेल माहिती

7 ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयानुसार पारंपारिक कोर्सेसचे शिक्षण मुलींना मोफत आहेच. परंतु, नवीन शासन निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींनाही तब्बल 642 कोर्सेस चे उच्चशिक्षण मोफत मिळणार आहे. या निर्णयाचा नेमका अर्थ, लाभ कोणाला मिळेल, कोणत्या कोर्सेस साठी हा निर्णय लागू आहे, मोफत प्रवेशासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती मुलींना त्या-त्या महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठासह सर्व संकुलांमध्ये मिळणार आहे. त्याची जबाबदारी विद्यापीठातील नोडल अधिकाऱ्यांवर आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये जाणकार प्राध्यापकांवर सोपविली जाईल.

कोर्स पूर्ण झाल्यानंतर 10 हजार रूपयांचे विद्यावेतन

अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इयत्ता बारावी ते पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा सहा ते 10 हजार रूपयांचे विद्यावेतन देखील मिळणार आहे. पहिल्यावर्षी राज्य शासन या योजनेअंतर्गत 10 लाख विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘महास्वय्‌म’ या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला संबंधित विद्यार्थ्यास ठरल्यानुसार थेट दरमहा विद्यावेतन वितरीत होणार आहे. केवळ सहा महिन्यांसाठीच हे विद्यावेतन असणार आहे. त्यानंतर त्या अनुभवाच्या जोरात तेथे मिळालेल्या प्रमाणपत्रानुसार विद्यार्थी दुसरीकडे नोकरी शोधू शकणार आहेत.

हे वाचा-  PM किसान योजना 2000 रुपये पुढचा हफ्ता कधी मिळणार: करोडो शेतकऱ्यांना प्रतीक्षा

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अनेक मुलींना उच्चशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना आर्थिक मदतीसह उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे, मुलींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कागदपत्रे तयार ठेवून त्वरित अर्ज करावा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment