व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

आपल्या गावाची रेशन कार्ड यादी पहा तमच्या मोबाईलवर | Village wise ration card list.

आपल्या गावाची रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी तुम्हाला मोबाईल वरून पाहता येणार आहे.रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. भारतातील असे एकही कुटूंब नसेल ज्याच्याकडे रेशन कार्ड नसेल किंवा रेशन कार्डवर नाव नसेल. सुरुवातीला समाजातील  आर्थिक दुर्बल घटकांसाठी कमी पैशातील धान्य वितरीत करण्यासाठी वापरात येणारे रेशन कार्ड कालांतराने ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ लागले. आधारकार्ड हे ओळखपत्र सुरु व्हायच्या आधी रेशन कार्डवर असलेले नाव हे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे समजले जात असते. जन्म मृत्यू दाखला आणि रेशन कार्ड हे दोन्ही कागदपत्र महत्त्वाचे होते.

सध्या सरकारने आता सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्राप्त केली जातील अशी व्यवस्था केलेली आहे. तू कोणतेही काम तुम्ही घरी बसल्या देखील करू शकता त्यासाठी आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्ड नवीन नोंदणी व आपल्या गावचे रेशन कार्ड ची यादी मोबाईल कशी पहावी हे या लेखांमध्ये सांगणार आहोत.

तुमच्या गावची रेशन कार्ड यादी डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

आपल्या गावची रेशन कार्ड यादी मोबाईलवर पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

  • मोबाईल मध्ये खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.👇 https://rcms.mahafood.gov.in/show_reports.aspx?RID=98 हि साईट ओपन करा.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर प्रथम तुम्हाला CAPTCHA टाका आणि Verify बटन वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला’ Ration Card list Maharashtra’ ऑप्शन वर क्लिक करा
  • State/राज्य – Maharashtra.
  • District/जिल्हा – आपला जिल्हा निवडा.
  • DFSO – District Food Supply Office
  • Scheme – Select All पर्याय निवडू शकता.(ग्रामपंचायत योजना यादी पहा)
  • दिनांक/वेळ आणि Report Name स्वयंचलित निवडले जाईल.
  • View Report वरती क्लिक करा.
  • ration card list
  • COLLECTOR OFFICE (BRANCH SUPPLY) यावर क्लिक करा.
  • आपल्या तहसील/तालुका वरती क्लिक करा.
  • पुन्हा तुमच्यासमोर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य वाटप दुकानांची यादी पाहायला मिळेल .त्यामध्ये आपले गावाचे नाव/गावातील स्वस्त धान्य दुकानाचे नाव चेक करा. आणि त्यावरती क्लिक करा.
  • आपल्या समोर संपूर्ण गावाची रेशन कार्ड यादी ओपन होईल.
  • यादी मोबाईल मध्ये घेण्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे Save बटन वर क्लिक करून यादी EXPORT करा.
हे वाचा-  Mukhymantri solar Krishi pump new price: शासनाकडून सौर कृषी पंपाचे नवीन दर जाहीर.

रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन नोंदणी कशी करावी.

शिधापत्रिकेसाठी नोंदणी करणे सोपे आहे. त्यासाठी खाली स्टेप्स फॉलो करा.

◽NFSA अधिकृत खालील दिलेली वेबसाईट ओपन करा 👇 https://nfsa.gov.in/portal/ .

◽नेव्हिगेशन मेनूमधील “रेशन कार्ड्स” वर क्लिक करा.

◽” राज्य पोर्टलवर रेशन कार्ड तपशील ” निवडा .

◽सूचीमधून तुमचे राज्य निवडा

◽तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न आणि पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल.

◽नेव्हिगेशन मेनूमध्ये ” डाउनलोड फॉर्म ” वर क्लिक करा

◽ग्रामीण किंवा शहरी भागांसाठी “रेशन कार्ड अर्ज/पडताळणी फॉर्म” यासारखा योग्य फॉर्म निवडा आणि डाउनलोड करा.

फॉर्म प्रिंट करा आणि भरा, आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अन्न पुरवठा विभागाकडे सबमिट करा. तुमच्या अर्जाचा मागोवा घेण्यासाठी एक पावती मिळवा. मान्यता मिळाल्यास, तुमचे नाव 30 दिवसांत क्षेत्राच्या शिधापत्रिकेच्या यादीत असेल.

पात्रता निकष

तुम्ही शिधापत्रिकेसाठी अर्ज करू इच्छित असल्यास, पात्रता निकष येथे आहेत:

  • फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • कुटुंब प्रमुखाच्या नावाने शिधापत्रिका जारी केली जाईल.
  • कुटुंबप्रमुखाचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे शिधापत्रिकेवर समाविष्ट केली जातील. अर्जदाराकडे आधीपासूनच दुसऱ्या राज्यात जारी केलेले रेशन कार्ड नसावे.
  • कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित शिधापत्रिका तयार केली जातात.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page