व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

pm suryaghar yojana 2024 in marathi | सूर्यघर योजनेअंतर्गत ७८ हजार रुपये सबसिडी सह 300 मोफत वीज मिळणार

पीएम सूर्य घर योजना 2024: मोफत वीज आणि सबसिडीची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील घरांना मोफत वीज पुरवणे हा आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबांना त्यांच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यासाठी 40% पर्यंत सबसिडी मिळणार आहे. या योजनेचा लाभ देशातील एक कोटी कुटुंबांना होणार असून, सरकारसाठी ही मोठी बचत ठरणार आहे. योजनेसाठी प्रति वर्ष 75 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

या योजनेअंतर्गत अर्जदारांना ३०००० रुपयांपासून ७८००० हजार रुपयांपर्यंत सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी मिळणार आहे.

तसेच सोलर पॅनल बसवल्यास ग्राहकांना 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे.

सूर्यघर सोलार योजनेसाठी अर्ज करा.

Suryaghar solar panel yojana

सबसिडीची रचना:

सरासरी मासिक बिलउपयुक्त पॅनल क्षमतासबसिडी मदत
0-1501-2 किलोवॅट30000 ते 60000
150-3002-3 किलोवॅट60000 ते 780000
3003 किलोवॅट पेक्षा अधिक780000

पीएम सूर्य घर योजना म्हणजे काय?

देशातील विजेच्या बिलाने हैराण झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी पीएम सूर्य घर योजना तयार करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांचा निधी निश्चित केला आहे. या योजनेद्वारे देशभरातील एक कोटी घरांवर सौर पॅनल लावले जाणार आहेत.

हे वाचा-  TRAI New Rule: 1 सप्टेंबरपासून हे सिम कार्ड्स होतील ब्लॅकलिस्ट, जाणून घ्या trai चा नवीन नियम.

पीएम सूर्य घर योजनेचे फायदे

  1. मोफत वीज: एक कोटी नागरिकांना मोफत वीज मिळेल.
  2. सरकारची बचत: सरकारच्या वीज खर्चात 50 लाख रुपयांची बचत होणार आहे.
  3. सौर ऊर्जेचा वापर: सौर ऊर्जेचा जास्त वापर होईल, नैसर्गिक साधनांची बचत होईल.
  4. प्रदूषण कमी: कोळशामुळे तयार होणारी वीज कमी होईल, प्रदूषण कमी होईल.
  5. अखंडित वीज पुरवठा: नागरिकांच्या घरातील वीज खंड पडणार नाही.

सूर्यघर सोलार योजनेसाठी अर्ज करा.

अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता व कागदपत्रे

पात्रता:

  • भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे घर छतासह असणे आवश्यक आहे.

कागदपत्रे:

  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • छत असलेल्या घराचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • विज बिल
  • बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा

  1. अधिकृत वेबसाईटवर क्लिक करून “apply for solar” पर्याय निवडा.
  2. “Registration here” पर्यायावर क्लिक करा.
  3. राज्य, जिल्हा निवडा, वीज वितरण कंपनी निवडा, ग्राहक खाते क्रमांक भरा.
  4. मोबाईल नंबर व ओटीपी टाका.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. फॉर्म सबमिट करा.

पीएम सूर्य घर योजना कॅल्क्युलेटर

योजनेसाठी किती खर्च होईल हे पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर “Know More About Rooftop Solar” या पर्यायाखाली कॅल्क्युलेटर वापरता येईल.

Pm suryaghar yojana apply online

प्रधानमंत्री सूर्य घर योजना एक महत्त्वाची योजना आहे जी देशातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करेल आणि पर्यावरण संरक्षणातही मोठी भूमिका बजावेल. या योजनेद्वारे नागरिकांना मोफत वीज मिळेल आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होईल. त्यामुळे, ही योजना नागरिकांसाठी आणि सरकारसाठीही फायदेशीर ठरणार आहे.

हे वाचा-  कोणत्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार | 7.5 एचपी वरील शेतकऱ्यांचे विज बिल माफ होणार का?

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment