व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

लाडका भाऊ योजना नक्की काय आहे ? योजना खरी आहे की खोटी, सविस्तर समजून घ्या | Ladka Bhau Yojana Maharashtra 2024

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणी योजनेसोबत लाडका भाऊ योजना देखील चांगलीच गाजत आहे या योजनेमध्ये सरकारने दिलेल्या घोषणेप्रमाणे पात्र लाभार्थ्यांना महिन्याला 6000 रुपये ते 10000 रुपये दिले जाणार आहेत. मग हे पैसे कधी येणार ? कुठून येणार ? यासाठी अर्ज कसा करणार ? नक्की पात्रता काय असणार ? याबद्दल अनेकांना अनेक प्रश्न आहेत आणि यामुळेच युवक मोठ्या प्रमाणावर संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे. दिलेली माहिती सविस्तर वाचूनच तुम्ही योजनेसाठी अर्ज करायचा की नाही याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे.

Ladka Bhau Yojana Maharashtra in Marathi :
मित्रांनो या योजनेला अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सुरुवातीला ही योजना नक्की आहे काय याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. ही योजना माझी लाडकी बहीण योजनेसारखी नसणार आहे लाडक्या बहिणी योजनेमध्ये अर्ज केलेल्या महिलांना पात्र झाल्यास महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत आणि यासाठी कोणतेही प्रशिक्षण अथवा कार्य करण्याची आवश्यकता महिलांना नसणार आहे.

हे वाचा-  राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

लाडका भाऊ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

परंतु माझा लाडका भाऊ या योजनेबद्दल बोलायचे झाल्या या योजनेमध्ये सुरुवातीलाच ही एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असणार आहे ज्याद्वारे बेरोजगार अथवा सुशिक्षित बेरोजगारांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि ज्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला ही वेतनश्रेणी म्हणजेच स्टायपेंड दिले जाणार आहे.

याचाच अर्थ असा की तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी लघु आणि मध्यम तसेच काही स्टार्टअप्स, मोठे उद्योग, सहकारी संस्था, शासकीय अथवा निमशासकीय आस्थापना/महामंडळ, सामाजिक संस्था इत्यादींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ज्यावेळी महास्वयम पोर्टलवर होती त्यावेळी अर्जदारांना पात्रतेनुसार या ठिकाणी काम करण्याची अथवा इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांनाही महिन्याला रक्कम मिळणार आहे.

Ladka Bhau Yojana Maharashtra Age Limit :

मित्रांनो या योजनेचा मूळ उद्देश हाच आहे की बेरोजगार युवकांना काम करण्याची संधी देणे आणि म्हणून हे एक प्रशिक्षण प्रोग्राम असणार आहे जो की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत राबवला जाईल आणि यामध्ये हा प्रोग्राम 06 महिन्यासाठीच राबवला जाणार आहे पुढे यामध्ये वाढ द्यायची की नाही याचा निर्णय संबंधित संस्थेकडे असणार आहे.

वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांची किमान बारावीची परीक्षा पास असणे आवश्यक आहे. आयटीआय, डिप्लोमा पास आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

हे वाचा-  महापारेषण भरती 2024 | Mahatransco Bharti 2024 |महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मेगा भरती.

लाडका भाऊ योजनेचे स्वरूप समजून घ्या :

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी महास्वयमच्या पोर्टलवर जाऊन स्वतःचे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करून घ्यायची आहे.

यामध्ये अर्ज करताना उमेदवारांना अनुभव आहे अथवा नाही याबद्दल सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.

त्यानंतर ज्या आस्थापनांना संबंधित अर्जदाराची आवश्यकता असल्यास प्रशिक्षणाचा कालावधी ०६ महिन्यांचा देण्यात येईल आणि ज्याचेच विद्या वेतन हे राज्य सरकार द्वारे उमेदवारांना देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित अनुभवाचे प्रमाणपत्र देखील उमेदवारांना मिळेल.

योजनेच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जर संबंधित उद्योग किंवा आस्थापने ना तो उमेदवार योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छा असल्यास रोजगार देण्यात आले नाही सुद्धा संबंधित उद्योग किंवा आस्थापनास घेऊ शकणार आहेत.

यासोबतच योजनेअंतर्गत प्रशिक्षण मिळत असलेल्या उमेदवारांना कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, किमान वेतन कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा तसेच औद्योगिक विवाद कायदा देखील आणि राज्य कामगार विमा कायदार यांपैकी कोणताही कायदा लागू राहणार नाही.

लाडका भाऊ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

माझा लाडका भाऊ योजना अधिकृत शासननिर्णय :

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्यता विभाग यांच्या अंतर्गत आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत राबवली जात आहे.

हे वाचा-  सर्व क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळवून देणारी पीएम श्रमयोगी मानधन योजना

या योजनेचे मूळ स्वरूप घेत असणार आहे की योजनेद्वारे राज्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे.

यामध्ये उमेदवारांना रोजगार सोबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या कामाचा अनुभव मिळेल आणि त्यांच्यामुळे कामाचे क्षमता वाढ होऊन यामध्ये उद्योजकांना देखील त्यांच्या उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेच्या मार्फत उपलब्ध होणार आहे.

यासाठी ज्या उमेदवारांना रोजगार हवा आहे असे उमेदवार प्रशिक्षण देव इच्छिणाऱ्या उद्योजकांनी वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

वेबसाईटवर नोंदणी केलेल्या अर्जदारांची ज्या आस्थापना निवड करतील त्यांच्याकडे हे सहा महिन्याचे प्रशिक्षण करावे लागणार आहे.

मिळणारे मासिक वेतन –

12वी पास : ६००० रुपये
आयटीआय/डिप्लोमा पास : ८००० रुपये
पदवीधर : १०००० रुपये

पात्रतेप्रमाणेच योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडून जास्त कागदपत्र देखील घेतले जाणार नाहीत कागदपत्रांच्या यादी बद्दल बोलायचे झाल्यास खालील सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment