व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

‘लेक लाडकी’ योजना: मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपयांचा लाभ

‘लेक लाडकी’ योजना काय आहे?

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून 18 वर्षांपर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, त्यांचे शिक्षण सुकर करणे आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आर्थिक पाठबळ मिळवून देणे हा आहे.

योजनेचा उद्देश

‘लेक लाडकी’ योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांना आळा घालणे हा आहे. या योजनेद्वारे मुलींच्या जीवनात आवश्यक असलेल्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते. मुलींच्या शिक्षणासाठी, पोषणासाठी आणि त्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी या योजनेतून महत्त्वाची मदत दिली जाते.

Lek ladaki yojana maharashtra

कोणाला मिळणार लाभ?

ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींना लागू आहे. 1 एप्रिल 2023 आधी व नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेच्या अटींनुसार, पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र

लाभांचे विवरण

मुलींच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये, आणि मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75 हजार रुपये असे एकूण 1 लाख 1 हजार रुपये या योजनेतून मिळतात. हा निधी मुलींच्या शिक्षणासाठी, पोषणासाठी आणि अन्य गरजांसाठी उपयोगात आणता येतो.

हे वाचा-  बांधकाम कामगार योजना 2024: बांधकाम कामगारांना 5 लाख रुपये आर्थिक मदत

अर्ज प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करावा. अर्जामध्ये आवश्यक असलेली माहिती जसे की, वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आदी माहिती भरून द्यावी लागते. अर्ज दाखल झाल्यानंतर तो संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो आणि त्याची नोंदणी केली जाते.

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात महिला व बाल विकास विभागात (अंगणवाडी) जावे लागेल  व लेक लाडकी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • भरलेला अर्ज सदर कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची लेक लाडकी योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथमलेक लाडकी योजना च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर लेक लाडकी योजना वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये अर्जदाराची विचारलेली सर्व माहिती सोबत जोडावी लागेल व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. यामध्ये लाभार्थीचा जन्मदाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, लाभार्थीचे आणि पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र आणि शिक्षणाचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. याशिवाय, अंतिम हप्त्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा हे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.

हे वाचा-  लाडकी बहिण योजनेसाठी वेबसाईट वरून असा करा अर्ज..

अर्जाची कार्यवाही

अर्ज सादर केल्यानंतर त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर केली जाते. त्यानंतर अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जातो. संपूर्ण प्रक्रिया दोन महिन्यांच्या आत पूर्ण केली जाते.

योजनेच्या अटी

1 एप्रिल 2023 च्या आधी व नंतर जन्मलेल्या मुलींना ही योजना लागू आहे. जुळी अपत्ये असल्यास, दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, यासाठी माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

‘लेक लाडकी’ योजना मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे मुलींना आर्थिक पाठबळ मिळत आहे, ज्यामुळे त्यांचे शिक्षण, पोषण, आणि अन्य गरजा पूर्ण होऊ शकतात. ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आश्वासक आधार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत आणि त्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल होईल, अशी अपेक्षा आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment