Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana 2025
नमस्कार, केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना होत. ही योजना एक विमा पॉलिसी आहे. या योजनेअंतर्ग कोणत्याही कारणामुळे विमा पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास जीवन विमा संरक्षण प्रदान केला जातो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेविषयीची संपूर्ण माहिती सदर लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये या योजनेचे फायदे, पात्रता, सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेची वैशिष्ट्ये, सदर योजनेसाठी अर्ज कसा करायचा? वरील मुद्द्यांचे विस्तृत विश्लेषण आपण या लेखाच्या माध्यमातून करूया.
2 लाख रुपये मिळवण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेविषयी थोडक्यात..
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे आरोग्य विमा आणि जीवन विमा असणे खूप आवश्यक आहे. मात्र या जीवन विमा पॉलिसीकडे बहुतेक जण दुर्लक्ष करताना दिसत आहेत. याचे कारण हे असू शकते की या जीवन विमा पॉलिसीचे हप्ते परवडत नसतील. पण आता तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही कारण, केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येणारी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत तुम्ही अगदी कमी प्रीमियमवर देखील जीवन विमा घेऊ शकता.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सुरुवात भारत सरकारने 9 मे 2015 मध्ये केली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही भारत सरकार द्वारे देशातील गरीब आणि आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा मुख्य उद्देश हा देशातील नागरिकांना 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देणे हा आहे. ही योजना बँका/पोस्ट ऑफिस द्वारे ऑफर केली जाते आणि आयुर्विमा कंपन्या द्वारे याची अंमलबजावणी केली जाते. या योजनेच्या माध्यमातून 1 वर्षाचे विमा संरक्षण दिले जाते. त्याचबरोबर वर्षानुवर्षे याचे नूतनीकरण करता येते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा पॉलिसी साठी अर्जदाराला वार्षिक प्रीमियम फक्त 436 रुपये भरावा लागतो. विमा पॉलिसीची ही रक्कम दरवर्षी भरणे आवश्यक आहे. सदरची रक्कम ही अर्जदाराच्या बँक खात्यामधून ऑटो डेबिट करण्यात येते. सदर योजनेअंतर्गत दिला जाणारा विमा हा पॉलिसी धारकाचा नैसर्गिक व अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना फायदे
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे खालीलप्रमाणे:
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही 18 ते 50 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्तींना 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण प्रदान करते.
- या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला असेल तर सदर व्यक्तीच्या वारसाला विम्याची रक्कम दिली जाते.
- सदर विम्याची रक्कम अर्जदाराच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यामधून ऑटो डेबिट द्वारे भरली जाते.
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमाधारकाला वर्षाला 436 रुपये इतका कमी प्रीमियम भरावा लागतो.
- सदरची विमा पॉलिसी ही एक वर्षापूर्वीच मर्यादित असल्याने, एक वर्षानंतर सदर पॉलिसीचे नूतनीकरण करता येते.
- या योजनेअंतर्गत पॉलिसी धारकाला मेडिकल तपासणीची गरज नाही.
- या योजनेच्या प्रीमियमची रक्कम खूपच कमी असल्यामुळे देशातील गरीब कुटुंबांना देखील नोंदणी करणे शक्य होईल.
- या योजनेमुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसोबत आकस्मिक रित्या काही काही घडल्यास कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य सुरक्षित राहील.
- सदर योजनेतून कोणत्याही क्षणी बाहेर पडलेली व्यक्ती पुन्हा या योजनेत सहभागी होऊ शकते. यासाठी सदर व्यक्ती ही एक जून किंवा त्यानंतर कोणत्याही तारखेला या योजनेमध्ये सामील होऊ शकते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पात्रता
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या पात्रता खालीलप्रमाणे:
- प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 50 वर्ष आहे.
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
- विमाधारक सदस्याच्या मृत्यू तारखेपासून 30 दिवसाच्या आत दावा अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
- जर एखाद्या विमाधारकाने एकापेक्षा अनेक बँकांमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम भरला असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला फक्त 2 लाखाचीच रक्कम दिली जाते.
- बँक खात्यामधून विम्याची प्रीमियम रक्कम ऑटो डेबिट झालेल्या दिवसापासून सदर योजनेचा लाभ सुरू होईल.
- अपघातामुळे झालेला मृत्यू वगळता पॉलिसी सुरू झाल्यापासून किंवा पॉलिसीमध्ये परत आल्यापासून 45 दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास दावा देय असणार नाही.
- प्रथमच नाव नोंदणी करणारे सदस्यासाठी योजनेत नाव नोंदणी झाल्यापासून पहिल्या 30 दिवसात मृत्यू झाल्यास (अपघाताशिवाय) विमा संरक्षण उपलब्ध होणार नाही.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा लाभ अर्जदाराला फक्त एकाच विमा कंपनीकडून किंवा एकाच बँकेतून घेता येतो.
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे विमा संरक्षण एक जून ते 31 मे पर्यंत च्या एक वर्षाच्या कालावधीसाठी आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आवश्यक कागदपत्रे
सदर योजनेसाठी अर्ज करताना व दावा दाखल करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ती कागदपत्रे कोणती आहेत हे खालीलप्रमाणे:
अर्ज करताना सादर करावयाची कागदपत्रे
- आधार कार्ड (अर्जदाराचे)
- रहिवासी दाखला
- बँक खाते तपशील
- पॅन कार्ड
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
दावा दाखल करताना सादर करावयाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- बँक खाते तपशील
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र
दावा दाखल करताना सादर करावयाच्या कागदपत्रांमध्ये विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र सोडून इतर सर्व कागदपत्रे ही विमाधारकाच्या वारसाची असणे आवश्यक आहे.
2 लाख रुपये मिळवण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा अर्जदाराला ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करता येतो.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर, तुमच्याकडे मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग असणे गरजेचे आहे तरच तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. जर तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग नसेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करावा लागतो.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला सदर योजनेचा अर्ज खालील लिंक वर जाऊन डाउनलोड करून या अर्जाची प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सदरच्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरायची आहे. त्यानंतर सदर योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज बँकेमध्ये जमा करायचा आहे.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा अर्ज ऑफलाईन करून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे:
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जनसुरक्षा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://jansuraksha.gov.in
- त्यानंतर तुम्हाला होम पेज वरील फॉर्म्स पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- फॉर्म पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तीन पर्याय उघडतील.
- त्यामध्ये तुम्हाला प्राईम लाईफ लाईफ इन्शुरन्स वर क्लिक करावे लागेल.
- तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये अर्जाचा फर्मानी दावा फॉर्म चे पर्याय असतील, त्या पर्यायामधील अर्जावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा अर्ज पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा.
- सदरचा अर्ज डाऊनलोड केल्यानंतर पीडीएफ फॉर्म प्रिंट करा.
- आता तुम्हाला फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की, विमा कंपनीचे नाव किंवा ज्या बँकेमध्ये तुमचे बचत खाते आहे त्या बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, नॉमिनी/वारसाचे नाव इ.
- वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुमचे बचत खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन बँक अधिकाऱ्याकडे फॉर्म सबमिट करावा लागेल.
- विम्याचा हप्ता भरण्यासाठी, अर्जदारांनी सदर योजनेसाठी द्यायची रक्कम बँक खात्यामध्ये असल्याची खात्री करावी.
- त्यानंतर तुम्हाला ऑटोडिबिट पर्यायांमध्ये प्रीमियम रक्कम समाविष्ट करण्यासाठी संमतीचे पत्र आणि संमती फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे. विमा अर्ज सोबत हा फॉर्म सबमिट करा.
अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज सदर योजनेसाठी करता येतो.
सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने संदर्भातील संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!