व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

ATM कार्ड असेल तर मृत्यू नंतर मिळतात 10 लाख रुपये, कसे? जाणून घ्या पटापट 🏧 ATM कार्ड Insurance

आजच्या काळात एटीएम कार्ड हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे. आज प्रत्येक जण आपल्या सोबत रोक रक्कम न ठेवता एटीएम कार्ड ठेवतो. त्यामुळे व्यवहार करणे देखील सोपे झाले आहे. फक्त एटीएम मधून पैसे काढण्यापर्यंतच एटीएम चा फायदा होतो असे नाही. तर एटीएम चे आणखीही बरेच फायदे आहेत. एटीएम कार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र माहिती अभावी लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यात काही बँकाही त्यांच्या ग्राहकांना ही माहिती देत नाहीत.

जेव्हा तुम्हाला बँकेकडून एटीएम कार्ड दिले जाते तेव्हा ग्राहकांना अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. मात्र माहिती अभावी एटीएम कार्ड धारकाचा अपघात आणि अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळत नाही. तसेच कार्ड धारक अपघातात एका हाताने किंवा पायाने अपंग झाला असेल तर त्याला 50 हजार रुपयाचा विमा दिला जातो. त्याचप्रमाणे दोन्ही हात किंवा पाय गमावले असल्यास किंवा मृत्यू झाल्यास कार्ड नुसार एक लाख ते 5 लाख रुपये पर्यंत विमा दिला जातो.

अकाली मृत्यू झाल्यास कार्डधारकाचा नॉमिनी संबंधित बँकेच्या शाखेत दाव्यासाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी एफ आय आर उपचार प्रमाणपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात त्यानंतर काही दिवसांनी विम्याची रक्कम संबंधित कुटुंबीयांना मिळते.

हे वाचा-  Health insurance कुठून घ्यायचा, health insurance plans व इतर सर्व माहिती

जाणून घ्या कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड विमा देते?

ATM कार्डनुसार अपघात आणि अकाली मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध होतो. बँकेच्या नियमानुसार जर 45 दिवसापासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम वापरत असे तर त्याला एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते.

ज्या व्यक्तीकडे क्लासिक कार्ड आहे त्यांना एक लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर दोन लाख रुपये ऑर्दिनरी मास्टर 50 हजार रुपये, प्लॅटिनम मास्टर कार्डवर पाच लाख रुपये, तर दीड ते दोन लाख रुपयापर्यंत विमा मिळू शकतो.तरी ज्यांच्याकडे व्हिसा कार्ड आहे त्यांना लोकापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. त्याच रुपये कार्डवर 1 ते 2 लाख रुपयाचा विमा देखील मिळतो.

वेगवेगळ्या परिस्थितीसाठी किती विमा?

जर तुम्ही वर नमूद केलेले एटीएम कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला त्यानुसार विमा दिला जातो. ज्यामध्ये जो कार्डधारक एक किंवा एका पायाने अपंग आहे त्या व्यक्तीला 50 हजार रुपयाचा विमा दिला जातो. तसेच एखाद्याचे दोन्ही हात किंवा पायांनी अपंगत्व आलेले आहे किंवा मृत्यू झाल्यास कार्डानुसार त्या व्यक्तीला 1 लाख ते 5 लाख रुपये पर्यंतचा विमा दिला जातो.

जर एखाद्या कार्डधारकाचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनी संबंधित बँकेच्या शाखेत दाव्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी एफ आय आरची प्रत उपचार प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागते.यामध्ये काही दिवसांनी मृत झालेल्या कुटुंबीयांना बँक खात्यात क्लम येतो.

हे वाचा-  max life 1 crore  term insurance, मॅक्स लाइफ 1 कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स कशी काढायची व मिळवायची.

यासाठी कोणते कागदपत्रे लागतात?

एटीएम कार्डधारकाचा अवेळी किंवा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा अपंग तो आला असेल तर अशा प्रकरणात येण्याचा लाभ घेण्यासाठी एटीएम कार्ड धारकाच्या नॉमिनीला काही कागदपत्राची पूर्तता करावी लागते.

यासाठी नॉमिनीला संबंधित बँकेच्या शाखेत एफ आय आर चे ,प्रत उपचार प्रमाणपत्र, मृत्यू झालेला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत इत्यादी कागदपत्र जमा करावी लागतील. बँकेत कागदपत्रे जमा झाल्यानंतर काही दिवसांनी वृद्ध झालेल्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page