व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी होणार तब्बल 40,000 पदांची भरती, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.. पहा संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार, देशातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी भारतातील विविध राज्यांमध्ये ४० हजार रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाही. हे या भरतीचे वैशिष्ट्य आहे. आपण सदर लेखांमध्ये या पदासाठी कोणते निकष आहेत? त्याचबरोबर अर्ज कसा करायचा? हे पाहूया.

देशातील लहान मुलांचा शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक विकास हा अंगणवाडीच्या माध्यमातून होत असतो. देशातील बहुसंख्य लोकसंख्या ही खेड्यामध्ये राहते. त्यामुळे अंगणवाडी हा खेड्यातील मुलांच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून ओळखला जातो. कारण मुलांच्या आयुष्यातील जडणघडणीची सुरुवात ही अंगणवाडी पासूनच होते. त्यामुळेच देशातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी ४० हजार पदांची भरती होणार आहे. अंगणवाडी आणि महिला बाल विकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चला तर मग पाहूया अंगणवाडी पर्यवेक्षक पदाची संपूर्ण माहिती.

याबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर जा. 👇

अंगणवाडी पर्यवेक्षक अर्ज करण्याचा कालावधी

अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करण्याचा कालावधी हा डिसेंबर 2024 पासून जानेवारी 2025 पर्यंत आहे. या कालावधीमध्ये तुम्ही सदर पदासाठी अर्ज करू शकता.

हे वाचा 👉  भारतीय रेल्वेच्या नव्या तिकीट बुकिंग नियमांमुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोणते बदल करण्यात आले? new railway ticket booking rules

अंगणवाडी पर्यवेक्षक एकूण रिक्त पदे

अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी 40 हजार रिक्त पदे आहेत. ही रिक्त पदे देशातील विविध राज्यांमधून भरली जाणार आहेत. तुम्ही जर सदर पदासाठी इच्छुक असाल तर अर्ज करू शकता.

अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी वयोमर्यादा

अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी आवश्यक वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष आहे. जर तुमचे वय 18 ते 45 च्या दरम्यान असेल तर तुम्ही सदर पदासाठी अर्ज करू शकता.

अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठीचे वेतन

अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी चे वेतन हे किमान 8000 ते कमाल 18,000 रुपये आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षक पद अर्ज प्रक्रिया

अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन/ऑफलाईन आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षक पद निवड प्रक्रिया

अंगणवाडी पर्यवेक्षक पदाची निवड प्रक्रिया ही उमेदवाराच्या गुणवत्ता यादीनुसार होणार आहे. या पदासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही.

अंगणवाडी पर्यवेक्षक पद शैक्षणिक पात्रता

अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणे गरजेचे आहे. सदर पदासाठीची शैक्षणिक पात्रता ही राज्यानुसार बदलू शकते.

अंगणवाडी पर्यवेक्षक पद संपूर्ण माहिती

  • पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षक
  • एकूण रिक्त पदे – 40,000 (संपूर्ण देशामध्ये)
  • वयोमर्यादा – 18 ते 45 वर्ष
  • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (राज्यानुसार यामध्ये बदल होऊ शकतो.)
  • वेतन – किमान 8000 ते कमाल 18,000
  • निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादीनुसार (कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही.)
  • अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन/ऑफलाईन
हे वाचा 👉  मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : मुलींच्या शिक्षणासाठी संपूर्ण शुल्कमाफी! | School fees waiver for girls.

टिप: सदरच्या पदासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ

या पदांची अधिक माहिती तुम्ही खालील संकेतस्थळावर जाऊन मिळवू शकता. https://www.wcd.nic.in

सदर लेखामध्ये आपण देशातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी 40,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. जर तुम्ही वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर सदर माहितीच्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page