व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

बालिका समृद्धी योजना: मुलींच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत उचलले एक महत्त्वपूर्ण पाऊल.. जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर.!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार, केंद्र सरकार महिला सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवत असते. यापैकी एक योजना म्हणजे बालिका समृद्धी योजना होय. बालिका समृद्धी योजना ही 1997 साली केंद्र सरकारने सुरू केली. बालिका समृद्धी योजना ही प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लिंगभेद दूर करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. त्याचबरोबर मुलींचे भविष्य उज्वल होण्यासाठी त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाते. या पोस्टमध्ये आपण बालिका समृद्धी योजनेविषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्तपणे पाहूया.

बालिका समृद्धी योजनेचे फायदे

बालिका समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत? ते आपण खाली पाहूया:

  • या योजनेअंतर्गत नवजात म्हणजेच नुकत्याच जन्मलेल्या मुलीसाठी 500 रुपयांचे अनुदान देण्यात येते
  • मुलगी पहिली ते तिसरीत जाईपर्यंत या योजनेअंतर्गत 300 रुपयांचे अनुदान दिले जाते.
  • मुलगी चौथीला गेल्यावर 500 रुपयांचे अनुदान दिले जाते.
  • मुलगी पाचवीला गेल्यानंतर 600 रुपयांचे अनुदान दिले जाते.
  • मुलगी सहावी ते सातवीपर्यंत गेल्यानंतर 700 रुपयांचे अनुदान दिले जाते.
  • मुलगीला आठवीसाठी 800 रुपयांचे अनुदान दिले जाते.
  • मुलगीला नववी व दहावीसाठी 1000 रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाते.
  • केंद्र सरकारकडून देण्यात येणारी ही सर्व रक्कम मुलीच्या नावाने बँकेच्या बचत खात्यामध्ये जमा केली जाते आणि तिला 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच ही रक्कम काढता येते.

बालिका समृद्धी योजनेसाठी आवश्यक पात्रता

बालिका समृद्धी योजनेचा जर तुम्ही लाभ घेणार असाल तर, तुम्हाला आवश्यक त्या अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक आहे. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते आपण खाली पाहूया:

  • बालिका समृद्धी योजना ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे. यासाठी सरकार वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्चित करते.
  • सदर योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त 2 मुलींनाच घेता येतो.
  • मुलीच्या वडिलांनी किंवा पालकांनी गरीब कुटुंब (BPL) म्हणून अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे शिक्षण सुरू असणे खूप आवश्यक आहे. जर मुलीने शाळा सोडली किंवा शिक्षण बंद केले तर तिला पुढील शैक्षणिक आर्थिक मदत मिळणार नाही.
  • 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
हे वाचा 👉  आजोबांनी 1994 मध्ये 500 रुपयांचे शेअर्स खरेदी केले अन् सांगायला विसरले, आज नातू झालाय लाखोंचा मालक. | The power of compounding of share.

बालिका समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

बालिका समृद्धी योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर, तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत हे आपण खाली पाहूया:

  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • पालकांचा किंवा कायदेशीर पालकांच्या ओळखीच्या पुराव्यासाठी पासपोर्ट, शालांत परीक्षा प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, भारत सरकारने जारी केलेली इतर कोणतेही प्रमाणपत्र जे मुलीची ओळख प्रमाणित करते.
  • पालकांचा किंवा कायदेशीर पालकांच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, युटिलिटी बिले, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, भारत सरकारने जारी केलेला इतर कोणताही पत्त्याचा पुरावा.
  • कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • गरिबी रेषेखालील (BPL) प्रमाणपत्र
  • मुलीच्या नावाने असलेल्या बँक खात्याचा तपशील
  • मुलगी शिकत असल्याच्या पुराव्यासाठी शालेय प्रमाणपत्र
  • बदलत्या नोंदींसाठी रहिवासी प्रमाणपत्र

बालिका समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • बालिका समृद्धी योजना ही केंद्र सरकार द्वारे चालवली जाते, पण या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या सामाजिक कल्याण विभागाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.
  • सदर योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी तुमच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्र, पंचायत कार्यालय किंवा नगरपालिकेच्या महिला व बालविकास कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो.
  • सदर कार्यालयामधून बालिका समृद्धी योजनेचा अर्ज घेऊन अर्जामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरून आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज या कार्यालयामध्ये जमा करा.
हे वाचा 👉  मोबाईल वरून तुमचे लाईट बिल कसे भरायचे |pay Electricity Bill using phonepe, Gpay.

अशा पद्धतीने तुम्ही बालिका समृद्धी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

या पोस्टमध्ये आपण केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणारी बालिका समृद्धी योजना या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे जर तुम्ही या योजनेच्या अटी व शर्ती मध्ये पात्र होत असाल तर, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या मुलींचे भविष्य उज्वल करू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page