व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी व आधार कार्ड वरील बदल करण्यासाठी, अशी करा ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक.. जाणून घ्या संपूर्ण माहिती!

नमस्कार, आपण आज या लेखांमध्ये तुम्हाला जर नवीन आधार कार्ड बनवायचे असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी त्याचबरोबर आधार कार्ड मध्ये काही बदल करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रामध्ये ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक कशी करायची? याबाबतची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहूया. जेणेकरून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करण्याचे काम सहजपणे घरबसल्या करू शकाल.

आधार कार्ड हे सरकारी योजना त्याचबरोबर आर्थिक व्यवहार, जमिनीचे व्यवहार यासारख्या महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये खूप महत्त्वाचा दस्तावेज म्हणून काम करते. जर तुम्ही तुमचे व तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नवीन आधार कार्ड बनवणार असेल तर, त्याचबरोबर आधार कार्ड मध्ये कोणताही बदल करणार असाल तर तुम्हाला आधार केंद्रामध्ये ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करून तुमच्या आधार कार्ड संबंधित सर्व बदल किंवा नवीन आधार कार्ड तयार करून घेऊ शकता.

नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

  • ओळखीच्या पुराव्यासाठी पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी विज बिल, बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड इ.
  • जन्माच्या पुराव्यासाठी 10वीचे गुणपत्रक, इतर वैध दस्तावेज
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडी

ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक कशी करायची?

नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी, अपडेट किंवा इतर सेवांसाठी आधार केंद्रामध्ये ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी करायची याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼 https://uidai.gov.in/
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर My Aadhar टॅब वर क्लिक करा.
  • Get Aadhar सेक्शनमध्ये Book an Appointment वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या शहराचे नाव निवडा आणि Proceed to Book an Appointment वर क्लिक करा.
  • त्यानंतर अपॉइंटमेंट चा प्रकार निवडा.(नवीन आधार, अपडेट किंवा इतर सेवा)
  • तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि आवश्यक ती माहिती भरा.
  • Proceed बटनावर क्लिक करा.
  • लागू असेल तर ऑनलाइन शुल्क भरा.
  • अपॉइंटमेंट कन्फर्म झाल्यानंतर मिळालेली स्लिप प्रिंट करून ठेवा.
  • निश्चित वेळ व तारखेला आधार सेवा केंद्रावर भेट द्या आणि आधार कार्ड संबंधित संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा.
हे वाचा 👉  महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय, राज्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांची तब्बल 18,882 पदांची होणार मोठी भरती.. पहा संपूर्ण माहिती.!

आधार कार्ड स्टेटस कसा तपासायचा?

जर तुम्ही नवीन आधार कार्ड साठी अर्ज केला असेल किंवा आधार कार्ड वरील नाव,जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल नंबर अपडेट साठी अर्ज केला असेल तर, तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस ऑनलाइन पद्धतीने पाहता येतो. तो कसा पाहायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहू:

  • सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल. सदरची वेबसाईट आपण वर दिलेलीच आहे.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Cheak Enrollment & Update Status वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची Enrollment ID, SRN किंवा URN प्रविष्ट करा.
  • त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती किंवा स्टेटस स्क्रीनवर पाहू शकाल.

आधार कार्ड मध्ये बदल कसा करायचा?

जर तुमच्या आधार कार्ड मध्ये एखादी माहिती चुकीची असेल तर, ती माहिती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक कशी करायची? त्याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल. सदरची वेबसाईट आपण वर दिलेलीच आहे.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Book an Appointment पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या शहराचे नाव निवडा आणि आधार कार्ड मध्ये बदल करण्याचा पर्याय निवडा.(नाव, पत्ता, मोबाईल नंबर इ.)
  • वरील माहितीच्या आधारे तुमची अपॉइंटमेंट बुक करून आधार सेवा केंद्रावर जा.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि फॉर्म सबमिट करा.
हे वाचा 👉  Credit Card लिमिट वाढवायचीय आणि चांगल्या व्याजदरात कर्ज मिळवायचे? मग ‘हे’ 5 महत्त्वाचे अपडेट करा. Check credit report online.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी ची ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता.

लहान मुलांचे आधार कार्ड कसे बनवायचे?

नवजात बालक आणि लहान मुलांसाठी आधार कार्ड कसे बनवायचे? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • नवजात बालक आणि लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करावी लागेल. ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक कशी करायची याबाबतची प्रक्रिया आपण वर पाहिलीच आहे.
  • सदर नवजात बालक आणि लहान मुलांची बायोमेट्रिक माहिती वयाच्या आधारे घेतली जाईल.
  • जन्म प्रमाणपत्रांनी आई-वडिलांच्या आधार नंबर लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी आवश्यक आहेत.
  • त्यानंतर तुम्ही आधार सेवा केंद्रावर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांचे व नवजात बालकांचे आधार कार्ड बनवू शकता.

सदर लेखांमध्ये आपण नवीन आधार कार्ड व आधार कार्ड मधील बदल करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक कशी करायची? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही वरील माहितीच्या आधारे आधार कार्ड विषयक संपूर्ण प्रक्रियेसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page