व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

गुगल मॅप ॲप वापरताना काळजी घ्या, 1 ऑगस्टपासून बदलणार नियम

Google pay app

गुगल मॅप हे लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. साधारणपणे अनेक स्मार्टफोन वापरकर्ते प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी त्याचा वापर करतात. आता कंपनीने आपले नियम बदलले आहेत. हे बदल 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होतील. विशेष म्हणजे गुगल मॅपने किंमत 70 टक्क्यांनी कमी केली आहे. यासोबतच गूगलने मॅपचे शुल्क डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये स्वीकारण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत फक्त डॉलरमध्ये पेमेंट केले जात होते. यामुळे भारतीय वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Google Maps Reduced Price from 1 August

ओला मॅपने बाजारात प्रवेश केल्यावर गुगल मॅपने ही किंमत कमी केली आहे. तसेच, ओला मॅप विनामूल्य वापरला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत गुगल मॅपला मोठा धक्का देऊ शकतो. यापूर्वी गूगल नेव्हिगेशनसाठी भारतीयांकडून 4 ते 5 डॉलर मासिक शुल्क आकारत होते. जे 1 ऑगस्ट 2024 पासून 0.38 डाॅलर ते 1.50 डाॅलरपर्यंत कमी करण्यात आले आहे.

गुगल मॅपचा वापरकर्त्यांवर काय परिणाम होईल?

या बदलाचा सामान्य वापरकर्त्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र व्यवसायासाठी वापरल्यास पैसे द्यावे लागतील. मात्र, आता पूर्वीपेक्षा कमी पैसे मोजावे लागणार ही दिलासादायक बाब आहे. एवढेच नाही तर आता तुम्हाला डॉलरऐवजी भारतीय चलनात पेमेंट करण्याचा पर्याय मिळणार आहे.

Google Maps: फ्री vs. पेड वापर

अशा स्थितीत यूजर्सच्या मनात प्रश्न पडतो की, गुगल मॅप फ्री असताना मग किंमत कशासाठी कमी केली. गुगल मॅपचा वापर सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे. मात्र त्याचा व्यवसायासाठी वापर केल्यास त्यासाठी शुल्क आकारले जाते. ओला ही राइड शेअरिंग कंपनी आहे, जी नेव्हिगेशनसाठी गुगल मॅप वापरते. आता ओलाला गुगल मॅप वापरायचा असेल तर पैसे द्यावे लागतील. या पैशात कपात करण्यात आली आहे.

हे वाचा-  10000 आतील सर्वात बेस्ट 5 फोन, तेही आकर्षक फीचर्स सोबत

नवा नियम: व्यवसायांसाठी कमी शुल्क

गुगल मॅपने व्यवसायांसाठी मासिक शुल्क कमी केले आहे. हे बदल गुगल मॅपचे नवीन व्यावसायिक वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी आहेत. भारतीय रुपयांमध्ये पेमेंट स्वीकारण्यामुळे स्थानिक व्यवसायांसाठी पेमेंट प्रक्रिया अधिक सोपी होईल.

गुगल मॅपच्या या नवीन बदलांमुळे व्यवसायांसाठी वापरकर्ता अनुभव अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर होईल. विशेषतः, भारतीय वापरकर्त्यांसाठी ही एक मोठी सुविधा ठरणार आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page