व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Ladki Bahin scheme : 67 लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा | ladki bahin december installment

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींपैकी ६७ लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा झाली आहे.

Ladki Bahin Yojana December Payment Date : राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता महिलांमध्ये आहे.
आता याबद्दल मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे, तर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या सहावा हप्ता याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.

लाडकी बहीण योजना डिसेंबर हप्ता

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. एकूण २ कोटी २३ लाख लाभार्थींपैकी ६७ लाख बहिणींना १५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये वाटण्यात आले होते.

डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींपैकी ६७ लाख बहिणींच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले.

हे वाचा ????  आता सर्व महिला करू शकतात मोफत शिलाई मशीन साठी अर्ज, त्यासोबतच मिळवा ₹15,000 अनुदान!

1500 रुपयांप्रमाणे हप्ता जमा

१२ लाखांवर नवे लाभार्थी

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. १२ लाख ८७ हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते. त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही. दोन कोटी ३४ लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी १५०० हजार रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते. डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली. आदिती तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खातेवाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिली.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.

आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या १२ लाख ८७ हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. राज्यातील लाभार्थी बहिणींनी केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश मिळाले.

लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार

लाडकी बहीण योजनेत 1500 रुपयांच्या हप्ता 2100 रुपये अशी घोषणा महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान केली होती, आता लाडकी बहिणीच्या 2100 रुपयाच्या हप्ता कधी मिळणार याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळाला सांगितले की राज्याच्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वाढीव लाडकी बहीण योजनेच्या हप्ता महिलांना देण्यात येणार आहे, आता हा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होईल अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना आता 2100 रुपयाच्या हप्ता साठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हे वाचा ????  मोफत शौचालय योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा. Free Toilet Scheme 2025

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page