Ladki bahin yojana 1st installment
राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात पहिल्या हफ्त्याचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेचा पहिला हफ्ता मिळाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबईतील महिलांना मिळाले पहिले लाभ
मुंबईतील वरळी येथील एका महिलेच्या बँक खात्यात 14 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा झाला. विशेष म्हणजे 9 ऑगस्टला या महिलेच्या बँक खात्यात 1 रुपया चाचपणीसाठी जमा झाला होता. यानंतर लगेचच 14 ऑगस्टला तीन हजार रुपये जमा करण्यात आले. लातूर आणि धाराशिवसह राज्यातील विविध भागांमध्ये देखील महिलांना योजनेचा पहिला हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे.
सिंधुदुर्गातही महिलांना दिलासा
सिंधुदुर्गातील महिलांच्या बँक खात्यात देखील या योजनेचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या भागातील महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत. कणकवलीत तर महिलांनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला आहे.
लाडकी बहीण योजनेचा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का ते पहा.
पहिला हप्ता 17 ऑगस्टला
लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. त्यानुसार, 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनापूर्वीच (Rakshabandhan) बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची घोषणा
महिलांच्या बँक खात्यात पहिला हफ्ता जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. येत्या 17 ऑगस्टपर्यंत 1 कोटी 2 लाख महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हफ्ता जमा होणार आहे. त्यांनी सांगितले की, योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही महिलांच्या बँक खात्यात ट्रायल म्हणून 1 रुपये जमा करण्यात आले होते, त्याचाच एक भाग म्हणून आता दोन महिन्यांचे हफ्ते जमा केले जात आहेत.
लाडकी बहीण योजनेत महत्त्वाच्या अपडेट्स
- 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
- अर्जाच्या प्रक्रियेनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
- 17 ऑगस्टला 1 कोटी 2 लाख लाभार्थ्यांना पहिला हफ्ता मिळणार आहे.
- 10 दिवसांनी उर्वरित लाभार्थ्यांनाही हफ्ता मिळेल.
- सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेले नाहीत, यावर काम सुरु आहे.
राज्याच्या महिला वर्गासाठी ही योजना खूपच दिलासा देणारी ठरत आहे. महिलांना आर्थिक मदतीसोबतच आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका निभावत आहे.