व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रा मधील 12 जिल्ह्यातील या गावातून जाणार |शक्तीपीठ एक्सप्रेसवे गावांची यादी

महाराष्ट्र राज्याला अनेक ऐतिहासिक व प्राचीन वारसे लाभलेले आहेत .त्यामध्येच सुप्रसिद्ध अशी शक्तीपीठे देखील आहेत. हे मंदिर भाविकांसाठी अध्यात्मिक आणि  धार्मिक महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्र मध्ये प्रमुख साडेतीन शक्तीपीठे आहेत. पहिले कोल्हापूरची अंबाबाई /महालक्ष्मी देवीचे मंदिर, दुसरे म्हणजे तुळजापूरची आई भवानीचे मंदिर, तिसरे म्हणजे माहूरची रेणुका देवीचे मंदिर, चौथे म्हणजेच अर्धे शक्तिपीठ असणारे नाशिक मधील सप्तशृंगी देवीचे मंदिर ही सर्व शक्तीपीठे कमीत कमी एकमेकांपासून तीनशे किलोमीटर अंतराच्या पुढे आहेत. पण केंद्र शासनाने या धार्मिक स्थळांचा लौकिक व पर्यटन वाढवण्यासाठी एक नवीन महामार्ग म्हणजेच शक्तिपीठ महामार्ग तयार करण्यात येणार आहे. असे सांगितले आहे. या महामार्गाला नाव जरे शक्तिपीठ महामार्ग असे देण्यात आले असले तरी हा महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना व पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी तयार केला जात आहे .हा महामार्ग या शक्तिपीठांना देखील जोडत असल्यामुळे, या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.

शक्तिपीठ महामार्गाचा प्रारंभ

शक्तिपीठ महामार्ग जरी नागपूर गोव्यादरम्यान असला तरी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अनुषंगाने या महामार्गाची सुरुवात वर्धा मधील पवनार येथे सुरू होत. असून हा रस्ता गोव्याच्या दिशेने पत्रादेवा येथे येऊन संपेल. मग हा रस्ता वर्धा पासून सुरु होऊन ,पुढे यवतमाळ, हिंगोली ,नांदेड, परभणी ,बीड, लातूर ,धाराशिव ,सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग तयार होत आहे. यापूर्वी सहा लेन एक्सप्रेस वे मुळे प्रवासाचा वेळ हा सुमारे 21 तास लागत होता. पण या महामार्गाच्या तयार झाल्यानंतर फक्त आठ तासांवर येईल.

हे वाचा-  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज, पात्रता आणि माहिती

शक्तिपीठ हायवे ला लागणारे क्षेत्र

शक्तिपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यातून जाणार असून. हा श्री सप्तशृंगी देवी माहूर , श्री रेणुका देवी माहूर, श्री अंबाबाई देवी, कोल्हापूर. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी, तुळजापूर. श्री योगेश्वरी देवी ,आंबेजोगाई. श्री सिद्धिविनायक, सिद्धिविनायक. श्री कालिका देवी ,कालिकावाडी . अशा ऐतिहासिक धार्मिक स्थळांना जोडत बारा जिल्ह्यांमधून या महामार्गाचा आराखडा योजलेला आहे. महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग सुमारे सातशे किलोमीटर लांबीचा असून यासाठी 9000 हेक्टर जागा संपादित केलेली आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गापेक्षा 800 किलोमीटर आहे .त्यामुळे या महामार्गाचा अंदाजे 11000 हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे .तर हे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळासाठी भूसंपादन करण्यासाठी एक मोठे आव्हान असणार आहे.

महामार्गामुळे होणारे फायदे

भारत देश हा समृद्धी महामार्गामुळे सुधारित कनेक्टिव्हिटी मध्ये सध्या तिसऱ्या क्रमांकावरील देश आहे. अशा महामार्गामुळे देशांमधील व राज्यांमधील बऱ्याच गोष्टींना मोठ्या प्रमाणात लाभ होतो. तसेच या शक्तिपीठ महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडले गेल्यामुळे आपोआपच पर्यटन आणि व्यापार वाढण्यास मदत होईल, त्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात याचा हातभार लाभेल. महामार्गाच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार लागत असल्यामुळे रोजगार निर्मिती देखील होईल. राज्यामध्ये अशा सुधारित रस्त्यामुळे दळणवळण व्यवस्था सुरळीत होते . प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होतो . वशहरातील आणि गाव भागातील कमी वेळामध्ये ये-जा करण्यासाठी चांगला उपयोग होतो.

हे वाचा-  ऑनलाइन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करा | Driving Licence apply

महामार्ग कधी पूर्ण होईल ?

या महामार्गाचा पूर्ण आराखडा हा महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने केंद्र सरकारला पाठवला आहे ,तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला .असून त्याचे काम वेगाने सुरू आहे .शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा एमएसआरडीसी चा प्रयत्न आहे. हा महामार्ग विदर्भ मराठवाडा आणि कोकण यांना जोडत असल्यामुळे तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग आहे .त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्या वतीने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. या महामार्गाचे सर्वेक्षण अर्थात महामार्ग कुठून आणि कसा जाणार यासंबंधीची सर्व माहिती व मार्ग निश्चित केल्या गेलेला आहे. व महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी या महामार्गाचे संपूर्ण आराखडा हा मांडलेला आहे. शक्तिपीठ महामार्ग राज्यातील सर्वात लांब महामार्ग असेल असेही अनिल कुमार गायकवाड यांनी स्पष्ट केलेले आहे.

शक्तीपीठ महामार्गाचा पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. यामध्ये वृक्षारोपण ,वन्य प्राण्यांसाठी वन्यजीव क्रॉसिंग आणि ध्वनी भिंतींचा समावेश करण्यात आला आहे. पण या महामार्गाला काही प्रमाणात विरोध होत आहे ,कारण महामार्गाचा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. की महामार्गामुळे जमिनीचे अधिग्रहण आणि विस्थापन होईल. एकंदरीत शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील एक खूप मोठा प्रकल्प आहे. महामार्गाचे अनेक फायदे आहेतच ,परंतु या महामार्गापासून होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी यासाठी लागणारे .योग्य ते व्यवस्थापन महाराष्ट्र शासनाने करणे गरजेचे आहे .या प्रकल्पाबाबतीत प्रकल्पाचे फायदे आणि तोटे यांचा काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

2 thoughts on “शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रा मधील 12 जिल्ह्यातील या गावातून जाणार |शक्तीपीठ एक्सप्रेसवे गावांची यादी”

  1. महामार्गाच्या दुतर्फा देशी झाडे घनदाट वाढली तरच यांचा उपयोग जास्त होईल. मागील सात आठ वर्षांपासून महामार्गाच्या नावाखाली शेकडो वर्षे जुन्या झाडांची अक्षरशः कत्तल झाली परंतु वीस टक्के महामार्गांच्या दुतर्फा झाडे लावलीत नाहीत. संबंधित यंत्रणा व सरकारला विनंती की झाडे नाही लावली व जोपासली तर टोल वसुलीचे अधिकार काढून घ्यावेत.

    उत्तर

Leave a Comment