व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मोबाईलवरून कोणाचेही लोकेशन ट्रॅक करण्यासाठी.. पहा संपूर्ण माहिती! Location Tracker Apps

मोबाईलवरून कोणत्याही व्यक्तीचे अर्थात त्याच्या परवानगीने लोकेशन ट्रॅक कसे करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहूया.

मोबाईलवरून कोणत्याही व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करणे हा एक तांत्रिक त्याचबरोबर कायदेशीर दृष्ट्या खूपच महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. सध्या लोकेशन ट्रॅक करण्यासाठी अनेक पद्धती आणि ॲप्स उपलब्ध असले तरी, कोणत्याही व्यक्तीचे लोकेशन संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय ट्रॅक करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

मोबाईलवरून परवानगीशिवाय लोकेशन ट्रॅक करण्याबाबतच्या कायदेशीर तरतूद

कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचे लोकेशन ट्रॅक करणे हा जगभरातील अनेक देशांमध्ये गोपनीयता कायद्याचा भंग मानला जातो. भारतामध्ये सुद्धा याबाबतची कायदेशीर तरतूद आहे. यामध्ये IT act 2000 आणि Personal Data Protection Bill या दोन कायदेशीर तरतुदींचा समावेश केला आहे. या दोन कायदेशीर तरतुदीमध्ये या गोष्टींसाठी कठोर नियम केले आहेत. म्हणूनच तुम्ही फक्त कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि कर्मचारी यांचे लोकेशन त्यांच्या संमतीने ट्रॅक करू शकता. यांच्या संमतीशिवाय तुम्ही जर यांचे लोकेशन ट्रॅक केले तर, तो कायद्याने गुन्हा ठरतो.

मोबाईलवरून कोणाचेही लोकेशन ट्रॅक करण्याचे फायदे

मोबाईलवरून कोणाचेही लोकेशन ट्रॅक करण्याचे फायदे काय आहेत? ते आपण खाली पाहूया:

  • पालक आपल्या मुलांचे लोकेशन ट्रॅक करून त्यांची सुरक्षितता सुरक्षित करू शकतात.
  • एखादी व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीमध्ये असल्यास तिला मदत देण्यासाठी सदर व्यक्तीचे लोकेशन खूप महत्त्वाचे असते.
  • व्यवसायामध्ये डिलिव्हरी कर्मचारी, कस्टमर सर्विस एजंट यांचे लोकेशन ट्रॅक करून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करता येते.
  • सार्वजनिक वाहतूक, कॅप सर्विसेस यामध्ये लाईव्ह लोकेशन ट्रेकिंग मुळे ग्राहकांना संबंधित सेवांची अचूक माहिती मिळते.
  • पोलीस आणि तपास यंत्रणा गुन्हेगार शोधण्यासाठी लोकेशन ट्रेकिंगचा उपयोग करतात.
हे वाचा 👉  एसबीआय कडून दहा लाख रुपयांचा पर्सनल लोन घेतल्यास किती रुपयांचा हप्ता बसेल| SBI Personal Loan app

परंतु, लोकेशन ट्रॅक करताना काही अपवाद वगळता संबंधित व्यक्तीची संमती घेणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे.

मोबाईलवरून कोणाचेही लोकेशन ट्रॅक कसे करायचे?

WhatsApp Live Location

जर तुम्हाला एखाद्याचे लोकेशन त्याच्या परवानगीने ट्रॅक करायचे असेल तर, WhatsApp Live Location हा एक चांगला पर्याय आहे. WhatsApp Live Location द्वारे..

  • ज्या व्यक्तीचे आपणाला लोकेशन ट्रॅक करायचे आहे ती व्यक्ती त्याच्या WhatsApp च्या Share Live Location या फीचर्सद्वारे त्याचे लोकेशन शेअर करू शकते.
  • 15 मिनिटे, 1 तास, 8 तास अशा वेगवेगळ्या कालावधीचे लोकेशन शेअर करता येते.
  • तुम्ही सदर व्यक्तीचे लोकेशन, लोकेशन मॅप वर पाहू शकता.

मोबाईल नेटवर्कद्वारे लोकेशन ट्रॅक

मोबाईल कंपन्या लोकेशन ट्रॅक करण्यासाठी नेटवर्क टॉवरचा वापर करतात. मोबाईल नेटवर्कद्वारे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी पोलीस किंवा सरकारी यंत्रणांना फक्त त्यांच्या आवश्यकतेनुसार परवानगी असते. मोबाईल नेटवर्कद्वारे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी…

  • मोबाईल नेटवर्क Cell Tower Triangulation चा वापर करून एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक केले जाते.
  • हे मोबाईल नेटवर्क लोकेशन ट्रॅक इंटरनेटशिवाय काम करते.
  • मोबाईल नेटवर्क लोकेशन ट्रॅकर चा वापर फक्त सरकारी यंत्रणा आवश्यकतेनुसार करू शकतात. सामान्य व्यक्तींना याचा वापर करता येत नाही.

थर्ड पार्टी ॲप्सच्या माध्यमातून लोकेशन ट्रॅक

सध्या काही ॲपच्या माध्यमातून मोबाईल वरून कोणाचेही लोकेशन ट्रॅक केले जाते. यामध्ये iSharing, Life360, Find My Friends, FamiSafe यासारखे अत्यंत लोकप्रिय ॲप्स आहेत. लोकेशन ट्रॅकर ॲप्स कसे वापरायचे?..

  • हे ॲप्स लोकेशन ट्रॅक करण्यासाठी दोन व्यक्तींच्या फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागतात.
  • त्यानंतर मोबाईलमध्ये लोकेशन शेअरिंग सुरू करावे लागते.
  • त्यानंतर तुम्ही सदर व्यक्तीचे Live Location ट्रॅक करू शकता किंवा पाहू शकता.
  • हे ॲप्स कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासाठी खूप उपयोगी आहे. त्याचबरोबर सुरक्षित आणि कायदेशीर आहे.
हे वाचा 👉  यंदा दिवाळीत पण पाऊस पडणार का ? पुढील महिन्याचा हवामान अंदाज काय सांगतो पहा.

स्पायवेयर किंवा हॅकिंगद्वारे लोकेशन ट्रॅक

काहीजण स्पाय ॲप्स किंवा हॅकिंग टेक्निक्स वापरून विनापरवानगी इतरांचे लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतात. पण असे करणे कायद्याने गुन्हा आहे. Spyzie,FlexiSPY,mSpy यासारखे काही स्पाय ॲप्स एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी उपलब्ध असले तरी, कोणाच्याही परवानगीशिवाय या स्पाय ॲप्स्चा वापर करणे बेकायदेशीर आहे. स्पाय ॲप्सचा वापर करून एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करणे…

  • तुमच्या स्वतःच्या गोपनीयतेसाठी धोकादायक आहे.
  • स्पाय ॲप्सचा वापर करणे बेकायदेशीर असल्याने तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणूनच तुम्ही जर एखाद्याचे लोकेशन या ॲपच्या माध्यमातून ट्रॅक करत असाल तर तो गुन्हा ठरू शकतो.

या पोस्टमध्ये आपण कोणाचेही लोकेशन ट्रॅक मोबाईलवरून त्याच्या परवानगीने कसे करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या सुरक्षेसाठी या लोकेशन ट्रॅकरचा वापर त्यांच्या परवानगीने करून त्यांचे लोकेशन ट्रॅक करू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page