व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Mahindra Bolero Pickup फक्त 25 हजारात घरी, घेऊन जा , जाणून घ्या कसं…| Mahindra Bolero Pickup भारतात लॉन्च.

Mahindra Bolero MaXX Pickup: प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra) आपले कमर्शियल वाहन Mahindra Bolero Pickup ट्रक लॉन्च केले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Bolero Pickup मध्ये कंपनीने काही अपडेट्स करून हा ट्रक पुन्हा बाजारात उतरवला आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये बोलेरो पिकअपचं नवीन व्हर्जन लाँच केलं आहे. नव्या ‘2024 महिंद्रा बोलेरो कँपर रेंज’ला अनेक नवनवीन अपग्रेड्ससह बाजारात उतरवण्यात आलं आहे. यामध्ये डबल केबिन पिकअप असून गोल्ड VX, 4WD, नॉन-AC, कॅश व्हॅन आणि गोल्ड ZX अशा पाच व्हेरिअंटमध्ये ही गाडी उपलब्ध असणार आहे. महिंद्रा बोलेरो गोल्ड ZX ची वजन वाहण्याची क्षमता 1 हजार किलोग्राम इतकी असेल. अनेक आरामदायक फीचर्स यामध्ये असल्याचा दावा कंपनीने केला आहे. महिंद्राने ‘2024 बोलेरो कँपर रेंज’ची एक्स-शोरुम किंमत 7.68 लाख रुपये ठेवली आहे.

फक्त 1 लाख रुपयांमध्ये टाटाची योद्धा गाडी कशी घ्यायची हे पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

या लहान आकाराच्या पिकअप ट्रकची एक्स-शोरूम किंमत कंपनीने 7.68 लाख रुपये ठेवली आहे. महिंद्रा या वाहनावर जबरदस्त फायनान्सचा पर्याय देखील देत आहे. ज्या अंतर्गत तुम्ही फक्त 25,000 रुपयांचे डाऊन पेमेंट करून हा ट्रक घरी नेऊ शकता. महिंद्राचा हा पिकअप ट्रक या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे.

हे वाचा-  mStock ॲप मधून ट्रेडिंग करा. | Download and install mStock app | mStock ॲप डाऊनलोड करा.

बोलेरो मॅक्स पिकअपचे फीचर्स 

या बोलेरो पिकअपच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये, ग्राहकांना मोठी स्पेस मिळणार आहे. यातील टेलिमॅटिक उपकरणाच्या कनेक्टेड तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही हा ट्रक नेहमी ट्रॅक करू शकता. या नवीन पिकअपमध्ये शक्तिशाली 3 लीटर इंजिन देण्यात आले आहे. याला नवीन डॅशबोर्ड आणि नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट रेडिएटर ग्रिल मिळते. हा ट्रक 17.2 kmpl चा मायलेज देतो आणि याची पेलोड क्षमता 1300 kg आहे.

फक्त एक लाख रुपयांमध्ये टाटा योद्धा गाडी घ्या. अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा.

महिंद्रा या मिनी पिकअपसाठी 20,000 किलोमीटरच्या सर्व्हिस इंटरव्हलसह 3 वर्षे किंवा 1,00,000 किमी, यापैकी जे आधी असेल त्याची वॉरंटी देखील देत आहे. ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिकअपमध्ये एक जबरदस्त इंजिन आणि पॉवर असून यात उंची-अ‍ॅडजस्टेबल सीट, आधुनिक iMAXX तंत्रज्ञान, क्लास-लीड पेलोड क्षमता आणि सेफ्टी लाईट टर्न सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यात अनेक फर्स्ट-इन-सेगमेंट नवीन फीचर्सही देण्यात आले आहे.

इंजिन 

महिंद्राने या पिकअपमध्ये 3-लिटर m2Di इंजिन दिले आहे. जे 65 bhp पॉवर आणि 195 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात मजबूत R15 टायर बसवले गेले आहेत. जे अधिक लोडिंगला सपोर्ट करतात. 

फीचर्स

हा पिक-अप ट्रक iMAXX प्रणालीशी जोडण्यात आला आहे. हे जिओ-फेन्सिंग, मार्ग नियोजन, वाहन ट्रॅकिंग, खर्च व्यवस्थापन, आरोग्य निरीक्षण यासह 50 हून अधिक वैशिष्ट्ये ऑफर करते. यात एलईडी टेललॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, उंची ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि 20,000 किमी सर्व्हिस इंटरव्हल देखील आहे.

हे वाचा-  मोफत पिठाची गिरणी योजना 2024 अंतर्गत अर्ज कसा करावा | how to apply floor mill scheme in Maharashtra.

टाटा योद्धाशी स्पर्धा करते

हे पिकअप टाटा योधाशी स्पर्धा करते, ज्यात 3.0L BS6 डिझेल इंजिन आहे. या वाहनाची किंमत ६.९५ लाख ते ७.५० लाख रुपये आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “Mahindra Bolero Pickup फक्त 25 हजारात घरी, घेऊन जा , जाणून घ्या कसं…| Mahindra Bolero Pickup भारतात लॉन्च.”

  1. खरंच खूप छान
    पण
    शोरूम् आणी फायनान्स यांनी ऍडजस्ट केल्यास खूप विक्री होणार…

    उत्तर

Leave a Comment