नमस्कार मित्रांनो आज आपण मराठा आरक्षण बद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपल्याला माहीतच आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मोठा एल्गार केलेला आहे. या एल्गार सुरुवात अंतरवाली सराटी मध्ये झाली असून त्यांनी आता खूप मोठे रूप घेतलेले आहे व मराठ्यांचा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने शासनाकडे खालील मागण्या सरकारकडे केलेले आहेत. व सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मोर्चा हा मुंबईकडे जात आहे व हा मोर्चा गेल्या काही दिवसापासून अंतरवाली सराटी पासून ते मुंबई पर्यंत असा निश्चित आहे व त्या रीतीने सध्या मोर्चा हा नवी मुंबईतून मुंबईकडे जाणार आहे व जात असताना वाशी येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटलांनी खालील मागण्या सरकारकडे केलेले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांची मूळ मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे अशी केली आहे की महाराष्ट्रातील मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये प्रवेश करावा. व व मराठा समाजाला टिकणारा आरक्षण द्यावं ही सरकारकडे मागणी केलेली आहे. ही मागणी मान्य केल्यामुळे मराठा समाजातील येत्या तरुण पिढीला या आरक्षणाचा खूप उपयोग होईल शैक्षणिक बाबतीत विद्यार्थ्यांना या आरक्षणामुळे फायदा होणारच आहे व त्याचबरोबर नोकरीचा ही प्रश्न सुटणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे दुसरी मागणी
मराठ्यांचा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे दुसरी मागणी अशी केलेली आहे की की समाजाला लाजवणारी जी घटना घडली होती कोपर्डी मध्ये त्या कोपर्डीच्या आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी कारण जर या समाजामध्ये विकृत मानसिकतेचे जर माणसे असतील तर त्याचा परिणाम येणाऱ्या भविष्यातील पिढीवर देखील होऊ शकतो व त्या नराधमास त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर कोपर्डी बलात्कार आरोपीला फाशी व्हावी ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे कारण त्याला फाशी झाल्यावर पुन्हा कोणीही तसे घाणेरडे कृत्य करण्याचे प्रयत्न करणार नाही करण्याचे प्रयत्न नाही. जर त्याला फाशी झाली तर समाजातील अशा विकृतीला आळा बसेल.
मनोज जरांगे पाटील यांची तिसरी मागणी
तसेच म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी पुढे बोलताना असे म्हटले आहे की आज पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिले त्यांच्या लढ्यातील शहिदांच्या घरच्यांना सरकारकडून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. आणि त्यांच्या घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे कारण आज पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिले त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडलेले आहे व स्थिती सुधारण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे ही मागणी केलेली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची चौथी मागणी.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे चौथी मागणी अशी मांडली आहे की, दर दहा वर्षाला ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा सर्वे करण्यात यावा व आतापर्यंत तो सर्वे एकदाही करण्यात आलेला नाही व तो सर्वे करण्यात यावा असा सर्वे करून ओबीसी आरक्षणामधील प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकार पुढे मांडले आहे. असे केल्याने ज्यांना खरोखरच आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण मिळेल व आर्थिक दृष्ट्या प्रगत आपोआपच आरक्षणातून बाहेर येतील. या हेतूने मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी सरकारला केलेली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची पाचवी मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे पाची मागणी अशी केली आहे की सारथी संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे इतर प्रश्न तातडीने सोडवले पाहिजेत कारण सारथी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट मराठा कुणबी या लक्षात गटातील समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे हे होते या गटातील लोकांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणे व त्यांच्या आर्थिक सामाजिक स्थिती सुधारणे हा यामागील हेतू होता पण काही गेल्या वर्षात काही गेल्या वर्षात याचा निधी फारच कमी करण्यात आला आहे त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा फारसा फायदा होत नाही व मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या हेतूने ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची सहावी मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी सहावी मागणी अशी केली आहे की आम्हाला कोणाच्या आरक्षण नको आम्हाला आमच्या स्वतंत्र हक्काच्या टिकणारे आरक्षण हवे आहे . मनोज जरांगे पाटील यांनी अशी मागणी केली आहे की येत्या काळात होणाऱ्या भरत्या जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ज्या भरत्या होणार आहेत त्यामध्ये मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवाव्या ही मागणी सरकारकडे केलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा केलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मनोज जरांगे पाटील मागे हटणार नाहीत. भलेही माझे अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी सरकारला दिलेला आहे व या लाखो मराठा समाजाने भाजप सरकारला राज्यात 105 जागावर निवडून दिले हे विसरू नये असा इशारा सरकारला देत म्हणून पाटील म्हणाले केंद्रातील मंत्रिमंडळ आणि राज्यातील मंत्रिमंडळाने एकत्र येऊन सर्वसामान्य मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावे अशी मी नम्रतेची मागणी करत आहे.