व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

काका करत होते अस्सल नागाला घाबरवण्याचा प्रयत्न, नागाने डायरेक्ट पोहोचवले ढगात..

Animal Video: किंग कोब्राला आव्हान देणं काकांनी पडलं भारी, शायनिंगच्या नादात डोळ्यावर झाला वार, थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल

सापांशी कधी मस्करी करू नका कारण ते कधी हल्ला करतील सांगता येत नाही. असा सल्ला सर्पमित्र वारंवार देतात. कारण सापांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. अन्यथा विषारी साप तुम्हाला कधी डसेल सांगता येत नाही. पण काही अतिउत्साही लोकं तज्ज्ञांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. अन् मग त्यांच्यासोबत काय घडतं हे आता तुम्हीच पाहा.

एका काकांनी थेट किंग कोब्राला घाबरवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ ते त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहात होते. परिणामी साप बिथरला आणि त्यानं थेट काकांच्या डोळ्यावर हल्ला केला. पुढे या काकांचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा.
(फोटो सौजन्य – therealtarzann/instagram)

सापानं कसा केला हल्ला?

सापांचे डोळे हे माणसांसारखे काम करत नाही. कारण सापांनी समोरची दृश्य ही कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसतात. हा आता काही साप असेही आहेत ज्यांना हिरवा आणि निळा रंग दिसतो. पण ते फारच क्वचित आहेत. बरं, सापांना लांबी कळते पण रूंदी कळत नाही तसंच ते ६ फुटांपेक्षा लांब पाहू शकत नाही. कारण त्यांची दृष्टी ही द्विमितिय असते.
असो, पण हे सांगण्याचं कारण म्हणजे सापांना नियंत्रणात ठेवण्यासाठी ते तुमच्याकडे कुठल्या नजरेनं पाहताहेत हे लक्षात येणं गरजेचं आहे. पण लोकं एखाद्या मांजरीला पकडावं तसं पकडाया जातात आणि मग त्यांच्यावर हल्ला होतो. अन् असाच काहीसा अनुभव या काकांनी घेतला असावा.
हे काका बराच वेळ सापाकडे एक टक पाहात होते. दरम्यान साप बिथरला आणि थेट त्यांच्या डोळ्यांवर त्यानं हल्ला केला. पुढे या काकांचं काय झालं असेल हे काही वेगळं सांगायला नको. कारण सापाच्या दंशामुळे त्यांच्या डोळ्यांना चांगलीच इजा झालेली असणार. अगदी सापाचं विष काढलेलं असलं तरी डोळे हा नाजूक भाग आहे. डोळ्यांत साधं बोट गेलं तरी तो लाल येतो आणि इथे तर थेट सापानं हल्लाच केलाय.
(फोटो सौजन्य – therealtarzann/instagram)

यामध्ये चूक कोणाची?

हा व्हिडीओ therealtarzann या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ४ कोटी २४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. असो, तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

हे वाचा-  नमो शेतकरी महासन्मान योजना: आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page