व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन ‘आधार ॲप’, (Aadhar App) आधार ॲप लॉन्च केल्यामुळे आता जवळ आधार कार्ड बाळगण्याची गरज नाही.. पहा सविस्तर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

तुम्हाला तर माहीतच आहे की, आधार कार्ड हा अतिशय महत्त्वाचा सरकारी दस्ताऐवज आहे. सध्या आधार कार्डचा वापर सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याचबरोबर आर्थिक व्यवहार करण्यासाठी अशा विविध महत्त्वाच्या कामांसाठी होतो. अशा ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड देणे अनिवार्य असते. त्यामुळे आधार कार्ड तुम्हाला फिजिकल कॉपी स्वरूपात जवळ ठेवावे लागते. परंतु आता तुम्हाला फिजिकल कॉपी स्वरूपात आधार कार्डचा वापर करायचा नसल्यास मोबाईल ॲप द्वारे आधारचा वापर करता येणार आहे. याबाबतची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली आहे.  या पोस्टमध्ये आपण आधार ॲप विषयीची संपूर्ण माहिती यामध्ये नवीन आधार काय आहे? त्या ॲपचा नागरिकांना काय आणि कसा फायदा होणार आहे? नागरिक या ॲपचा वापर कधीपासून करू शकतात? हे सविस्तर पाहूया.

आधार ॲप (Aadhar App) विषयी थोडक्यात..

केंद्र सरकारने नुकतीच आधार ॲप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या ॲपचा वापर करणे अगदी यूपीआय ॲपवर पेमेंट करणे इतके सोपे असणार आहे. सर्वसामान्यांना अगदी सहजरीत्या या ॲपचा वापर करता यावा अशा पद्धतीने हे ॲप डिझाईन केलेले आहे. या ॲपमध्ये स्मार्टफोन द्वारे नागरिकांना आधार-आधारित डिजिटल सेवा प्रदान केली जाणार आहे, त्यासाठी फेस रिकॉग्नायजेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर केला जाणार आहे.

आधार ॲप तयार करताना ॲप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. जेणेकरून आधार कार्ड द्वारे होणारी फसवणूक, माहिती मध्ये बदल आणि त्याचा होणारा गैरवापर टाळणे यासाठी हे आधार ॲप तयार करण्यात आले आहे.

हे वाचा 👉  Ladki bahin Yojana: निकष डावलून लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींची रक्कम होणार सरकारजमा, अर्जाची होणार पडताळणी.

आधार ॲपची (Aadhar App) वैशिष्ट्ये

आधार ॲप डिझाईन करताना यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे जेणेकरून हे ॲप वापरताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये. यामध्ये विशेष करून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केला आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत? हे आपण खाली पाहूया:

  • आधार ॲपमध्ये ओळख तपासण्यासाठी किंवा कोडद्वारे आणि रियल-टाईम फेस रिकॉगनायझेशनचा वापर केला जाणार आहे.
  • तुम्हाला प्रवास करताना त्याचबरोबर हॉटेलमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आधारसंबंधित माहितीची पडताळणी करण्यासाठी फिजिकल आधार कार्ड बाळगण्याची किंवा त्याची प्रत बरोबर ठेवण्याची आता गरज भासणार नाही.
  • फेस रिकॉगनायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मोबाईलवर आधार-आधारित डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल.
  • आधार कार्डची फिजिकल कॉपी सादर करण्याऐवजी आता या ॲपद्वारे कोणतीही व्यक्ती किंवा कोड स्कॅन करून आधार संबंधित माहितीची पडताळणी करू शकते.
  • नवीन आधार ॲप वापरकर्त्यांना आता केवळ त्यांची आवश्यक माहितीच शेअर करता येते, त्यामुळे त्यांचा वैयक्तिक डेटा उघड होणार नाही.
  • संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे किंवा कोड वापरून यूपीआयचा वापर केला जातो, अगदी तसेच आधार पडताळणी करण्यासाठी किंवा कोडचा वापर केला जाणार आहे. हे या ॲपचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
  • लोकांना हे आधार ॲप वापरून केवळ किंवा कोड सेंड करावे लागेल आणि त्यांची ओळख फेस रिकॉगनाझेशनद्वारे निश्चित केली जाईल.
  • महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड हे आता कागदी प्रतऐवजी तुम्हाला कोणत्याही कामांसाठी तुमच्या मोबाईलवरून सुरक्षितपणे पाठवता येते.
  • आधार ॲपमुळे आधार कार्ड वरील माहितीचा अनधिकृत पणे होणारा गैरवापर रोखण्यास मदत होईल.
  • आधार ॲप Unique Identification Authority of India च्या देखरेखीखाली विकसित केले गेले आहेत.
  • हे ॲप पूर्णपणे डिजिटल आणि सुरक्षित असून याचा वापर केवळ वापरकर्त्याच्या परवानगीनेच करता येईल.
हे वाचा 👉  फ्लॅट किंवा जमीन – कुठे गुंतवणूक करावी? जाणून घ्या सर्वोत्तम पर्याय. Flat or land, where to invest? Lets know.

आधार ॲप (Aadhar App) वापरकर्त्यांसाठी कधी उपलब्ध होईल?

आधार ॲप Early Access Format मध्ये लॉन्च केले जाणार आहे. सुरुवातीला या ॲपचा काही मर्यादित लोकांनाच वापर करता येईल. यामध्ये आधार संवाद कार्यक्रमासाठी नोंदणी केलेल्या लोकांचा समावेश असेल.

Unique Identification Authority of India च्या माहितीनुसार, वापरकर्ते आणि भागीदार दोघांकडून अभिप्राय घेऊन ज्याचा वापर आधार ॲप लॉन्चपूर्वी केला जाणार आहे. या अभिप्रायाच्या आधारेच Unique Identification Authority of India लवकरच हे ॲप सर्वांसाठी उपलब्ध करून देईल.

आधार ॲपचे (Aadhar App) फायदे

आधार ॲपचे डिजिटल पडताळणी वैशिष्ट्यसह अनेक फायदे आहेत. हे फायदे काय आहेत? हे आपण खाली पाहूया:

  • सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे फिजिकल आधार कार्ड बाळगण्याची आता आवश्यकता नाही. अनेकदा फिजिकल आधार कार्ड हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता असते, ज्यामुळे अनेकदा या आधार कार्डचा गैरवापर देखील केला जातो. या ॲपमुळे फसवणूक आणि डुप्लिकेट आधार कार्ड ची शक्यता पूर्णपणे कमी होते.
  • आधार ॲपमुळे वापरकर्त्यांना सरकारी योजना, बँकिंग व्यवहार, प्रवास, हॉटेल चेक-इन यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी प्रत्यक्ष आधार कार्ड बाळगण्याची किंवा त्याची प्रत देण्याची आवश्यकता आता राहणार नाही. प्रत्यक्ष आधारच्या प्रत ऐवजी नवीन ॲपद्वारे किंवा कोड स्कॅन करून ओळख पडताळणी केली जाईल.
  • फेस आयडी आधारित प्रमाणीकरणाव्यतिरिक्त नवीन आधार ॲप क्यूआर कोड पडताळणी वैशिष्ट्य देखील प्रदान करेल, ज्यामुळे आधार पडताळणी जलद आणि अधिक कार्यक्षम होईल.
  • आधार ॲपद्वारे आधार सुरक्षितपणे एखाद्या व्यक्तीच्या फोनवरून थेट शेअर करता येईल. यामुळे सायबर फसवणुकीपासून देखील संरक्षण मिळेल, कारण तुमची वैयक्तिक माहिती कोणाच्या हाती लागणार नाही. ते आधार ॲपद्वारे सुनिश्चित केले जाईल.
हे वाचा 👉  गायरान जमीन वापरणाऱ्यांना मोठा दंड – नवीन नियम‌ झाला जाहीर. using uncultivated land

या पोस्टमध्ये आपण केंद्र सरकारने लॉन्च केलेली आधार ॲप विषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. हे आधार ॲप तुमच्या डिजिटल ओळखीचा विश्वासार्ह साथीदार असणार आहे यामध्ये कोणतीच शंका नाही. कारण या ॲपमध्ये असलेली तुमची संपूर्ण माहिती सुरक्षित तर राहीलच त्याचबरोबर ही माहिती कोणाच्याही हाती लागणार नाही. त्यामुळे आधार कार्डच्या गैरव्यवहारापासून संरक्षण मिळेल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page