व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

केंद्र सरकारकडून मोफत कंप्यूटर कोर्स CCC करण्याची संधी, MSCIT करण्याची गरज नाही

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात, संगणकाचे ज्ञान हे प्रत्येक क्षेत्रात अत्यावश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गरीब आणि मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी CCC कोर्स मोफत तर इतरांना फक्त 590 रुपयात करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामार्फत आता विद्यार्थ्यांना फ्री मध्ये CCC (Course on Computer Concepts) आणि O Level संगणक कोर्स करण्याची संधी दिली जात आहे.

केंद्र सरकारचा पुढाकार

सरकारने या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या बाजारात हे कोर्सेस करण्यासाठी 5000 ते 10,000 रुपये खर्च येतो. मात्र आता सरकारच्या या योजनेमुळे आर्थिक दुर्बल विद्यार्थी देखील संगणकाचे ज्ञान मिळवू शकतात.

CCC कोर्ससाठी आवश्यक पात्रता

फ्री मध्ये हा कोर्स करण्यासाठी, विद्यार्थ्याने किमान 10वी किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे. तसेच मोफत कोर्स साठी त्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावी. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. मात्र, कोर्स मधून अर्धवट सोडल्यास, विद्यार्थ्याला नोंदणी शुल्क भरावे लागेल.

आवश्यक कागदपत्रे

या कोर्ससाठी नोंदणी करताना विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांची आवश्यकता भासेल. त्यात आधार कार्ड, ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

कोर्स बद्दल महत्वाची माहिती

CCC कोर्स करण्यासाठी सामान्य विद्यार्थ्यांना फक्त 590 रुपये खर्च आहे, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोणतीही फी देण्याची आवश्यकता नाही.

हे वाचा-  Nari Shakti doot app status: अर्ज स्थिती तपासण्याची संपूर्ण माहिती

विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करून घरच्या घरी CCC कोर्स करू शकतात. Youtube च्या माध्यमांतून हा कोर्स मोफत पूर्ण करता येतो. YouTube वर वेगवेगळे CCC कोर्स उपलब्ध आहेत त्यापैकी एखादा कोर्स करून तुम्ही ऑनलाईन परीक्षा देऊ शकता.

नोंदणी प्रक्रिया

  1. नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम NIELIT च्या अधिकृत वेबसाइटवर जा. किंवा वेबसाइटची डायरेक्ट लिंक खाली दिली आहे, त्यावर क्लिक करा.
  2. नोंदणीसाठी आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज करताना Direct नोंदणी हा पर्याय निवडा.
  3. CCC ची परीक्षा प्रत्येक महिन्यातून एकदा होते, तुमच्या सोयीनुसार परीक्षेचा महिना निवडा. त्यानंतर तुमच्या जवळचे परीक्षा केंद्र निवडा.
  4. त्यानंतर तुम्ही सामान्य प्रवर्गातून येत असाल तर ₹590 इतकी ऑनलाइन फी भरून घ्या
  5. तुमच्या परीक्षेच्या 15 दिवस आधी तुम्हाला याच वेबसाईट वर Admit Card मिळेल.
  6. तुम्हाला मिळालेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन ऑनलाइन परीक्षा द्या.
  7. परीक्षेचा निकाल 1 महिन्यानंतर लागेल, परीक्षा पास होण्यासाठी 100 पैकी 50 हून अधिक गुण मिळवणे आवश्यक आहे..

सरकारच्या या पुढाकारामुळे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे, जास्तीत जास्त विद्यार्थी या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment