व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा अनुक्रमे 19वा व 6वा हप्ता राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना एकत्रित मिळणार काय? जाणून घ्या सविस्तर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

या पोस्टच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांचा हप्ता यापूर्वी एकत्रित देण्यात आला होता. यावेळी सुद्धा या दोन्ही योजनांचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना एकत्रितपणे मिळू शकतो का? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेविषयी थोडक्यात…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना देशातील शेतकरी वर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आहेत. यापैकी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून तर नमो शेतकरी महासंघ निधी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबवली जाते. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने राबवली आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्षाला एकूण 12,000 रुपये जमा केले जातात. यामध्ये पीएम किसानचे 6000 रुपये व नमो शेतकरीचे 6000 रुपये आहेत. वरील रक्कम संबंधित सरकारकडून 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी हप्ता 2000 रुपये याप्रमाणे दर 4 महिन्याला वितरित केली जाते. वरील दोन्ही योजनांचा मुख्य उद्देश्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हे आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता मिळणार या तारखेला…

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 24 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात येणार आहेत. आतापर्यंत पीएम किसान सन्माननिधी योजनेचा 19 वा हप्ता कधी वितरित होणार याची उत्सुकता देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लागली होती त्या उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभ देशातील जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान सन्माननिधी योजनेचा 18 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून वितरित केला होता. त्याचबरोबर सदर योजनेचा 19 वा हप्ता सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रातूनच वितरित करतील अशी शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या तुलनेत यावेळी सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत.

हे वाचा 👉  ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत. | Apply for tractor subsidy Yojana.

पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा अनुक्रमे 19 वा व 6 वा हप्ता एकत्रित मिळू शकेल का?

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे. या हप्त्याबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

यापूर्वी पीएम किसान चा 18 वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 5 वा हप्ता एकत्रित देण्यात आला होता. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रित मिळतील असे वाटणे साहजिक आहे. परंतु यापूर्वी देण्यात आलेल्या दोन्ही योजनांची हप्ते एकत्रित वितरित केल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. म्हणूनच यावेळी सदर योजनांचे दोन्ही हप्ते एकत्रित वितरित केले जाणार नाहीत. यावेळी सुरुवातीला फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे.

नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा हप्ता कधी मिळणार?

नमो शेतकरी योजनेसाठी राज्यातील जवळपास 92 लाख शेतकरी पीएम किसान योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. यापूर्वी पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकत्रितपणे वितरित केले गेले होते. मात्र यावेळी फक्त पी एम किसान चा 19 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांकडून नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे वाचा 👉  बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना – मुलांना मिळणार दरमहा 5,000 हजार रुपये. Children of construction workers

तर पीएम किसान योजनेचा हप्ता 24 फेब्रुवारीला लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पी एम किसान चा 19 वा हप्ता वितरित केल्यानंतर राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाणार आहे. त्यानंतरच राज्याचा कृषी विभाग सदर यादीच्या अनुषंगाने लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6 वाहता वितरित करेल. यासाठी 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

या पोस्टमध्ये आपण पीएम किसान सन्माननिधी योजनेचा 19 व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याचा एकत्रित लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो का? याबाबतची संपूर्ण माहिती सविस्तरपणे तुमच्यासमोर मांडली आहे. आम्ही आशा करतो की वरील पोस्ट तुम्हाला नक्कीच याबाबतचे मार्गदर्शन करेल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page