व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

खराब किंवा कमी CIBIL Score किती दिवसात सुधारतो, आणि तो कसा सुधारायचा? पहा संपूर्ण माहिती..!

नमस्कार, आपण आजच्या या पोस्टमध्ये खराब किंवा कमी सिबिल स्कोर किती दिवसांमध्ये किंवा कालावधीमध्ये सुधारतो? त्याचबरोबर खराब किंवा कमी सिबिल स्कोर कसा सुधारायचा? याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया.

CIBIL Score विषयी थोडक्यात…

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) या पतमानांकन करणाऱ्या संस्थेची स्थापना रिझर्व बँकेच्या सिद्दिकी समितीच्या शिफारशीनुसार 2000 साली करण्यात आली होती. देशातील नागरिक तसेच कंपन्या यांच्या पतनिर्धारणासंबंधीची माहिती गोळा करणे तसेच पतमानांकन करणे हे सिबिलचे काम आहे. म्हणजेच एकंदरीत सांगायचे झाले तर देशातील नागरिक व कंपन्या यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती गोळा करून त्यांना त्यांच्या आर्थिक व्यवहाराचा शेरा देणे हे आहे. CIBIL Score हा एखाद्याच्या क्रेडिट इतिहासाचा आणि आर्थिक शिस्तीचा महत्त्वाचा निर्देशांक म्हणून ओळखला जातो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असल्यास बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज किंवा क्रेडिट कार्ड सहज मिळण्याची शक्यता असते.

Cibil score check करा

सुमारे 2400 बँका, वित्तीय संस्था तसेच नॉन वित्तीय संस्था सिबिलच्या सदस्य आहेत. या सिबिलच्या सदस्यांकडून देशातील बहुसंख्य नागरिकांची व कंपन्यांची आर्थिक व्यवहारांची माहिती सिबिलकडे असते.

2016 साली ट्रान्स युनियन या कंपनीने सिबिल मधील 82 टक्के भाग भांडवल खरेदी केले. आता सिबिल चे नाव ट्रान्स युनियन सिबिल असे आहे.

हे वाचा 👉  वोटर हेल्पलाईन ॲप मधून नवीन मतदान कार्ड काढा. |Apply for voter id card from voter helpline app.

खराब किंवा कमी CIBIL Score किती दिवसात किंवा कालावधीत सुधारतो?

खराब किंवा कमी CIBIL Score सुधारण्याची प्रक्रिया ही काही आठवड्यांपासून ते काही महिन्यांपर्यंतच्या (3 ते 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त) कालावधीपर्यंत सुरू असते. आपण खाली दिलेले खराब किंवा कमी सिबिल स्कोर सुधारण्याचे नियम काटेकोरपणे पाळले तर तुमचा सिबिल स्कोर 3 ते 6 महिन्यांमध्ये 50 ते 100 पॉईंट पर्यंत सुधारू शकतो. खराब किंवा कमी सिबिल स्कोर सुधारण्याची प्रक्रिया किती वेगाने होईल हे तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या गोष्टीवर अवलंबून असते.

खराब किंवा कमी CIBIL Score कसा सुधारायचा?

खराब किंवा कमी CIBIL Score सुधारण्याचे काही महत्त्वाचे उपाय आपण खाली पाहूया:

जुने कर्ज आणि जुन्या आर्थिक व्यवहाराची थकबाकी फेडा

जर तुम्ही एखाद्या जुन्या आर्थिक व्यवहाराचे थकबाकीदार असाल तर, सदरची थकबाकी लवकरात लवकर फेडणे आवश्यक आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँका, वित्तीय संस्था आणि नॉन बँकिंग वित्तीय संस्था तुम्हाला नवीन कर्ज देताना तुमच्या जुन्या कर्जफेडीचा इतिहास चेक करत असतात. जर तुम्ही थकबाकीदार असल्यास नवीन कर्ज मिळवणे अवघड तर होतेच त्याचबरोबर तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यास वेळ लागतो.

क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवणे

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची उपलब्ध मर्यादा पूर्णपणे वापरण्याऐवजी त्या मर्यादेचा 30% पेक्षा कमी वापर करा. हे तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यासाठी खूप चांगले असते.

हे वाचा 👉  स्टेट बँकेकडून वीस लाख रुपये वीस वर्षांसाठी गृह कर्ज घेतल्यास किती रुपये हप्ता बसेल | state bank home loan

वेळेवर कर्जाचा EMI व क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा

जर तुम्ही कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असेल किंवा तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर, कर्जाचा EMI व क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे खूप महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे जर तुम्ही कर्जाचा EMI व क्रेडिट कार्डची बिल भरण्यास उशीर केला तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होतो.

Cibil score check करा

कोणाचाही जामीनदार किंवा गॅरेंटर होताना विचार करा

एखाद्या व्यक्तीने कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जामीनदार किंवा गॅरेंटर केले असल्यास आणि त्याने वेळेवर खर्चाचे हप्ते भरले नाहीत तर, याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होऊ शकतो. त्यामुळे कोणाचाही जामीनदार किंवा गॅरेंटर होताना काळजीपूर्वक विचार करा. जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये वित्तीय संस्थांशी आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.

लहान वैयक्तिक कर्ज किंवा गृह कर्ज घेऊन त्याची वेळेवर परतफेड करा

फक्त आणि फक्त क्रेडिट कार्डचा वापर करण्याऐवजी तुम्ही लहान वैयक्तिक कर्ज किंवा गृह कर्ज घेऊन त्याची वेळेवर परतफेड केल्यास तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यास मदत होते.

एकापेक्षा अधिक वैयक्तिक कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू नका

जर तुम्ही एकाच वेळी अनेक बँका, वित्तीय संस्था किंवा नॉन बँकिंग वित्तीय संस्थांकडे वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड साठी अर्ज करणे टाळले पाहिजे. एकापेक्षा अनेक वैयक्तिक कर्जासाठी व क्रेडिट कार्ड साठी अर्ज केल्याने तुमच्याकडे रिपोर्टवर अनेक Hard enquiries दिसतात त्यामुळे याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होतो.

हे वाचा 👉  हे ॲप मोबाईल मध्ये ठेवा, ट्रॅफिक पोलिस पकडणार नाही.| M parivahan app download.

CIBIL Credit Report ची नियमित तपासणी करा

तुमच्या सिबिल क्रेडिट रिपोर्टची नियमित तपासणी करणे वित्तीय संस्थांची आर्थिक व्यवहार करण्यासाठी गरजेचे आहे. कारण त्यामध्ये कोणतीही चुकीची नोंद असल्यास त्वरित सिबिल कडे दुरुस्तीची विनंती करा. चुकीच्या नोंदीमुळे सिबिल स्कोर कमी होतो.

या पोस्टमध्ये आपण खराब किंवा कमी CIBIL Score किती दिवसांमध्ये किंवा कालावधीमध्ये सुधारतो? त्याचबरोबर खराब किंवा कमी CIBIL Score कसा सुधारायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे जर तुमचा सिबिल स्कोर खराब किंवा कमी असेल तर, तुम्ही तो सुधारू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page