नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी झालेल्या श्री राम मंदिराच्या प्रतिष्ठान नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली
आहे ती घोषणा म्हणजे असे की भारत सरकारकडून एक नवीन योजना चालू करण्यात येणार आहे .ती योजना म्हणजे प्रधानमंत्री सर्वोदय सोलार योजना या ह्या योजनेअंतर्गत एक कोटी लोकांना सर्वोदय सोलर योजना अमलात आणली जाणार आहे. योजनेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांनी मध्यमवर्गीय कुटुंबांना सोलर सिस्टम प्रदान करून स्वच्छ आणि परवडणारे शाश्वत ऊर्जापुरवठा सुनिश्चित करणे हा त्याचा मुख्य हेतू आहे .
या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला घेता येणार आहे . या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील लोकांना सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना अंमलात आणली जाणार आहे व याचबरोबर इतर आवश्यक सोलर उपकरणे मोफत दिली जातील.
सर्वोदय सोलर योजनेचे उद्दिष्टे
ही योजना भारत सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब व गरजू लोकांसाठी चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जेणेकरून ह्या कुटुंबांना खिशाला परवडणारी आणि शाश्वत ऊर्जापुरवठा सुनिश्चितपणे मिळावा म्हणून ही योजना अमलात येणार आहे. आणि याच बरोबर वीजनिर्मितीसाठी कोळसा प्रकल्पामधून होणारे वायू प्रदूषण पर्यावरण प्रदूषण हे रोखण्यासाठी ही योजना खूप मोठ्या प्रमाणात काम करते .कारण सोलर ऊर्जेचा उपयोग केल्यामुळे आपोआपच प्रदूषण कमी होते त्यामुळे वायू प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण संरक्षणामध्ये मोठे योगदान देणे हा याचा एक फायदा आहे. व या योजनेचा उपयोग भारताला ऊर्जा आत्मनिर्भर बनवण्यास देखील होतो.
सर्वोदय सोलर योजनेचा कशाप्रकारे होणार लाभ
सर्वोदय सोलर योजनेअंतर्गत सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या घरावर सोलर सिस्टम विनामूल्य प्रदान केले जाणार असे या योजनांमध्ये घोषित केले आहे. व या योजनेअंतर्गत या सोलर सिस्टम मध्ये प्रत्येक कुटुंबाला तीन किलोमीटर सौर पॅनल व एक सोलर इन्वर्टर आणि त्याच्याशी निगडित आवश्यक उपकरणे मोफत दिले जाणार .व या उपकरणांचा वापर सोलर उर्जेवर केल्यामुळे आपले विज बिल आपोआपच कमी येईल त्यामुळे या सोलर सिस्टम मुळे लाभार्थ्यांना त्यांच्या वीज बिलात 70 ते 80 टक्के पर्यंत बचत होईल, यामुळे ग्रामीण व शहरी भागातील मध्यमवर्गीय लोकांचे जीवन सुधारेल व अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ होईल.
सर्वोदय सोलर योजनेसाठी लागणारी पात्रता
सर्वोदय सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. व आपण एका एका कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो. व अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे पाच लाखा पेक्षा कमी असावे. वारसदाराचे घर ग्रामीण किंवा शहरी भागात असावे . व अर्जदाराकडे त्याची स्वतःची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेले किमान शंभर चौरस फूट छत असावे.
सर्वोदय सोलर योजनेसाठी अर्ज कसा करावा
सर्वोदय सोलर योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मुख्य ऊर्जा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्या कार्यालयामधून लाभार्थ्यांना योजनेचा अर्ज भरण्यासाठी जो अर्ज लागतो .तो अर्ज घेऊन त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडून, तो अर्ज ऊर्जा विभागात जमा करावा त्यानंतर अर्जदाराचा तपास होईल व हा तपास पूर्ण झाल्यानंतर अर्जदारास सोलर रूट ऑफ सिस्टम नियुक्ती केला जाईल.
सर्वोदय सोलर योजनेचा फायदा
प्रधानमंत्री सर्वोदय सोलर योजना ही गरज कुटुंबांना स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा प्रदान करते ज्याचा जेणेकरून सर्वोदय सोलर योजना ही एक प्रभावी योजना आहे .आणि या योजनेमुळे ग्रामीण भागातील व शहरी भागातील गरिबांनी मध्यमवर्गीय कुटुंबांना खिशाला परवडणारे ,आणि शाश्वत ऊर्जा पुरवठा करण्यास या योजनेची मदत होणार आहे .यामुळे भारतातील ऊर्जा सुरक्षा वाढेल व यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारेल आणि ग्रामीण भागातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
सर्वोदय सोलर योजना ही एक प्रभावी योजना आहे त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्ग लोकांना याचा फायदा होणार आहे व आपण या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.
Hello,
I am Ranjeet Maurya from LOOM SOLAR PVT LTD.
Loom Solar is a start-up, manufacturer of Super high-efficiency solar panels and Lithium batteries based out of Faridabad, Haryana. It is an ISO 9001-2015 certified company and recognized startup by Govt. of India.
We want to publish an article on your website,
Please let us know if you are open to the same. Share your Contact details for further discussion.
Thanks
Regards
Ranjeet Maurya
9026260287 (WhatsApp)