व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

5% व्याज दारावर गॅरेंटी शिवाय 3 लाखांचे कर्ज… 15,000 रुपयेची मदत, उत्तम आहे ही सरकारी योजना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

PM Vishwakarma Yojana: मोदी सरकारच्या काळात अनेक योजना सुरू झाल्या. यातील एक म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. याचा लाभ आपण गरीब कुटुंबांना होत आहे. ही योजना कमी व्याजावर गॅरंटीशिवाय कर्ज देते. 15 हजार रुपयांची आर्थिक मदत देखील देते. कमी व्याजावर कर्ज मिळत असल्याने गरीब कुटुंबांना व्यवसाय सुरू करायला फायदा होतो. तर चला या योजनेचे तपशील जाणून घेऊया.

काय आहे विश्वकर्मा योजना?

सरकारने या योजनेत 18 पारंपारिक कौशल्य व्यवसाय समाविष्ट केले आहेत, जे संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात उपस्थित कारागीर माध्यमातून सोनार लोहार नाई आणि मोची यासारखे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना लाभ होणार आहे. यामध्ये लोक सुतार, होडी बनवणे, लोहार, कुलूप, सोनार, मातीची भांडी, आणि इतर वस्तू बनवणारे कुंभार, शिल्पकार, गवंडी, माशाची जाळी बनवणारे, आणि बनवणारे आशा व्यवसायांचा समावेश होतो.

दोन टप्प्यात मिळेल 3 लाख रुपयांचे कर्ज

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत कोणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते आणि त्यानंतर त्यांच्या विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेता येते. हे कर्ज केवळ 5 टक्के व्याजाने दिले जाते.

15 रुपयांची अतिरिक्त मदत

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत कौशल्यावरतीसाठी मास्टर प्रशिक्षकांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जाते. लाभार्थ्यांना पाचशे रुपये रोज स्टायपेंड, पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, पंधरा हजार रुपयांचे टूल किट प्रोत्साहन तसेच डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीला चालना मिळते.

हे वाचा 👉  पोस्ट ऑफिस एफडी योजना: Post Office Time Deposit अंतर्गत पाच लाख गुंतवून 15 लाख रुपयांचा रिटर्न मिळवा.

कोण लाभ घेऊ शकतो?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असावे. योजनेत समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

योजनेचे फायदे

विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीर आणि त्यांची ओळख प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे केली जाईल याशिवाय कौशल्य उन्नतीचे काम करण्यात येणार आहे त्याच वेळी 5-7 दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि 15 दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांचे अपग्रेडेशन प्रशिक्षण आणि प्रतिदिन 500 रुपये स्टायपेंड दिले जाईल. त्याचप्रमाणे, मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला पंधरा हजार रुपयांपर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाईल.

फायदा कोणाला होणार?

मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केलेले लाभार्थी 1 लाख रुपये पर्यंतच्या कर्ज साह्याचा पहिला हप्ता घेण्यास पात्र असतील. दुसरा कर्जाचा टप्पा अशा लाभार्थ्यांना उपलब्ध असेल ज्यांनी पहिल्या टप्प्याचा लाभ घेतला आहे आणि एक मानक कर्ज खाते राखले आहे आणि त्यांच्या व्यवसायात डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत किंवा अपग्रेड प्रशिक्षण घेतले आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) अंतर्गत सोना, लोहार, न्हावी, चर्मकार यांच्यासारखे पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना विविध प्रकारे लाभ मिळतो या योजनेत सरकारने 18 पारंपारिक व्यवसायांचा समावेश केला आहे ज्यामुळे भारतातील ग्रामीण व शहरी भागातील कारागिरांना मदत होईल यामध्ये कार्पेंटर ,ताळे बनवणारे, कुंभार, मूर्तिकार ,राज मिस्त्री मासेमारीचे जाळे बनवणारे, खेळणी तयार करणारे, असे अनेक व्यवसायांचा समावेश आहे.

हे वाचा 👉  तुमच्याही घरात बसविले जाणार प्रीपेड स्मार्ट मीटर. | स्मार्ट प्रीपेड मीटर |smart electricity prepaid meter.

कोणती कागदपत्रे लागतील?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर

अर्ज कसा करायचा?

  • अधिकृत वेबसाईट https://pmvishwakarma.gov.in/वर जा.
  • मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना दिसेल येथे उपस्थित असलेल्या apply online पर्याय लिंक वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे पाठवला जाईल.
  • यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा.
  • भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • आता फॉर्ममध्ये समाविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page