व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सरकारी कामांसाठी वैध असलेले प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरीसह असे काढा घरबसल्या मोबाईलवरून. Property card download online.

नमस्कार, आपण आज या लेखांमध्ये घरबसल्या मोबाईलवरून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) कसे काढायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता उतारा किंवा पत्रक आता महाराष्ट्र सरकारने डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून प्रॉपर्टी कार्ड काढू शकता.

प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) विषयी थोडक्यात..

ज्याप्रमाणे 7/12 उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे? याची माहिती दिलेली असते, अगदी त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेत जमीन आहे. याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर (मालमत्ता पत्रक) दिलेली असते. म्हणजेच बिगर शेतजमीन क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये घर, बंगला, व्यवसायाची इमारत, दुकान किंवा अन्य स्थावर मालमत्तेची संपूर्ण माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते.

प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) काढण्यासाठी किती शुल्क द्यावे लागते?

प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमची मालमत्ता ज्या क्षेत्रामध्ये येते त्यानुसार तुम्हाला शुल्क भरावे लागते. क्षेत्रानुसार किती शुल्क भरावे लागते हे आपण खाली पाहूया:

  • महानगरपालिका क्षेत्रामध्ये तुमची मालमत्ता असेल तर प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 135 रुपये शुल्क आकारले जाते.
  • अ, ब, क नगरपालिका-नगरपंचायती क्षेत्रामध्ये तुमची मालमत्ता असेल तर तुम्हाला 90 रुपये शुल्क आकारले जाते.
  • ग्रामीण क्षेत्रांमध्ये तुमची मालमत्ता असेल तर तुमच्याकडून 45 रुपये शुल्क आकारले जाते.
हे वाचा 👉  आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढा आता तुमच्या मोबाईलवर | ayushyaman bharat golden card

प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) कसे काढायचे?

डिजिटल स्वाक्षरीसह प्रॉपर्टी कार्ड काढण्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • डिजिटल स्वाक्षरीसह प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://bhulekh.mahabhumi.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल.
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर उजवीकडे तुम्हाला Digital Signed 7/12 किंवा डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
  • प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या पेजवर युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. त्याचबरोबर फोन नंबर टाकूनही तुम्ही लॉग इन करू शकता.
  • फोन नंबर टाकून लॉगिन करण्यासाठी तुम्हाला OTP Based Login या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Enter Mobile Number रकान्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून Send OTP या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो Enter OTP या रकान्यामध्ये टाकून verify OTP या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील त्यातील Digital Signed Property Card या पर्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड नावाचे एक पेज ओपन होईल. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, त्यानंतर जिल्हा, भूमि अभिलेख कार्यालय आणि सर्वात शेवटी गाव निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला CTS (City Survey) नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्रातील प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरीसह काढायचे आहे. त्याचे शुल्क ऑनलाईन पेमेंट द्वारे भरायचे आहे.
  • आता सर्वात शेवटी तुम्हाला पुन्हा माहिती भरायची आहे. यामध्ये विभाग, जिल्हा, आम्ही अभिलेख कार्यालय, गाव आणि CTS नंबर निवडायचा आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर खाली तुम्ही जमा केलेली रक्कम तुम्हाला दिसेल. मग डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
हे वाचा 👉  लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व हमीपत्र डाऊनलोड करा | download ladki bahini Yojana form and hamiPatra PDF

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही डिजिटल स्वाक्षरीसह प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता.

प्रॉपर्टी कार्डाचे (मालमत्ता पत्रक) वाचन कसे करायचे?

  • डिजिटल स्वरूपात डिजिटल स्वाक्षरीसह डाऊनलोड केलेल्या प्रॉपर्टी कार्डचा शीर्षकावर मालमत्ता पत्रक असा उल्लेख असतो.
  • या प्रॉपर्टी कार्डमध्ये सर्वप्रथम संबंधित गाव, तालुका आणि जिल्ह्याची माहिती दिलेली असते.
  • त्यानंतर नगर भूमापन क्रमांक आणि त्या मालमत्तेचे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये दिलेले असते.
  • या प्लॉटचा मूळ मालक कोण आहे याची नोंद ‘हक्काचा मूळ धारक’ या विभागात असते.
  • सर्वात खाली प्रॉपर्टी कार्डवर एक महत्त्वाची सूचना दिलेली असते ज्यामध्ये असे स्पष्ट नमूद केलेले असते की हे डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे कोणत्याही सही किंवा शिक्याची आवश्यकता नाही. यामुळे हे प्रॉपर्टी कार्ड अधिकृत आणि कायदेशीर शासकीय कामांसाठी वैध आहे.

अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर्टी कार्ड चे वाचन करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण घरबसल्या डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड कसे काढायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा बिगर शेती जमिनींसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड घरबसल्या मोबाईल वरून काढू शकता? धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page