व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

घरातील मुलीला व सुनेला वडिलांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळू शकतो का, पहा माहिती.

वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?

संपत्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे तुम्ही स्वत: कमावलेली आणि दुसरी वडिलोपार्जित. कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते, त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा

वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो. स्वत: कमावलेली संपत्ती तो व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकतो.

Property Rights : कुटुंबात अनेकदा संपत्तीच्या कारणावरून मोठे वाद-विवाद पाहायला मिळतात. अनेक प्रकरणांमध्ये असे पाहायला मिळाले आहे की, नवरा-बायकोमध्ये वादविवाद झाल्यानंतर असे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात. अशावेळी बायको आपल्या पतीच्या आणि सासरच्या संपत्तीवर दावा ठोकत असते.

मात्र कायद्याने असा अधिकार तिला मिळतो का हा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. घरातील सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो का ? याबाबतीत कायद्यात काय तरतूद आहे याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.

फक्त शंभर रुपयांमध्ये तुमच्या जमिनीची वाटणी करून घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. 👇

घरातील सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो का ?

घरातील सुनेला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळतो की नाही ? खरेतर, याबाबत हिंदू उत्तराधिकारी कायद्यामध्ये सविस्तर तरतूद देण्यात आली आहे. यानुसार, कोणत्याही हिंदू कुटुंबातील सुनेला जोपर्यंत तिचा पती हयात आहे तोपर्यंत वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकत नाही.

हे वाचा-  कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज कसा करावा? |How to Apply for  Kadaba Kutti Machine Subsidy Scheme

म्हणजेच एखाद्या महिलेचा पती जोपर्यंत हयात असेल तोवर तिला तिच्या पतीच्या अथवा सासरच्या वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळणार नाही. म्हणजेच पती जोवर हयात आहे तोपर्यंत महिलेला तिच्या सासरच्या मालमत्तेत हिस्सा मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही.

मात्र जेव्हा तिच्या पतीचे निधन होते तेव्हा तिच्या पतीच्या वाट्याला येणारी वडीलोपार्जित मालमत्ता ही तिला मिळते, हा तिचा अधिकार असतो.

जर पती हयात नसेल आणि सासरच्या मंडळीने सदर विधवा महिलेला तिला मालमत्तेत अधिकार देण्यास नकार दाखवला तर ती अशा प्रकरणांमध्ये कोर्टात जाऊ शकते. 

फक्त शंभर रुपयांमध्ये तुमच्या जमिनीची वाटणी करून घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. 👇

विवाहित महिलेला आपल्या वडिलांच्या संपत्ती हिस्सा मिळतो का?

अनेकांच्या माध्यमातून हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता. विवाहित महिलेला आपल्या वडिलांच्या संपत्तीत देखील हिस्सा मिळतो का ? हा प्रश्न उपस्थित होत होता.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कायद्याने मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत तिच्या भावंडांप्रमाणेच समान अधिकार देण्यात आले आहेत.

म्हणजेच मुलाला आणि मुलीला कायद्याने समान अधिकार प्रदान केले आहेत. वडिलांच्या संपत्तीत मुलगा जेवढा दावेदार असतो तेवढीच दावेदार मुलगी देखील आहे. यामुळे जर मुलीचे लग्न झाले अन तीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार हवा असेल तर ती याप्रकरणी कोर्टात धाव घेऊ शकते.

हे वाचा-  पी एम किसान चा 17 वा हप्ता मिळाला नाही? असा करा चेक.. | पीएम किसान लाभार्थी यादी व स्टेटस पहा.

अथवा तिला जर तिला मिळणारी तिच्या वडिलांची संपत्ती तिच्या भावाला द्यायची असेल तर ती हक्क सोड प्रमाणपत्र देऊन ती संपत्ती तिच्या भावाला ट्रान्सफर करू शकते. 

‘ती’ला नाही पण, मुलाला वाटणी मागण्याचा अधिकार

‘हिंदू वारसाहक्क (दुरुस्ती) अधिनियम, २००५’नुसार, एखादा हिंदू पुरुष मृत्युपत्र न करताच मरण पावला, तर त्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर त्याच्या मुलाएवढाच मुलींचाही (सर्व वारसांचा) हक्क असेल. त्यात मुलगी विवाहित आहे अथवा नाही, याचा विचार होत नाही.

परित्यक्ता महिलांना पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळवणे विधवा महिलांपेक्षाही कठीण होते. हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पत्नीला दोन प्रकारे हक्क मिळतो. पतीच्या मृत्यूनंतर त्याची वारस म्हणून, तसेच पतीच्या हयातीमध्ये संपत्तीच्या वाटण्या झाल्यास, मात्र वाटणी मागण्याचा हक्क तिला नाही.

अपत्यांना जन्माने वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क असल्याने वडिलांकडे वाटणीची मागणी करू शकतात. त्यामुळे बहुतेक परित्यक्ता महिलांना पतीच्या जमिनीमध्ये सहजासहजी हक्क मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment