व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून तब्बल 50 वर्षानंतर ७/१२ उताऱ्यात करण्यात आले 11 बदल.. जाणून घ्या काय आहेत हे बदल!|Satbara Utara New updates 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

या पोस्टमध्ये आपण राज्य शासनाच्या महसूल विभागाने ७/१२ उताऱ्यामध्ये तब्बल 50 वर्षानंतर काही महत्त्वाचे बदल केलेले बदल कोणते आहेत? त्याचबरोबर या बदलांचा शेतकरी व जमीन मालकांना कोणता फायदा होणार आहे? हे सविस्तर पाहूया.

७/१२ उताऱ्याचे महत्त्व

महाराष्ट्रातील शेतकरी आणि जमिन मालकांसाठी त्यांच्या जमीन हक्काबाबतचा महत्त्वाचा दस्ताऐवज म्हणजे ७/१२ उतारा होय. ७/१२ उताऱ्यामध्ये जमिनीचे मालकी हक्क, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीमधील पिकांची माहिती, कर्जबोजे आणि जमिनीच्या इतर महत्त्वाच्या बाबींची नोंद यामध्ये असते. यावरूनच असे समजते की, ७/१२ उतारा हा एक खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे.

पण आता या ७/१२ उताऱ्यामध्ये राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून तब्बल पन्नास वर्षानंतर काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, ज्यामुळे या दस्तऐवजाची स्पष्टता आणि अचूकता वाढणार आहे.

राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून ७/१२ उताऱ्यामध्ये केलेले बदल

राज्य सरकारच्या महसूल विभागाने ७/१२ उताऱ्यामध्ये तब्बल 50 वर्षानंतर 11 महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे बदल कोणते आहेत ते आपण खाली पाहूया:

  • पूर्वी ७/१२ उताऱ्यामध्ये फक्त गावाचे नाव दिसत असे. आता नवीन बदलानुसार गावाचे नाव आणि त्याचा विशिष्ट कोड क्रमांक देखील समाविष्ट केला आहे. याचा महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे या बदलामुळे गाव ओळखण्यास अचूकता मिळेल आणि सरकारी नोंदी अधिक स्पष्ट होतील.
  • ७/१२ उताऱ्यामध्ये पूर्वी एकत्रितपणे लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र अशी जमिनीची माहिती दिली जात असे. आता लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र वेगवेगळ्या रकान्यामध्ये नोंदवले जाणार आहे. याचा फायदा असा होईल, की जमीन शेतीसाठी योग्य आहे की नाही याबाबत अधिक पष्टता येईल.
  • पूर्वी जमिनीचे मोजमाप पारंपरिक पद्धतीने केले जात असे. आता नवीन बदलानुसार हेक्टर, आर आणि चौरस मीटर ही नवीन मापन पद्धती लागू केली आहे. याचा फायदा जमिनीच्या मोजमापात अधिक अचूकता येईल त्यामुळे गोंधळ कमी होईल.
  • पूर्वी खाते क्रमांक हा ‘इतर हक्क’या विभागात नमूद केला जात असे. आता नवीन बदलानुसार तो खातेदाराच्या नावासमोर थेट दिसणार आहे. याचा फायदा मालकाची माहिती पटकन ओळखता येईल आणि नोंदी अधिक पारदर्शक आणि स्पष्ट होतील.
  • पूर्वी मृत व्यक्तीच्या नोंदी कंसात दिल्या जात असत, आता नवीन बदलानुसार त्यावर आडवी रेष मारली जाईल. या बदलामुळे आता असा फायदा होईल, की ७/१२ उतारा वाचताना गोंधळ होणार नाही आणि नोंदी व्यवस्थित समजतील.
  • जमिनीच्या मालकी हक्कांमध्ये झालेल्या बदलांची नोंद ७/१२ उताऱ्यावर असते. परंतु जर फेरफार प्रक्रिया प्रलंबित असेल, तर त्याची वेगळी नोंद नव्हती. आता नवीन बदलानुसार ‘प्रलंबित फेरफार’ नावाचा वेगळा रकाना असणार आहे. यामुळे न्यायालयीन प्रकरणी किंवा प्रलंबित फेरफार याबाबतची माहिती अधिक स्पष्ट मिळण्यास मदत होणार आहे.
  • पूर्वी जुने फेरफार नंबर सर्वसाधारण नोंदीत दिले जात असत. आता नवीन बदलानुसार जुने फेरफार नंबर वेगळ्या रकान्यामध्ये दिले जातील. यामुळे जुन्या फेरफार यांची माहिती व्यवस्थित मिळेल आणि नोंदी शोधणे सोपे जाईल.
  • पूर्वी अनेक वेळा खातेदारांची नावे एकमेकांमध्ये मिसळून दिसायची, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत असे. पण आता नवीन बदलानुसार दोन खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेष असणार आहे. यामुळे कोणत्या जमिनीचे कोण मालक आहेत, ही स्पष्टपणे समजेल.
  • पूर्वी गट नंबरच्या बाजूला फेरफार नंबर आणि त्याची तारीख दिली जात नव्हती. पण आता नवीन बदलानुसार आता ही सर्व माहिती ‘इतर हक्क’ रकान्यात समाविष्ट केली जाणार आहे. यामुळे शेवटचा फेरफार कधी आणि कोणत्या नम्र आणि झाला, हे स्पष्ट होणार आहे.
  • पूर्वी बिनशेती क्षेत्रासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मोजमाप दिले जायचे. पण नवीन बदलानुसार आता फक्त ‘आर चौरस मीटर’ पद्धत ठेवली आहे. यामुळे बिनशेती जमिनीचे मोजमाप अधिक अचूक आणि समजण्यास सोपे होणार आहे.
  • पूर्वी बिनशेती क्षेत्रासाठी वेगळी नोंद नव्हती. आता नवीन बदलानुसार ७/१२ उताऱ्याच्या शेवटी असा स्पष्ट उल्लेख असेल, की ती जमीन अ कृषी क्षेत्रामध्ये रूपांतरित झाली आहे. यामुळे कोणती जमीन शेती राहिली नाही हे सहजपणे कळण्यास मदत होईल.
हे वाचा 👉  मतदार यादीत नाव शोधणे| मतदार यादी डाउनलोड 2024 | मतदान कार्ड डाउनलोड करा व नवीन काढा. |Voting card download,list.

७/१२ उताऱ्यावरील 11 बदलांचा शेतकरी व जमीन मालकांना काय फायदा होईल?

राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून ७/१२ उताऱ्यामध्ये जे 11 बदल करण्यात आले आहेत, त्या बदलांचा शेतकरी व जमीन मालकांना काय फायदा होणार आहे? हे आपण खाली पाहूया:

  • ७/१२ उताऱ्यावरील बदलांमुळे ७/१२ उतारा अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा होईल.
  • जमिनीचे व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि या व्यवहारांच्या नोंदीमध्ये अचूकता येईल.
  • शेतकरी आणि जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या नोंदी अधिक स्पष्ट आणि अचूक मिळण्यास मदत होणार आहे.
  • प्रलंबित फेरफार, कर्जबोजे आणि जमिनीच्या मालकीविषयी असलेला गोंधळ या बदलांमुळे दूर होईल.

७/१२ उताऱ्यावरील 11 बदल तुम्ही कोठे पाहू शकता?

जर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये या नवीन बदलानुसार काही बदल झाले आहेत का? हे चेक करायचे असेल, तर तुम्ही महसूल विभागाच्या या संकेतस्थळावर चेक करू शकता. 👉🏽 https://bhulekh.mahabhumi.gov.in/ त्याचबरोबर तुमची जमीन ज्या गावच्या हद्दीमध्ये येते त्या गावच्या तलाठी कार्यालयात जाऊन ७/१२ उतारा तपासू शकता.

या पोस्टमध्ये आपण राज्य सरकारच्या जमीन महसूल विभागाकडून ७/१२ उताऱ्यामध्ये महत्वाचे 11 बदल करण्यात आले आहेत हे पाहिले आहे. त्याचबरोबर या 11 बदलांचा शेतकरी व जमीन मालकांना काय फायदा होणार आहे? त्याचबरोबर ७/१२ उताऱ्यावरील झालेले 11 बदल तुम्ही कोठे पाहू शकता? हे पाहिले आहे. हे बदल पूर्वी गुंतागुंतीचे व किचकट बाबींना वगळून करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनीचा ७/१२ उतारा समजण्यास सोपे होणार आहे. धन्यवाद!

हे वाचा 👉  बँक ऑफ महाराष्ट्र शेतजमीन खरेदी करण्यासाठी देणार ‘इतक्या’ लाखांचे कर्ज ! Get loan from bank of Maharashtra.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page