व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

एलआयसी एजंट ने वयाच्या साठाव्या वर्षी बनवली सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी

नमस्कार मित्रांनो आपण आयुष्यामध्ये बऱ्याच उद्योजकांच्या आपण सक्सेस स्टोरी ऐकले असेलच ,जे युवक कमी वयामध्ये चांगल्या प्रकारे आपला उद्योग स्थापित करतात पण आपण जास्त वय असलेले लोकांची सक्सेस स्टोरी कमीच ऐकली असेल ,कारण असे म्हटले जाते की काही वयानंतर माणसाला काम करण्याची इच्छा कमी होते .

पण या विधानाला चुकीचे साबित केलं ते लक्ष्मण दास मित्तल यांनी कारण यांनी उद्योग क्षेत्रात एक खूप मोठा इतिहास रचला आपल्या वयाच्या साठावी गाठीपर्यंत भारतामध्ये ट्रॅक्टर क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी तयार केली .

म्हणजेच आम्ही तुम्हाला सांगत आहे लक्ष्मण दास मित्तल म्हणजेच भारतामधील सोनालीका ट्रॅक्टर या कंपनीचे मालक आज या आर्टिकल मध्ये आपण सोनालीका ट्रॅक्टर सक्सेस स्टोरी या विषयाबद्दल माहिती करून घेणार आहे की कसे लक्ष्मण दास यांनी वयाच्या साठावे पर्यंत एवढी मोठी कंपनी तयार केली

एलआयसी एजंट तयार केली सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी

ह्या कंपनीची स्थापना लक्ष्मण दास मित्तल यांनी सन 1995 मध्ये केली होती लक्ष्मण दास मित्तल यांनी या कंपनीची सुरुवात भारतामधील पंजाब येथे केली होती .ज्यावेळेस सोनालीका ट्रॅक्टर ह्या कंपनीची सुरुवात करायची होती .

तेव्हा लक्ष्मण दास हे भारतामधील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी एलआयसी मध्ये एजंट म्हणून कार्यरत होते. लक्ष्मण दास हे पहिल्यापासूनच आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करणार होते पण जॉब व इतर अडचणी यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता आला नाही .

हे वाचा-  best stock market app | मोफत असलेले 5 बेस्ट स्टॉक ट्रेडिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करा.

पण जेव्हा त्यांनी एलआयसी मधून रिटायरमेंट घेतली तवा त्यांचे वय 60 होते व त्यांनी तेव्हा ठरवले की आपण आता व्यवसाय करूया व त्यांनी सोनालिका ट्रॅक्टर ची कंपनी उभी केली. ज्या वयामध्ये लोक सर्व काही सोडून निवांत राहण्याचा निर्णय घेतात व आपला जास्तीत जास्त वेळ व्यायाम व आराम करण्यासाठी देतात त्या वयात लक्ष्मण दास यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता.

लक्ष्मण दास हे पहिल्यापासूनच शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी धडपड करत होते ,पण त्यांना संधी मिळाली नव्हती मग त्यांच्या लक्षात आले की भारतामध्ये त्याकाळी ट्रॅक्टर कंपनी काही चांगल्या नव्हत्या त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर इंडस्ट्री सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी सोनालिका ट्रॅक्टर या कंपनीची सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळातील खडतर प्रवास व त्यावर मात

पण आपल्याला तर माहीतच आहे कोणताही व्यवसाय सुरू करणे व तो सुरळीत पुढे चालू ठेवणे एवढे सोपे नाही सामान्य माणसाप्रमाणे लक्ष्मण दास मित्तल यांना देखील बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला .

कंपनीची सुरुवात केल्यावर त्यांनी टेक्नॉलॉजी वर काम केले नाही, कारण त्यांना व्यवसायामध्ये पैशाची कमतरता भासत होती कारण नवीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते .मग त्यांनी बराच वेळानंतर त्यांना एक फायनान्सर सापडला त्याच्या त्याच्याकडून त्यांनी 22 करोड कर्ज घेतले व त्या 22 करोड कर्जाच्या मदतीने त्यांनी आपल्या व्यवसायाला भरारी आणण्यासाठी खूप काबाडकष्ट केले

हे वाचा-  दोन बँक अकाउंट्स असणाऱ्यांना खरंच दंड भरावा लागणार का? जाणून घ्या RBI चे नियम

व ते तेव्हापासून कधीच मागे नाही सरले आज आपण बघू शकता की सोनालिका ट्रॅक्टर ही भारतामधील एक लोकप्रिय ट्रॅक्टर कंपनी आहे .

भारतातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी

लक्ष्मण दास मित्तल यांच्या अपार मेहनत व चिकाटी यांच्या जोरावर लवकरच सोनालीका ट्रॅक्टर ही कंपनी भारताच्या सर्वात मोठे ट्रॅक्टर कंपनी निर्माण करणाऱ्या तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचली.

यांचे हेडकॉटर पंजाब मध्ये जालंदर मध्ये स्थित आहे .याच्या व्यतिरिक्त सोनालिका ट्रॅक्टरची कंपनी जगभरात ७४ देशांमध्ये देखील ट्रॅक्टर पुरवते जर आपण सोनालिका ट्रॅक्टरच्या विक्री बद्दल विचार केला तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये जवळजवळ ,150000 पेक्षा पण जास्त ट्रॅक्टर पूर्ण जगामध्ये विकले गेले आहेत .

व यांची टेक्नॉलॉजी व नवीन आविष्कार याबाबत ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे नाव आहे व सोनालिका हा चांगल्या दर्जा चे विश्वासनीय ट्रॅक्टर तयार करणारी कंपनी आहे.

वयाच्या 92 व्या वर्षी अरब पती

सोनालीका ट्रॅक्टर कंपनीचे मालक लक्ष्मणदास मित्तल हे भारतामधील सर्वात जास्त वयाचे अरबपती मध्ये यांची गणना होते

आपण जर लक्ष्मण दास मित्तल यांचे एकूण उत्पन्न जर आपण पाहिले तर प्रसिद्ध मॅक्झिन फोरेबस च्या नियमानुसार एकूण उत्पन्न जवळजवळ 2.6 बिलियन डॉलर इतकी आहे ही एकूण उत्पन्न यांना भारतामधील सर्वात जास्त वयस्कर अरब पती बनवते.

सध्या त्यांची वय 92 वर्ष इतके आहे आपल्याला लक्ष्मणदास यांना आदर्श मानून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी घेण्यासारखे आहेत जसे की आपण कोणत्याही वयात काहीही करू शकतो.

हे वाचा-  सोने पुन्हा आज पर्यंतच्या सर्वात जास्त दरावर पोहोचले, पहा किती झाला सोन्याचा दर.

सोनालीका ट्रॅक्टर कंपनी टर्निंग पॉईंट

आपल्याला तर माहीतच आहे सोनालीका ट्रॅक्टर ही कंपनी भारतामधील ट्रॅक्टर निर्माण करणारी सर्वात मोठी तिसरी कंपनी आहे पण ह्या कंपनीने आर्थिक वर्ष 2021 -22 मध्ये ट्रॅक्टर मार्केटमधील 11.7% कंट्रोल हे आपल्या हातामध्ये घेतले .

पण त्यांना सुरुवातीला एक झटका बसला ज्यामुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती खालावली गेली व त्यांच्याकडून मारुतीची डीलरशिप रेजेक्ट केली गेली.

पण थोड्याच कालावधीत त्यांनी तू झटका पुन्हा भरून काढला व सध्या सोनालिका ग्रुप 70 हजार ट्रॅक्टर दरवर्षी भारतामध्ये विकले जातात .व इतर 70 देशांमध्ये त्याची निर्यात होते .

आता या त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांचे चिरंजीव अमृतसागर व दीपक आणि त्यांच्या नातू रमण सुशांत व राहुल हे सामील झाले आहेत . व कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

त्यांची सध्याची नेटवर्थ 23 हजार करोड इतकी आहे आपण सध्या जर विचार केला तर देशामधील सर्वात जास्त वयस्कर आरोप पती मध्ये त्यांचा समावेश आहे

घटक सविस्तर माहिती
संस्थापकलक्ष्मण दास मित्तल
कंपनी चालू
केले तेव्हाचे वय
60
कंपनी स्थापनासोनालीका ट्रॅक्टर 1995
सुरुवातीची स्थितीएक साधारण LIC एजंट
सध्याची स्थितीसाधारणपणे 70 हजार ट्रॅक्टर वार्षिक विक्री व 70 देशांमध्ये निर्यात

आपल्याला या आर्टिकल मध्ये नक्कीच सोनालिका ट्रॅक्टरची सक्सेस स्टोरी कळाली असेल आम्ही आशा करतो की आपण ही स्टोरी आपल्या दोस्त मंडळींना सांगावी कारण त्यांना देखील सोनालीका ट्रॅक्टर सक्सेस स्टोरी ची माहिती मिळावी व अशाच प्रकारच्या सक्सेस स्टोरी वाचण्यासाठी आमच्या बिजनेस पेजला फॉलो करा

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment