व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Voter स्लिप घरी न आल्यास घरबसल्या करता येनार डाउनलोड, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती. | Voter slip download

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. यावेळी 97 जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच बुथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन वोटर स्लिपचे वाटप करत आहेत. जेणेकरून नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. पण काही मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहोचली जात नाही. अशातच तुम्ही ऑनलाइन किंवा एका एसएमएसच्या माध्यमातूनही वोटर स्लिप मिळवू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

वोटर स्लिपशिवायही करता येईल मतदान

वोटर स्लिप नसल्यास तुम्ही मतदान कार्डच्या माध्यमातून मतदान करू शकता. वोटर स्लिप मिळवण्यासाठी मतदार मदत केंद्राला भेट देऊन ती मिळवू शकता.

ॲपवरुन वोटिंग स्लिप कसे डाउनलोड करावे? (Voter EEducation

वोटर स्लिप डाउनलोड करण्यासाठी शासनाचे ॲप डाऊनलोड करा. 👇

  • प्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन व्होटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करा.
  • पुढे मोबाईल नंबर आणि पासवर्डद्वारे ॲप लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर ‘Search Your Name in Electoral Roll’ पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर ‘Search by Details’ किंवा ‘Search by EPIC No’ यातील एक पर्याय निवडा.
  • आता आवश्यक माहिती भरून सर्चवर क्लिक करा
  • असे केल्यास तुमची संपूर्ण माहिती पेजवर दिसेल ते डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड या ऑप्शनवर क्लिक करा.
हे वाचा-  Maharashtra dam water storage| महाराष्ट्रातील कोणत्या धरणामध्ये किती पाणीसाठा झाला आहे याची माहिती.

मतदान स्लीप डाऊनलोड करण्याची ऑनलाईन प्रोसेस (Voter Education)

मतदानाची स्लिप ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

  • सर्वात प्रथम NVSP च्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा.
  • त्यानंतर Search in Electoral Roll वर या ऑप्शनवर क्लिक करा.
  • पुढे, ‘Search by Details’ किंवा ‘Search by Mobile’ यातील एक पर्याय निवडा.
  • त्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर Search वर क्लिक करा.
  • ही प्रोसेस केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर सादर केले जाईल.. यानंतर ‘View Details’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला मतदान केंद्र मतदानाची तारीख आणि इतर माहिती एका वेगळ्या पेजवर दिसेल.
  • यानंतर तुम्ही View Details’ वर क्लिककरून मतदान स्लिप डाउनलोड करू शकता.

SMS च्या माध्यमातून मतदान केंद्राची माहिती

मोबाइलमध्ये टेक्स मेसेजमध्ये ECI स्पेस मतदान कार्डवरील कार्ड क्रमांक लिहून 1950 वर मेसेज पाठवा. केवळ 14 सेकेंदामध्ये मतदान केंद्राची माहिती तुम्हाला मिळेल.

  • सर्वप्रथम, जर तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिला जाईल.
  • एसएमएस “EPIC” स्पेस व्होटर आयडी क्रमांक टाइप करा आणि तो 1950 वर पाठवा.
  • एकदा तुम्ही एसएमएस पाठवल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल उत्तर मिळेल.

वोटर स्लिपशिवाय कसे मतदान करू शकतो?

मतदार यादीत नाव नसल्यास आणि वोटर स्लिपही नसेल तरीही तुम्ही मतदान कार्डच्या माध्यमातून मतदान करू शकता. निवडणूक आयोगाने 12 ओखळपत्रांच्या माध्यमातून मतदान करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना अशा काही ओखळपत्रांचा समावेश आहे.

हे वाचा-  भांडी संच योजना बांधकाम कामगारांना मिळणार आहेत घरातील भांडी मोफत. | बांधकाम कामगार योजना अर्ज करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment