व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Solar pump beneficiary list 2024:सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा!

सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनांद्वारे महाराष्ट्रात सन 2015 पासून पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत.पंतप्रधान कुसुम योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे की, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सौर ऊर्जेचा वापर करून सिंचन आणि वीज निर्मिती करावी.

या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सौर ऊर्जेचा वापर करून सिंचन आणि  निर्मिती करावी. सौर ऊर्जेच्या वापरामुळे डिझेलवर चालणारी पंप आता सौर ऊर्जेवर चालणारे असून, यामुळे पर्यावरणाला हानी न पोहोचवता शेतकऱ्यांना पाणी आणि वीज उपलब्ध होईल.

या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार शेतकऱ्यांना 65% अनुदान आणि 30% उपलब्ध करून देते, ज्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 10% खर्च करावा लागतो. या प्रकल्पातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज शेतकरी वीज वितरण कंपनीला विकू शकतो, ज्यामुळे त्यांना दरमहा काही प्रमाणात उत्पन्न मिळवता येईल.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये:

  • सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा 10% रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच
  • सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
  • विज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान
  • पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
  • अनुसूचित जाती जमातींचे शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के होते
हे वाचा-  गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र 2024-25 ची झाली सुरवात, शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

आवश्यक कागदपत्रे:

  • शेतीचा सातबारा उतारा
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जातीचा दाखला
  • अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर शिस्तेदारांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे.
  • पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
  • पाण्याची स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
  • संपर्क करिता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक/ई-मेल आयडी

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून,अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेच आहेत.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.

1. पोर्टल ओपन केल्यानंतर लाभार्थी सुविधाच्या मुख्य मेनूमध्ये “अर्ज करा” वर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरा.

2. लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांक कव्हर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एसएमएस द्वारे कळवण्यात येईल.

सोलर पंपाचे फायदे:

1.पर्यावरण पूरक परिचलन

2. शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडी पासून पृथक्करण करणे.

3. दिवसा शेतीपंपास विजेची उपलब्धता

4. दिवसा विना व्यत्यय अखंडित वीज पुरवठा

5. डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च

6. वीज बिलापासून मुक्तता

7. औद्योगिक वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमी करणे.

योजना अंमलबजावणी

सौर पंप उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, महावितरण ने खालील प्रमाणे निविदा जारी केल्या आहेत.

  • 50000 सौर पंपांच्या पुरवठा आणि अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेत आहे आणि ती अंतिम केली जाईल.
  • 25000 पंपांच्या पॅनेलमेंट साठी निविदा देखील काढल्या जातील आणि अंतिम रूप दिले जाईल.
हे वाचा-  सर्वोदय सोलर योजनेअंतर्गत मिळणार 1 कोटी कुटुंबांना मोफत सोलर

सौर पंप बसवण्यासाठी महसूल विभाग निहाय एजन्सींना पॅनल मध्ये टाकण्यात येईल. डिमांड नोट भरल्यानंतर लाभार्थी एजन्सी निवडू शकतो. अर्जदाराने एजन्सी महावितरण आला कळवल्यानंतर संबंधित एजन्सीला कार्यादेश दिल्यानंतर तीन महिन्यात काम पूर्ण करावे लागेल.

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पंप दिले जात आहे तर अशा शेतकऱ्यांची पात्र यादी जाहीर झालेली आहे तरी ही यादी पाहण्यासाठी खाली व्हिडिओ संपूर्ण पहा.

आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा असा हा संपूर्ण परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर केलेला आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page