व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट सुरू |  www.ladakibahin.maharashtra.gov.in

लाडकी बहीण योजनेच्या नारीशक्ती ॲप चे सर्वर डाऊन

महायुती सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठीचे ॲप मध्ये सध्या तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बहुसंख्य महिला अर्ज भरण्यासाठी त्रस्त होत आहेत. सदरचे ॲप कधी सुरू होणार याची विचारणा महिला वर्गातून होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 18 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीच्या टप्प्यात याबाबतच्या अटी मध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे नेमकी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे की सावत्र बहिण आहे असा प्रश्न विचारला जात असताना त्या योजनेसाठी महिलांना नाव नोंदणीसाठी एक स्वतंत्र ॲप सुरू केले आहे,

ते ॲप द्वारे गेले आठवडाभर नोंदणी सुरू असताना सुरुवातीचे काही दिवस ॲपचे सर्वर सातत्याने लोडवर असल्यामुळे चालत नव्हते त्यामुळे बहुसंख्य महिला या अर्ज भरू शकल्या नव्हत्या मात्र गेले चार-पाच दिवसात अर्ज भरण्याची सुविधा अँप वर तातडीने उपलब्ध झाल्यामुळे बहुसंख्य महिलांनी नोंदणी केली. 15 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा हप्ता जमा होणार असल्यामुळे सध्या नोंदणीसाठी महिलांची पळापळ सुरू आहे

पण या अडचणीवर सरकारने नवीन उपाय शोधला असून सरकारने लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल सुरू केलेले आहे. आता राज्यातील महिला या पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकतात. यामुळे महिलांची चांगलीच मदत झालेली आहे.
नवीन पोर्टल : https://ladakibahin.maharashtra.gov.in

हे वाचा-  हे ॲप मोबाईल मध्ये ठेवा, ट्रॅफिक पोलिस पकडणार नाही.| M parivahan app download.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन पोर्टलवरून अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

Ladki bahin yojana new website

मुंबई: महायुती सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली होती. या योजनेतंर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. पण या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही तांत्रिक अडचणींमुळे महिलांना अर्ज प्रक्रियेत अडथळे येत होते.

तांत्रिक अडचणींमुळे अर्ज प्रक्रियेतील अडथळे

शासनाच्या संकेतस्थळाचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे महिलांकडून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बराच कालावधी लागत होता. यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. यानंतर सरकारने त्वरित कारवाई करून नवीन संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन संकेतस्थळ: www.ladakibahin.maharashtra.gov.in

महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. या नवीन संकेतस्थळामुळे महिलांना घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे, ज्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑगस्ट 2024

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्याप अर्ज न केलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेकरता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरून अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

हे वाचा-  तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर ही कागदपत्रे दाखवून तुम्ही मतदान करू शकता. | Voter Id

अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पोर्टल, मोबाईल अॅप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे पूर्ण करता येते. ज्यांना अर्ज करता येत नाही, त्यांना अंगणवाडी केंद्रात अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन पोर्टलवरून अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे:

  1. ओळखीचे प्रमाणपत्र: आधार कार्ड, मतदाता ओळखपत्र, पॅन कार्ड इत्यादी.
  2. उत्पन्नाचे प्रमाणपत्र: उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते विवरण इत्यादी.
  3. अधिवास प्रमाणपत्र: निवासी प्रमाणपत्र.

अर्ज भरण्याची प्रक्रिया:

  1. नवीन संकेतस्थळावर लॉगिन करा: www.ladakibahin.maharashtra.gov.in वर लॉगिन करा.
  2. अर्ज फॉर्म भरा: आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
  3. कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  4. अर्ज सबमिट करा: सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा.

Ladki bahin yojana Maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. नवीन संकेतस्थळामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करावा, ज्यामुळे त्यांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळू शकेल. सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळविण्यास मदत होईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment