पावसाळ्यात मछरांचा उपद्रव हा घराघरात एक मोठी समस्या बनली आहे. पाण्यामुळे संध्याकाळ झाली की घरात मच्छरांचा घोळका वाढतो आणि त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ होते. मच्छरांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक उपाय उपलब्ध आहेत, जसे की मॉस्किटो रॅकेट्स, Electric Coil, अगरबत्त्या, मॉस्किटो Cream, आणि स्प्रे. पण या सर्व उपायांमध्ये अजून तरी असा एकही उपाय सापडलेला नाही जो १०० टक्के परिणामकारक ठरतो.
याच समस्येवर एक नवे आणि अनोखे तंत्रज्ञान प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी समोर आणले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात आर्यन डोम नावाचे एक विशेष उपकरण दाखवले आहे. आर्यन डोम हे एक प्रगत इस्रायलचे एअर डिफेन्स सिस्टम आहे, जे सामान्यतः युद्धामध्ये वापरले जाते. शत्रूच्या हवाई हल्ल्यांना थोपवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. या डिफेन्स सिस्टमचं छोटं मॉडेल एका चीनी युवकाने तयार केलं आहे आणि विशेष म्हणजे, तो त्याचा वापर मच्छर मारण्यासाठी करतो.
पहा याचा व्हिडिओ
With dengue on the rise in Mumbai, I’m trying to figure out how to acquire this miniature cannon, invented by a Chinese man, which can seek out & destroy mosquitoes!
— anand mahindra (@anandmahindra) August 24, 2024
An Iron Dome for your Home…
pic.twitter.com/js8sOdmDsd
हा व्हिडिओ पाहून असे लक्षात येते की आर्यन डोम हे मच्छरांचा सफाया करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते. आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हे उपकरण जर आपण आपल्या घरात आणू शकलो तर घरातीलच नव्हे तर संपूर्ण सोसायटीमधील मच्छर एकदम गायब होऊ शकतात. अर्थात, हे उपकरण अजून भारतात उपलब्ध नाही पण महिंद्रांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या व्हिडिओवर अनेक लोकांनी उत्साहाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे उपकरण आपल्या घरात कसं उपयोगी पडेल यावर चर्चा केली आहे तर काहींनी असे उपकरण खरेदी करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. घरातील मच्छरांचा त्रास सहन करावा लागणार नाही याचा विचार करुन, अनेक जण या उपकरणाच्या भारतात येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तुमचं मत काय आहे? हे उपकरण भारतात आणलं तर ते खरंच मच्छरांचा प्रश्न कायमचा सोडवू शकेल का? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. मच्छरांसारख्या छोट्या पण त्रासदायक समस्येचं समाधान करण्यासाठी हा नवा तंत्रज्ञान आधारित उपाय खूपच प्रभावी ठरू शकतो.